Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

यंदाच्या वर्षी स्वच्छतेची दिवाळी हा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे

शेवटचा बदल November 14th, 2021 at 02:44 pm

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात यंदाच्या वर्षी स्वच्छतेची दिवाळी हा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.त्या अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व चौक दिपावलीच्या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघणार आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध चौक हे स्वच्छ करण्याचे काम उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. महापालिका यंदा  स्वच्छतेची दिवाळी हा नाविन्यपूर्ण उपक्रम येत्या दिवाळीत शहरात राबविला जाणार आहे.यात शहरातील सर्व चौक हे नेहमीप्रमाणे स्वच्छ तर केलेच जाणार आहेत.मात्र येत्या दिवाळीत या सर्व चौकांमध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने रांगोळ्या काढण्यात येणार असून त्याठिकाणी सरासरी १००० पणत्या लावण्यात येणार आहेत.यामुळे सर्व चौक हे पणत्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघणार आहेत.

महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांनी चौक स्वच्छतेचे काम सुरू केले असून,त्यावर सहा.आयुक्त सचिन बच्छाव, स्वच्छता अधिकारी श्री.राजकुमार कांबळे व श्री.संदीप शिंदे हे लक्ष ठेवून आहेत.

आपल्या शहरातील या नाविन्यपूर्ण उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त अजित मुठे यांनी केले आहे.