Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation
फिरता दवाखाना

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही ठिकाणी प्राथमिक उपचार प्राप्त व्हावे याकरिता ‘फिरता दवाखाना’ रुग्णवाहिकेचा लोकार्पण मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. प्रसंगी मा. स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (वैद्यकीय) संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश जाधव, डॉ. अंजली पाटील, महानगरपालिका अधिकारी, आरोग्य विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.