Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल October 18th, 2021 at 07:16 am

Corona

राष्ट्रीय कॉल सेंटर :
०११ – २३९७८०४६

बेड व्यवस्थापन

हेल्पलाईन : १०४

अतिरिक्त बिल आल्यास :
०२० – २५५० २११५

About COVIC - 2019 & other important informaiton
कोरोना विषाणूसंबधी माहिती आणि घ्यावयाची काळजी
कोरोना विषाणू-सर्वसाधारण माहिती
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरु झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास 'कोविड-१९' असे नाव दिले आहे.
कोरोनाचे मूळस्थान:
कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे
ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप,न्युमोनिया,काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
फोटो गॅलरी
अप्पासाहेब धर्माध‍िाकरी कोवीड केअर सेंटर