Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल January 5th, 2023 at 10:29 am

आपत्ती व्यवस्थापन विभाग

Name of the departmentDisaster Management
उपआयुक्तांचे नांवश्री. मारुती गायकवाड
Department Head and positionश्रीम. मनस्वी म्हात्रे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा सिस्टीम ॲनालिस्ट
Emaildm.mbmc@gmail.com/dm@mbmc.gov.in

INTRODUCTION

 

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २९०० मिली मिटर आहे. महानगरपालिका हद्दीत साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवडयातच पर्जन्यवृष्टीस सुरूवात होते व माहे सप्टेंबर पर्यंत सुरू राहतो.

संभाव्य आपत्ती व व्यवस्थापन

1)  अतिवृष्टी व पूर परिस्थिती

2)  पाणी तुंबणे

3)  धोकादायक इमारती

4)  झाडे कोसळणे

5)  विज पडणे व विजेचा धक्का लागणे

6)  रोगराई

7)  त्सुनामी

8)  भूकंप

9)  दरड कोसळणे

10)   ईमारत कोसळणे

11)   साथरोग

12)   अन्न विषबाधा

13)   आगीपासून संरक्षणासाठी

14)   आग

15)   बॉम्बस्फोट

16)   भूकंप

17)   दरड कोसळणे

18)   पूर

19)   गर्दीचे ठिकाण

20)   वीज पडणे

21)   वायूगळती

22)   रसायनांची गळती

23)   रस्ते अपघात

विभागाचे काम

 

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये खालीलप्रमाणे कामकाज केले जाते :

1) शहरात येणाऱ्या नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तीच्या वेळेस नागरीकांना सोई –  सुविधा पुरविणे.

2) अशा आपत्ती वा आपात्कालीन परीस्थितीमध्ये नागरीकांना सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे.

3) शहरामध्ये आपत्ती वा आपात्कालीन परीस्थितीमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करणे.

4) आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करून त्या अनुषंगाने कार्यवाही करणे.

5) मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

6) आपत्ती बाबत नागरीकांच्या तक्रारी स्विकारून संबंधित विभागाकडून सदर बाबत कार्यवाही करणे.

7) मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.

8) शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.

9) अधिकारी तथा कर्मचारी यांचेकरीता प्रशिक्षणांचे आयोजन करणे.

10) बाधितांकरीता मदत, निवारा, खान-पान अथवा पुनर्वसनाची सोय करणे

जॉब चार्ट -2022-23

Responsibilities and Duties of Officers/Employees

अनु क्र.

Designation

कायदेशीर तरतूद

Responsibilities and Duties

1)

उप-आयुक्त

(आपत्ती व्यवस्थापन)

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005

1.       शहर आपत्ती धोके न्यूनीकरण कार्यक्रम अंतर्गत कामकाजावर नियंत्रण करणे.

2.       महापालिका कार्यक्षेत्रातील होणाऱ्या घटनांच्या अनुसरुन मदत कार्याचे नियोजन करणे.

3.       आपत्तीच्या वेळी आवश्यक साहित्य/ यंत्रसामग्री खरेदी करणेकरीता अर्थसंकल्पामध्ये आवश्यक निधी/ तरतूद करणे.

4.       आपत्ती व्यवस्थापन विभाग व सुरक्षा विभागाचे कार्यालयिन कामकाजावज नियंत्रण ठेवणे.

5.       नियंत्रण कक्ष सुसज्ज व अद्यावत ठेवणे.

6.       आपत्तीच्या परिस्थितीत संबंधित विभागांशी समन्वय साधणे व त्यानुसार आदेश देऊन कार्यवाहीची पुर्तता करणे.

7.       मा.जिल्हाधिकारी कार्यालय/ राज्य शासन यांचेकडून प्राप्त माहिती/ आदेश सर्व विभागांना कळवून दक्षतेचा इशारा देणे

8.       माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

2)

आपत्ती व्यवस्थापन प्रमुख

 

 

 

 

 

 

 

1.          आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 ची अंमलबजावणी करणे

2.          शहर आपत्ती धोके न्यूनीकरण कार्यक्रम अंतर्गत कामकाज व अंमलबजावणी करणे.

3.          आपत्ती बाबतची माहिती व अहवाल वरीष्ठांना कळविणे.

4.          नियंत्रण कक्ष सुसज्ज व अद्यावत ठेवणे.

5.          आपत्तीचे वेळेस अधिकारी/ कर्मचारी मदत कार्य पथके व उपलब्ध साधन सामुग्री यांचा समन्वय साधणे.

6.          इतर सरकारी तसेच निमसरकारी संस्थाचा समन्वये साधणे/ मदत घेणे माहिती घेणे.

7.          आपत्ती व्यवस्थापनकरीता आवश्यक कामांचे व सामुग्री खरेदी करणे निविदा व त्याबाबतची कार्यवाहीकरीता प्रस्ताव तयार करणे.

8.          नियंत्रण कक्ष 24X7 असे वर्षाचे 365 दिवस सुस्थितीत व अद्यावत ठेवणे.

9.          आपत्ती बाबतची माहिती व अहवाल मा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्वरीत कळविणे.

10.       आपत्ती व्यवस्थापन कक्षातील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजा संबंधित नस्ती तपासून  प्रस्तावित करणे.

11.       माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

3)

नियंत्रण कर्मचारी :- महानगरपालिकेने वेळोवेळी नेमणूक केलेले कर्मचारी

(3 पाळ्यांमध्ये)

 

1.          आपत्तीच्या वेळेस नियंत्रण कक्षातून इतर विभागातील अधिकारी यांचेशी समन्वय साधणे.

2.          पावसाळा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील पावसाची नोंद घेणे.

3.          नियंत्रण कक्षातील नागरीकांच्या तक्रारी दुरध्वनीवरून स्विकारणे व त्यांची नोंद घेणे व संबंधित विभागांना त्याबाबत कळविणे.

4.          आपल्या जागी दुसरा कर्मचारी हजर झाल्याशिवाय आपत्ती नियंत्रण कक्ष न सोडणे.