Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

मिरा भाईंदरमध्ये 525 दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जन

मीरा भाईंदर महानगरपालिकाक्षेत्रातील पारंपरिक विसर्जन स्थळांसोबत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्याकरता निर्माण करण्यात आलेल्या स्वीकृती केंद्रावर तसेच नैसर्गिक तलाव, समुद्र या ठिकाणी नवदुर्गाच्या एकूण ५२५ मूर्तींचे तर ६ हजार ९८८ घटांचे विसर्जन करण्यात आले आहे. कोविडच प्रादुर्भाव वाढू नये या उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळांवरगर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यां दृष्टीने स्वीकृती केंद्रांची उपाययोजना करण्यात आली होती.

पालिकेच्या ६ प्रभागातील नैसर्गिकतलाव, समुद्रात व स्वीकृती केंद्रावर नवदुर्गाचे. ५२५ मूर्तींचे विसर्जन व ६ हजार ९८८ घटांचे विसर्जन करण्यात आले. नवदुर्गा विसर्जन सोहळा
आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड नियमांचे पालन करून सर्व ठिकाणी शांततेत पार पडला.