Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल March 16th, 2022 at 11:04 am

Education Department

Department head Contact no. E-mail Office hours Period of weekly leave and special services
 Priyanka Bhosale
              7972539718 education@mbmc.gov.in 10:00 a.m. to 5:45 p.m. Second, fourth Saturday, Sunday and public holiday
प्रस्तावना

दि. 22/02/1994 रोजी जिल्हा परिषदेकडुन मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे विविध माध्यमाच्या 28 शाळा (मराठी, हिंदी, उर्दु व गुजराती) इमारती व 202 शिक्षकांसह हस्तांतरण झाल्या आहेत. त्यानंतर दि. 28/02/2002 साली मिरा भाईंदर महानगरपालिकेचे रुपांतर झाले असुन दि. 21/04/2006 मध्ये शासन राजपत्रात शिक्षण विभाग अस्तित्वात आले. आजमितीस मनपाच्या 36 शाळा (मराठी-21, हिंदी-5, उर्दु-5 गुजराती-5) असुन त्यात 7030 विदयार्थी शिक्षण घेतात व 158 शिक्षक कार्यरत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विदयार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये हा शिक्षण विभागाचे मुख्य उद्रदेश असुन त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात व शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोबाईल टिचरांमार्फत सर्वेक्षण केले जातात.

मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षणविभागाच्या शाळेत शिक्षण घेणारे विदयार्थी हे तळागळातील गोरगरीब व गरजु समाजातील जीवन जगणाऱ्या पालकांची असल्याने त्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास होणे करिता शिक्षण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात व सर्व सुविधा (गणवेश, बुट, वहया, पुस्तके, संगणक प्रशिक्षण) मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच शासनाच्या शालेय पोषण आहारा अंतर्गत विदयार्थ्यांना दैनंदिन अन्न शिजवुन खिचडी देण्यात येते.

सन 2020-21 या वर्षात मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग हे मिरा भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण व देखरेखीचे काम करते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग (अंध, मतीमंद, मुकबधिर इ.) मुलांचे सर्वेक्षण करून जे विदयार्थी शाळेत जाऊ शकत नाही अशा विदयार्थ्यांना घरोघरी जाऊन मोबाईल टिचरांमार्फत शिक्षण दिले जाते. तसेच विशेष गरजा असलेल्या विदयार्थ्यांचे (दिव्यांग) शिबीर लाऊन शिबीरात वैदयकिय तपासणी करुन त्यांच्या अपंगत्वाच्या गरजेप्रमाणे त्यांना आवश्यक साहित्य साधने (चष्मे, कॅलिपर, व्हिलचेअर इत्यादी) मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात.

अशा प्रकारे मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विदयार्थी शिक्षणा पासुन वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागामार्फत घेतली जाते.

शालेय पोषण आहार योजनेची माहिती

शालेय पोषण आहार (Mid- Day Meal) ही योजना इ. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत इ. 1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडुन प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च्‍ा प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदुळ पुरविण्यात येतो.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या महानगरपालिकेच्या 36 शाळा आणि खाजगी अनुदानित 17 शाळा अशा एकुण 53 शाळांमध्ये योजना प्राथमिक व उच्च प्राथमिक मध्ये राबविली जाते. इ. 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना 100 ग्रॅम आणि इ. 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम तांदुळ प्रती दिन प्रति विद्यार्थी वाटप केला जातो. 

शहरी भागामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासनाकडुन तांदुळ प्राप्त होत असुन विद्यार्थ्यांना तयार अन्नाचा पुरवठा केला जातो. तयार अन्नाचा पुरवठा करणाऱ्यांना पुरवठादारांना प्रति दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे शासनाने अद्यावत केलेल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये मुख्याध्यापकांमार्फत इ. 1 ली ते 5 वी साठी 4.48 आणि इ.6 वी ते 8 वी साठी 6.71 या दरानुसार प्रति दिन लाभार्थी विद्यार्थ्यांची एम. डी. एम. ॲपद्वारे नोंद करुन ऑनलाईन प्रणालीद्वारे मानधन प्राप्त होते.

शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार शाळेच्या खात्‍यावर मा. शिक्षण संचालक, पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे मानधन जमा होते.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण राज्यभर दिनांक 23 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन होते. सदर कालावधीमध्ये राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक असलेला तांदुळे विद्यार्थी/पालकांना वितरीत करणेबाबत शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या पत्रातील मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना धान्याचे (तांदुळ, मुगडाळ, हरभरा, मसुरडाळ) वाटप करण्यात आलेले आहे.

योजनेची उद्दिष्ट-

1) प्राथमिक शाळांमधील पटनोंदणी वाढविणे

2) विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे

3) सर्व पात्र लाभार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे

4) विद्यार्थ्यांचे अध्ययनाकडे लक्षकेंद्रीत करणे

5) सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणेबाबत शाळेचे मुख्याध्यापकांना व सर्व संबंधितांना शासन निर्देशानुसार कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

विशेष शिक्षण

मिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले दुसुऱ्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे शैक्षणक साहित्य मोफत पुरविले जाते. आधुनिक तंत्रज्ञाच्या दुनियेत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष ल्क्ष देतात व त्यांचा शैक्षणिक तसेच गुणात्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.

भारत सरकारने देशात मिशन पध्दतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियान ही व्यापक व एकात्मिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने व स्थानिक स्वराज्या संस्थांच्या सहभागाने सुरू केलेली सर्व शिक्षा अभियान ही एक चांगली योजना असुन त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त व पर्याप्त शिक्षण देणे, मुलांना दर्जेदार शिक्षण देणे, मुलांची उपस्थिती वाढविणे व मुलांची १००% पटसंख्या टिकवून ठेवणे हा मुख्या उद्दश आहे. या योजने अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असुन त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक प्रशिक्षण, मुलींसाठी NPEGEL विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी (अपंग) अपंग समावेशित शिक्षण हे महत्वाचे उपक्रम राबविले जातात.

शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सामान्य विद्यार्थ्यांना व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना (अपंग विद्यार्थी) कोणत्याही नजीकच्या समकक्ष वयानुसार शाळेत प्रवेश देणे व वर्गात शिक्षणाचा हक्क व संधी मिळवून दिली जाते. मिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली शाळेत आणून किंवा विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर हॉस्पीटलमध्ये योग्यते उपचार केले जातात.

शैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांच्या क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकावर आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रश्नांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना फिजिओथेरेपी, ऑक्युपेश्नल थेरेपी व स्पीच थेरेपीची गरज आहे, अशा मुलांना थेरेपी देण्याचे काम मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी, भाईंदर (पूर्व) येथे चालु करण्यात आले आहे. थेरेपीची गरज असलेल्या मुलांना थेरेपी देण्यासाठी मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत टिकविणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळवुन देण्यासाठी मुलांच्या गरजेनुरूप मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्यभूत सेवांचे माहिती प्रपत्र व सेवांची मागणी करण्यासाठीचे मागणीपत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तरी आपण आपल्या अवतीभवती किंवा परिसरात विशेष गरज असणारी मुले (अपंग) आढळून आल्यास त्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणाऱ्या सेवा-सुविधा मिळण्यासाठी व अधिक माहितीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन), तिसरा मजला, भाईंदर (प.), दुरध्वनी क्र. २८१९ ०२२३ येथे संपर्क साधावा.

विद्यार्थी व पालक समर्थन

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना चांगले व अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देते. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही विनामुल्य उपलब्ध करून देते. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालक वर्ग तोच शहरातील लोकप्रतिनिधी समाधानी असुन त्यांचेही अमूल्य असे सहकार्य शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण मंडळास देत असतात. यापुढे ही त्यांना सोबत घेवून शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नविन व आजच्या अत्याधुनिक जगातील उपयोगी अशा वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत. मिरा-भाईंदर शहरातील रहिवाशी शाळांबाबत किवा शिक्षणा विषयी इतर कोणत्याही तक्रारी असल्यास ते शिक्षण मंडळ कार्यालयात येवुन तक्रार करता. तक्रार असलेल्या शाळेच्या संस्थाचालकांना, मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना समोर बालावुन प्रशासन अधिकारी यांच्यासह शिक्षण मंडळ सदस्य तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करतात.

शाळा प्रवेश - अटी आणि नियम

मिरा-भाईंदर महानगरपाकिा शिक्षण मंडळ संचलित मनपा शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम 1949 अन्वये शालेयस्तरावर पालकांकडुन विनामुल्य प्रवेश अर्ज भरून घेतला जातो. ज्या पालकांकउे विद्यार्थ्यांचा जन्मदाखला आहे किवा शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यानुसार त्यांना त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. तसेच शासनाचा बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत जर एखादा शाळाबाहय विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप किवा त्याची परीक्षा घेवुन योग्य त्या वर्गात प्रवेश देवुन त्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता विनामुल्य प्रवेश दिला जातो.

तसेच मध्येच दुसऱ्या राज्यातुन किवा जिल्हयातुन आलेल्या एखादा विद्यार्थ्यास प्रवेश हवा असेल तर रितसर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला तपासुन त्यावर सदर जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असल्यास प्रशासन अधिकारी यांच्या मूंजरीने सदर विद्यार्थ्यास मिरा-भाईंर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रातील शाळेत प्रवेश देण्यात येतो. कायम विना अनुदानित शाळेत प्रवेश देताना पहिला शाळा प्रवेशाचा अर्ज दिला जातो. नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

प्रत्येक मुलं महत्वाचे आहे

मिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रात मनपाच्या एकूण ३५ शाळा, खाजगी अनुदानित २० शाळा व खाजगी विना अनुदानित एकूण ९ शाळा आहेत. मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालाकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे साहित्य मोफत पुरविले जाते. या तंत्रज्ञाच्या दुनियत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देवुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करून त्यांचा शैक्षणिक तसेच गुणत्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.

मिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली विशेष गरज असणाऱ्या १७९५ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी १८ विशेष शिक्षकांची व ४ थेरीपिस्टची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर योग्यते उपचार केले जातात.

शैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांचया क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकावर आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रशनांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणू करण्यात आली आहे.

Tenders

सन 2020-21 आणि सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण विभाग कार्यालयातुन कोणत्याच प्रकारच्या निविदा काढलेल्या नाहीत.

Quotations

सन 2020-21 आणि सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण विभाग कार्यालयातुन कोणत्याच प्रकारचे दरपत्रके मागविण्यात आलेली नाही.

Order

सन 2020-21 आणि सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण विभाग कार्यालयातुन कोणत्याच प्रकारचे कार्यादेश देण्यात आलेले नाही.

शिक्षण विभागकार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती
No.कर्मचाऱ्यांचे NameDesignationदि. पासून शिक्षण विभागात कार्यरत मोबाईल नंबर
1उर्मिला भाऊसाहेब पारधेशिक्षणाधिकारी12/06/20148425842242
2अलका मदन पाटीलबालवाडी शिक्षिका तथा लिपिक (आस्थापना)07/09/20157208881535
3सत्यवान पाटीलवाहन चालक01/01/20058422904577
4प्रविण दिवे (अपंग)सफाई कामगार28/04/20209699151632
5निलेश कोंगारे (अपंग)सफाई कामगार11/07/20179653122883
6योगेश पाटील (अपंग)सफाई कामगार19/09/20199867424392
7विजया म्हात्रेसफाई कामगार19/09/20199222536159
8सुदाम गबाळेरखवालदार02/03/20158424968658
9प्रज्ञा गवळी- ठाकुरसंगणक चालक तथा लिपिक (ठेका)09/12/20159930193367
10प्रतिक्षा मालुसरेडेटा एंन्ट्री ऑपरेटर (शा. पो. आ)26/12/20168983339388
  • मनपा शाळा – 36
  • खाजगी अनुदानित शाळा – 17
  • विना अनुदानित – 33
  • स्वयं अर्थसहाय्य शाळा – 268
  • मान्यता प्राप्त नसलेल्या (अनाधिकृत) – 03
    एकुण -382
शिक्षण विभाग प्राप्त अनुदान तपशील
No. तपशील शिक्षक संख्या
1 कार्यरत शिक्षक 158
2 सेवानिवृत्त वेतनधारक 148
3 कुटुंबनिवृत्ती वेतनधारक 21
अनुदान प्राप्त तपशील – मनपा (50 टक्के) व शासन 50 टक्के
No. सन मनपा प्राप्त अनुदान (50 टक्के) शासन प्राप्त अनुदान (50 टक्के) एकुण प्राप्त अनुदान शासनाकडुन अप्राप्त अनुदान
1 2016-17 6,20,68,955 6,76,25,848 12,96,94,803  —
2 2017-18 9,08,26,710 5,97,50,684 15,05,77,394  —
3 2018-19 5,64,17,784 8,68,33,526 14,32,51,310  —
4 2019-20 12,11,07,708 6,92,81,700 19,03,89,408 3,21,50,094
5 2020-21 7,55,23,887 6,93,00,836 14,48,24,723  —
मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग आस्थापनेवरील शिक्षक, सेवानिवृत्तधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांचे वेतनासाठी 50% मनपा अनुदान व 50% शासनअनुदान प्राप्त होते. शिक्षण विभागांतर्गत मनपाच्या एकुण 36 शाळा असुन सदयस्थितीत 157 शिक्षक कार्यरत असुन 01 शिक्षक कायम गैरहजर आहेत. तसेच 22 कुटुंबनिवृत्तीधारक असुन 147 सेवानिवृत्तीधारक आहेत.