Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल October 18th, 2021 at 08:33 am

Birth & Death

Department headContact no.E-mail
डॉ. प्रकाश जाधव022-28192828-275birth.death@mbmc.gov.in

प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या जन्म- मृत्यु विभागात वर्ष २ पासुन संगणकीय दाखले वितरीत केले जातात. सदर दाखले वितरीत करणे करिता सध्या दोन संगणकिय आज्ञावली कार्यरत आहेत.  दहन / दफन दाखले देण्याची व्यवस्था मुख्य कार्यालय येथे २४ तास व सुटटिच्या दिवशी उपलब्ध आहे. प्रभाग क्र. 05 व 06 मिरा रोड येथुन कार्यालयीन वेळेत दहन/ दफन दाखले वितरीत केले जातात.

कामकाज

जन्म मृत्यु विभागाची कार्यप्रणाली (विभागाची कामे)

मिरा भाईंदर महानगर पालिका, जन्म- मृत्यु विभागाचा शहरातील घड्लेल्या प्रत्येक जन्म व मृत्यु घटनेची नोंद त्वरीत घेण्याचा मानस असतो. सदर गोष्टी तत्परतेने घेणे करिता शासकिय व खाजगी इस्पितळांत होणा-या प्रत्येक जन्माची नोंद संगणकीय आज्ञावली द्वारे त्वरीत घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जन्म- मृत्यु नोंद २१ दिवसांच्या आत होणे करिता योग्य त्या सुचना सर्व इस्पितळ, क्लिनिक यांना देण्यात आल्या आहेत.

जन्म दाखला नागरिकांना त्वरीत मिळणे करिता नागरि सुविधा केंद्र मुख्य कार्यालय भाईंदर (प) येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

जन्म नोंदणी करणे करिता लागणारे आवश्यक कागदपत्र :-
 1. शासकिय व खाजगी इस्पितळांत झालेले जन्म :-
  • शासकिय व खाजगी इस्पितळांत झालेल्या जन्माची नोंद इस्पितळांतुनच प्रत्येक जन्माची नोंद संगणकीय आज्ञावलीत करण्यात येते.
  • मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील इस्पितळांची नावे.
 2. घरी जन्म झालेल्या बालकांची जन्म नोंदणी :-
  • मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात घरी जन्म झालेल्या बालकांची नोंद सदर क्षेत्रांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचे पत्र.
  • आई-वडिलांचे ओळखपत्राची छायांकीत प्रत.
  • आई-वडिलांच्या रहिवाशी पत्ता सिध्द करणारे कागदपत्रांची छायांकीत प्रत.
 3. अनुउपल्बधता प्रमाणपत्र:-
  • जन्म 1965 पुर्वी असल्यास नमुना क्र. 10 (अ)
  • जन्म 1965 नंतर असल्यास नमुना क्र. 10 (ब)
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पोलीस पाटलांचे पत्र
जन्म दाखला प्राप्त करणे करिता लागणारी कार्यप्रणाली-
 1. जन्म दाखला विनंती अर्ज भरून देणे.
 2. घोषणा पत्राचा नमुना अर्ज भरुन देणे.
 3. आई/वडिलांचे आधार कार्ड इतर ओळख पत्राची छायांकीत प्रत देणे.
 4. डिस्चार्ज कार्ड छायांकीत प्रत देणे.
उशीरा जन्म नोंदणी साठी लागणारी फी कलम 13 अन्वये
 1. 21 दिवसानंतर 30 दिवसांच्या आत नोंदवण्यात आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (1) अन्वये रू. 2/-
 2. 30 दिवसानंतर व 01 वर्षाच्या आत नोंदवण्यात आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (2) अन्वये रू. 5/-
 3. 01 वर्षानंतर नोंदवण्यायत आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (3) अन्वये रू. 10/-
मृत्यु दाखला प्राप्त करणे करिता लागणारी कार्यप्रणाली-
 1. मृत्यु दाखला विनंती अर्ज भरून देणे.
 2. मयत व्यक्तिच्या दहन दफन दाखल्याची छायांकीत प्रत जोड्णे.
 3. मयत व्यक्तिचा नमुना ४ अगर नमुना ४ अ याची छायांकीत प्रत जोडणे.
 4. तसेच मृत्यु दाखला प्राप्त करणे करिता आलेल्या व्यक्तिच्या ओळखपत्राची छायांकीत प्रत जोड्णे.
 5. मयत व्याक्तिच्या आधार कार्डची छायांकीत प्रत देणे.
उशीरा मृत्यु नोंदणी साठी लागणारी फी कलम 13 अन्वये
 1. 21 दिवसानंतर 30 दिवसांच्या आत नोंदवण्यात आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (1) अन्वये रू. 2/-
 2. 30 दिवसानंतर व 01 वर्षाच्या आत नोंदवण्यात आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (2) अन्वये रू. 5/-
 3. 01 वर्षानंतर नोंदवण्यायत आलेल्या जन्म नोंदणी साठी कलम 13 (3) अन्वये रू. 10/-

वरील दाखले प्राप्त करणे आधी जन्म व मृत्यु या घटनांची नोंद जन्म व मृत्यु अभिलेखात व संगणकात घेतली जाते.

सदर नोंद हया जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यु नोंदणी नियम, २००० ची अंमलबजावणी नुसार घेतल्या जातात. तसेच मयत व्यक्तिला दहन / दफन करणे करिता दहन / दफन दाखला दिला जातो.

नागरीकांची सनद

जन्म-मृत्यु नोंदणी बाबत
कामाचा तपशील काम पुर्ण होण्याचा कालावधी संपर्क अधिकारी व कार्यालय
१ वर्षे वयापर्यंत जन्म-मृत्यु नोंदणी 1 ते 2 दिवस जन्म-मृत्यु नोंदणी उप-निबंधक, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
१ वर्षे ते १० वर्षे वयोमर्यादेपर्यंतचे जन्म-मृत्यु नोंदणी कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशानंतर ३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी उप-निबंधक, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
जन्म-मृत्यु प्रमाणपत्र १ दिवस उप-निबंधक नागरी सुविधा केंद्र, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
उपजत मृत्यु दफन दाखला १ दिवस उप-निबंधक नागरी सुविधा केंद्र, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
जन्म-मृत्यु नोंद नसलेबाबत प्रमाणपत्र १ दिवस उप-निबंधक नागरी सुविधा केंद्र, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
जन्म-मृत्यु नोंद सुधारणा कागदपत्राची पुर्तता ल्यानंतर 1 ते 2 दिवस जन्म-मृत्यु नोंदणी उप-निबंधक, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
दहन/दफन दाखला त्वरीत (२४ तास) प्राधिकृत कर्मचारी, पहीला मजला, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
दहन/दफन दाखला सुट्टीचे दिवस वगळुन (कार्यालयीन वेळेत) प्राधिकृत कर्मचारी, प्रभाग कार्यालय क्र. ५ व ६, मिरा रोड पुर्व

कर्मचारी माहिती

जॉबचार्ट

जन्म-मृत्यु विभागात कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांची माहिती
Designation एकुण कार्यरत पदे कार्यरत पदावरील अधिकारी/कर्मचा-यांचे नाव त्यांचेकडील कार्यभार दुरध्वनी क्र. व बसण्याचे ठिकाण
प्रभारी उप-निबंधक लिपीक 1 मेह्बुब खोजिया जन्म-मृत्यु दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करुन प्रमाणित करणे, जन्म-मृत्यु दाखल्यांवर स्वाक्षरी करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण
करणे, जन्म-मृत्यु नोंदीची दुरुस्ती करणे, आवक-जावक, नागरीकांच्या पत्राची उत्तरे देणे, माहिती अधिकारात आलेल्या पत्राची उत्तरे देणे, आवक-
जावक, नागरीकांच्या पत्राची उत्तरे देणे इ.
०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २४८) व ०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय
शिपाई 2 दिपक जेवळीकर दहन-दफण दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे. ०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय


रमेश पवार दहन-दफण दाखले देणे. वरीलप्रमाणे
सफाई कामगार 6 संजय नाईक जन्म-मृत्यु रजिस्टर व तक्ते लिपीकास तपासणीसाठी काढुन देणे,
जन्म-मृत्यु प्रमाणपत्राचे अर्ज स्विकारणे व अहवाल ठेवणे, दैनंदिन
चलन भरणे इ.
०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय


निरंजन राऊत दहन-दफण दाखले देणे,जन्म-मृत्यु मासिक अहवाल तयार करुन पुणे येथे पाठविणे व मृत्यु रजिस्टर लिहीणे. वरीलप्रमाणे


हेमंत पाटील जन्म-मृत्यु रजिस्टर व तक्ते लिपीकास तपासणीसाठी काढुन देणे, जन्म-मृत्यु प्रमाणपत्राचे अर्ज स्विकारणे व अहवाल ठेवणे, दैनंदिन चलन भरणे इ. वरीलप्रमाणे


संदिप सावंत दहन-दफण दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे. वरीलप्रमाणे


सुनिल म्हात्रे दहन-दफण दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे. वरीलप्रमाणे


अर्जुन येडुमलई दहन-दफण दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे. वरीलप्रमाणे


मारूती जाधव दहन-दफण दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे. वरीलप्रमाणे
बालवाडी शिक्षिका 1 पुनम माळी जुने जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे. ०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५)नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय


वनिता सिंग जुने जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे. वरीलप्रमाणे


ज्योत्सना माछी जुने जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे. वरीलप्रमाणे
संगणक चालक तथ लिपीक 4 मंजिरी पेंडसे
–जोशी
जन्म-मृत्यु विभागातील जन्म-मृत्यु
दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करूण दाखले वितरीत करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु दाखल्यात वरिष्ठांच्या
आदेशानुसार योग्य ती दुरूस्ती करणे, टपाल व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे देणे, जन्म-मृत्यु च्या नोंदीचे संगणकीकरण करणे, रुग्णालयाकडुन येणाऱ्या जन्म नोंदी स्वीकारणे
०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय


मनिषा पाटील जन्म-मृत्यु विभागातील जन्म-मृत्यु दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करूण दाखले वितरीत करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु दाखल्यात वरिष्ठांच्या
आदेशानुसार योग्य ती दुरूस्ती करणे, टपाल व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे देणे, जन्म-मृत्यु च्या नोंदीचे संगणकीकरण करणे, रुग्णालयाकडुन येणाऱ्या जन्म नोंदी स्वीकारणे
वरीलप्रमाणे


हर्षाली सहदेव गावडे जन्म-मृत्यु विभागातील जन्म-मृत्यु दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करूण दाखले वितरीत करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु दाखल्यात वरिष्ठांच्या
आदेशानुसार योग्य ती दुरूस्ती करणे, टपाल व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे देणे, जन्म-मृत्यु च्या नोंदीचे संगणकीकरण करणे, रुग्णालयाकडुन येणाऱ्या जन्म नोंदी स्वीकारणे
वरीलप्रमाणे


शामल घरत – जोशी जन्म-मृत्यु विभागातील जन्म-मृत्यु दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करूण दाखले वितरीत करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु दाखल्यात वरिष्ठांच्या
आदेशानुसार योग्य ती दुरूस्ती करणे, टपाल व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे देणे, जन्म-मृत्यु च्या नोंदीचे संगणकीकरण करणे, रुग्णालयाकडुन येणाऱ्या जन्म नोंदी स्वीकारणे
वरीलप्रमाणे

छायाचित्र

६०(अ) विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे ( १३ मुद्यांची माहिती )

माहिती अधिकार पत्र/उत्तर माहिती (माहितीचा अधिकारी प्राप्त अपील व उत्तरे )

विभागाने राबिवलेले विविध कार्यक्रम यांची सविस्तर माहिती

RTS अंतर्गत सेवा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – २०१५ अंतर्गत नागरीकांना द्यावयाच्या सेवा

No. लोकासेवांची सुची आवश्यक कागदपत्र फी नियम कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
 1 जन्म प्रमाणपत्र विहीत नमुन्यातील अर्ज प्रति प्रत रु . १० ३ दिवस वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपायुक्त ( आरोग्य )
 2 मृत्यू प्रमाणपत्र विहीत नमुन्यातील अर्ज प्रति प्रत रु . १० ३ दिवस वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपायुक्त ( आरोग्य )