Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल January 2nd, 2023 at 07:17 am

Asset Management Department

Department headContact no.E-mail
दिपक खांबित (कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक )EXTN. 155 
प्रस्तावना -

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची दि.28/02/2002रोजीस्थापन झाली असुन माहे ऑगस्ट 2013पासुन नव्याने मिळकत विभागाचे काम सुरू केले आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तेचा विनियोग मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949चे कलम 79 नुसार केला जातो.

मिळकत विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रात असणा-या विविध प्रकारच्या महानगरपालिकेच्या मालमत्ता (समाजमंदिरे, व्यायाम शाळा, गाळे, सदनिका, खेळाचे मैदाने, आरक्षणे इ.) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगपालिकेच्या पारित ठरावानुसार, बाजार मुल्य दराप्रमाणे (रेडीरेकनर) मालमत्तेचा विनियोग केला जातो. त्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक‍ महसुल ‍ मिळतो.

सदर मालमत्ता भाडयाने देण्याचे महानगरपालिकेचे धोरण सुलभ आहे.मिरा-भाईंदर महानगरपालिकेची दि.28/02/2002 रोजीस्थापन झाली असुन माहे ऑगस्ट 2013 पासुन नव्याने मिळकत विभागाचे काम सुरू केले आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तेचा विनियोग मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 79 नुसार केला जातो.

मिळकत विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रात असणा-या विविध प्रकारच्या महानगरपालिकेच्या मालमत्ता (समाजमंदिरे, व्यायाम शाळा, गाळे, सदनिका, खेळाचे मैदाने, आरक्षणे इ.) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगपालिकेच्या पारित ठरावानुसार, बाजार मुल्य दराप्रमाणे (रेडीरेकनर) मालमत्तेचा विनियोग केला जातो. त्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक‍ महसुल ‍ मिळतो.

सदर मालमत्ता भाडयाने देण्याचे महानगरपालिकेचे धोरण सुलभ आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका मिळकत विभाग

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक
|
उपअभियंता
|
सहा.आयुक्त
|
कनिष्ठअभियंता
|
 वरिष्ठ लिपिक

मिरा-भाईंदर महानगपालिका येथील मिळकत विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाचा व कर्तव्यांच्या तपशिल

No.

Name of Public Authority

Estate Department

 

1

कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे.

सामान्य प्रशासन

2

अंगीकृत व्रत (Mission)

नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.

3

ध्येय/धोरण (Vision)

महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे

4

प्रत्यक्ष कार्य

नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे.

मिळकत विभागाची कामे मिळकत विभागातील ज्या अधिनियम/नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. महाराष्ट्र महानगरपालि का अधिनियमनियमातील कलम 79अन्वये

अधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय संख्या
No. Designation Post No
1 कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक 1
2 उपअभियंता 1
3 Junior Engineer 1
4 Clerk 1
5 Peon 1
6 Peon 1
अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप
No.पदनिहायक कर्मचारीInformation
1

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

1)    मिळकत विभागास नेमुन दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.

2)    मिळकत विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

3)    माहितीचा अधिकार अधिनियम 2005अन्वये मिळकत विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज करणे.

4)   मा. आयुक्त सो. यांचेकडील आदेश/परीपत्रकानुसार कार्यवाही करणे तसेच नियमानुसार मा. महासभा/ मा स्थायी समिती / मा. आयुक्त सो. यांच्या मंजुरीने महानगररपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.

5)    मा.आयुक्त सो. यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.

 

5

Clerk

1)      महानगरपालिकेच्या मालमत्ता बाजारमुल्य दरानुसार(रेडी रेकनर दर) भाडे ठरवुन यासाठी  निवीदा प्रक्रियेद्वारे संस्था/मंडळे/व्यक्ती यांस भाडेतत्वावर देणे.

2)     To look after the day to day office correspondence work of the department.

3)     सदनीका, भुई भाडे व गाळे यांची बिले बजावुन वसुली करणे.

4)    विभाग प्रमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

6

Clerk

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी भेटी देऊन मालमत्तेचा वापर, सुव्यवस्था व देखभालीचे नियंत्रण ठेवणे बाबत.
7

Peon

1)    कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.

2)    कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.

3)    वरीष्ठ अधिकारी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

नागरिकांची सनद

Index.No.

सेवांचा तपशिल

सेवा पुरवारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुदृा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नाव हुदृा

1.

नगरपालिकेच्या नव्याने होणाऱ्या मालमत्ताची नोंद घेणे

Clerk

30 DAY

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

              

2.

मिळकती भाडे तत्वावर देणे

Clerk

60 days

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

              

3.

भाडे करुना बिले बजाविणे व वसुल करणे

Clerk

365 दिवस

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

              

4.

भाडयाने दिलेल्या मालमत्ता/मिळकती व न दिलेल्या मालमत्ता / मिळकती यांची पाहणी देखभाल करणे, दुरुस्तीचे कामे असल्यास प्रस्तावित करणे.

Clerk

दैनंदिन

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

              

Responsibilities and Duties of Officers/Employees
Index.No. अधिकायांचे नाव नियम/अधिनियमातील तरतुदी कर्तव्यसुची  
1)   कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक 1) महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 73,76, ते 81 व कलम 477 ची अंमलबजावणी करणे. 2)नॅशनल म्युनिसिपल अकाऊंट कोड मध्ये विहित अभिलेख ठेवणे. 3)महाराष्ट्र सार्वजनिक बांधकात नियम 363 ची कार्यवाही करणे. 4)शासनाने वेळोवेळी पारीत केलेले शासन निर्णय 5)महाराष्ट्र नागरी सेवा (सर्व) 1.   महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 49 मध्ये विहित केल्याप्रमाणे आयुक्तांच्या आदेशांच्या अधिन राहुन आयुक्त आपले अधिकार व कर्तव्यापैकी वेळोवेळी सोपवतील असे अधिकारांचा वापर करणे व कर्तव्य पार पाडणे. 2.   मालमत्ता संपादन प्रक्रिया किंवा मालमत्ता विनियोग प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 73 प्रमाणे मा. आयुक्तांच्या वतीने संविदा करणे. 3.   महाराष्ट्र महापालिकेच्या कलम 81 (ब) प्रमाणे महापालिकेचे येणे असलेला थकबाकीदार/ अनधिकृत भोगवटा करणारा भोगवटाधार याला जागेतुन काढुन टाकणे. 4.   अधिनियमाच्या कलम 81 (क) प्रमाणे भाडयाची किंवा नुकसान भरपाईची रक्कम मालमत्ता कराची थकबाकी म्हणुन वसुल करणे. 5.   म्युनिसिपल अकाऊट मॅन्युअल मध्ये विहित केलेल्या नमुना Form GEN-30 मध्ये स्थावर मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF IMMOVABLE PROPERTY) From GEN-31 मध्ये अस्थायी मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF MOVABLE  PROPERTY) आणि Form GEN-32 मध्ये भुमी नोंदवही (REGISTER OF LAND) मध्ये मालमत्तांच्या अद्यायावत नोंदी ठेवणे. 6.   मालमत्तांचा विनियोग करताना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 79 (ड) नुसार जागेचे अधिमुल्य, भाडे किंवा अन्य मोबदला चालु बाजार किंमती नुसार (Ready Reckoner) दराप्रमाणे नगररचना विभागाकडुन भाडे निश्चित करून घेणे. 7.   महापालिका मालमत्तांची नगररचना विभागा मार्फत अधिमुल्य (Valuation) करुन घेणे. 8.   महापालिका मालमत्तांचा विमा उतरविणे. 9.   महापालिका मालमत्तां संदर्भात वेळोवेळी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय प्रस्तावित करणे. 10.  मालमत्ता विभागाच्या अधिनस्त अधिकारी/  कर्मचा-यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे. 11.  शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा.आयुक्तांचे आदेशाप्रमाणे उपस्थित राहणे. 12.  महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे. 13.  मा.महापौर, मा.आयुक्त व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी/ पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणे. 14.  माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे. 15.  मा.आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे 16.  महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 76 प्रमाणे तत्कालीन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांचेकडील मालमत्ता महापालिकेमध्ये निहित करणे, कलम 77 प्रमाणे करार करून मालमत्ता संपादन करण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करणे. मिर-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका मालकीच्या स्वत:च्या जमिनी नाहीत. त्यामुळे नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेले भुखंड शासन यांचेकडे मागणी  करावे लागतात. तसेच नागरिक नागरी सुविधांची मागणी करीत असतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठरावाद्वारे नागरी सुविधांसाठी जागेची मागणी करतात. अशावेळी सदर जागेचे आरक्षण तपासुन संबंधित प्राधिकरणाने जागा वितरित करण्यासंदर्भात कळविल्यानंतर जागेचे अधिमुल्य अदा करणे, त्यास महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे करीता प्रस्ताव सादर करणे. 17.  महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 79 नुसार महापालिका मालमत्तांचा विनीयोग करणे.यामध्ये व्यावसायिक गाळे/जागेचे नगररचना विभागाकडुन रेडीरेकनर दरानुसार भाडे निर्धारीत करणे. वितरणासाठी आवश्यक तेथे लिलाव निविदा प्रक्रिया पुर्ण करणे व प्रकरण निहाय मा.आयुक्त/मा.स्थायी समिती/ ता. महापालिका सर्वसाधारण सभा यांची मान्यता घेणे. सामाजिक वापराचे इमारतीसाठी महापालिकेच्या मंजुर धोरणा नुसार वृत्तपत्रात जाहीर सुचना प्रसिध्द करून अभिव्यक्ती सुचना मागविणे व त्यानुसार पात्र संस्थेची निवड करणे व त्यास महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन समाजमंदिर, बहुउद्देशिय इमारती, व्यायामशाळा यांचे वितरण करणे. 18.  मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचा महापालिकेचा अधिकार याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ७६,७७ व ७८ नुसार कार्यवाही करणे. तसेच महानगरपालिका मालमत्तेच्या विनियोग संबंधी कलम ७९ नुसार कार्यवाही करणे. 19.  महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 80 प्रमाणे मालमत्तेसंबंधी महापालिकेने किंवा महापालिकेविरुध्द केलेल्या दाव्यांमध्ये महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी किंवा दिवाणी न्यायालयामध्ये सुनावणीसाठीची आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करण्याचे प्रस्तावित करणे. 20.  अधिनियमाच्या कलम 81 (ड) प्रमाणे भाडयाची किंवा नुकसान भरपाईची रक्कम मालमत्ता कराची थकबाकी म्हणुन वसुल करण्याचे प्रस्तावित करणे. 21.  उक्त अधिनियमाच्या कलम 81 (ड) प्रमाणे महापालिकेच्या कर्मचा-या बाबतीत त्याच्या वेतनातुन किंवा मजुरीतुन भाडे वसुल करणे. 22.  महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 477 प्रमाणे महापालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीकडुन (आवश्यक असेल तेथे) जागेच्या मालकी संबंधी माहिती मागविणेचे प्रस्तावित करणे. 23.  महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका नियम क्र. 363 नुसार सार्वजनिक इमारतीची व तेथील वस्तुंची (Fixtures & Machinery) व (Plant & Machinery) ची बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिका-याकडुन नियतकालीक तपासणी करण्याचे प्रस्तावित करणे. (Survey & Structural Audit) 24.  विविभागातील सर्व लेखाविषयक लेखे अद्ययावत ठेवणे संदर्भात पर्यवेक्षण करणे. 25.  इमारती भाडे, निवासस्थान भाडे इत्यादीच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणेकरीता संबंधीत कर्मचा-यावर नियंत्रण, पर्यवेक्षण करणे. 26.  अर्थसंकल्प नोंदवही अद्यावत ठेवणे. 27.  कायम तसलमत विषयक कामकाजाचे पर्यवेक्षण करणे. 28.  विभागाकडील लेखापरिक्षणाबाबत पाठपुरावा करून पुर्तता करून घेणे. 29.  भाडे वसूली संदर्भात संबंधित लिपीकावर नियंत्रण व पाठपुरावा करणे. 30.  लेखा व लेखा परिक्षण विषयक सर्व कामे व वैधानिक लेखे उदा. अंदाजपत्रक रजिस्टर, भाडे नियंत्रण नोंद वही व अनुषंगीत इतर कामे. 31.  रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंद वही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे.
2) उपअभियंता 1.   माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये सार्व.माहिती अधिकारी म्हणुन काम पाहणे. 2.   मालमत्ता विभागातील अधिनिस्त कर्मचा-यांवर  प्रशासकीय नियंत्रण व पर्यवेक्षण करणे. 3.   माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मासिक व वार्षिक अहवालाची वेळोवेळी पुर्तता करणे. 4.   कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
3)   Junior Engineer –   1.  मालमत्ता सर्वेक्षण, मोजणी संदर्भांतील कार्यवाही करणे. 2.  जमिन भुईभाडे संदर्भांत जमिनीची मोजणी करणे. 3.  अतिक्रमण विषयक प्रकरणे हाताळणे. 4.  मालमत्तांचे वेळोवेळी सर्वेक्षण करणे व आवश्यक त्याप्रमाणे क्षेत्रफळ  व अनुषंगीक माहिती उपलब्ध करून देणे. तसेच कार्यकारी अभियंता, उपअभिंयता यांनी नेमुन दिलेली कामे.
4)     Senior Clerk   1.   नॅशनल म्युनिसिपल अकाऊट मॅन्युअल मध्ये विहित केलेल्या नमुना Form GEN-30 मध्ये स्थावर मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF IMMOVABLE PROPERTY) From GEN-31 मध्ये अस्थायी मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF MOVABLE  PROPERTY) आणि Form GEN-32 मध्ये भुमी नोंदवही (REGISTER OF LAND) मध्ये मालमत्तांच्या अद्यायावत नोंदी ठेवणे. 2.   मालमत्तांचा विनियोग करताना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 79 (ड) नुसार जागेचे अधिमुल्य,भाडे किंवा अन्य मोबदला चालु बाजार किंमती नुसार (Ready Reckoner) दराप्रमाणे नगररचना विभागाकडुन भाडे निश्चित करून घेणेकरीता प्रस्ताव सादर करणे. 3.   महापालिका मालमत्तांची नगररचना विभागामार्फत अधिमुल्य (Valuation) करुन घेणेबाबत प्रस्ताव सादर करणे. 4.   महापालिका मालमत्तांचा विमा उतरविणे बाबत प्रस्ताव सादर करणे. 5.   सिडको, एम.आय.डी.सी. कडुन हस्तांतरीत होणारे भुखंड करारनाम्यातील अटी-शर्ती प्रमाणे संरक्षित करणे त्यासाठी अभियांत्रीकी विभागामार्फत संरक्षण भिंत घालणे, नामफलक लावणे बाबतची कार्यवाही करणेकरीता प्रस्ताव सादर करणे. 6.   महापालिका मालमत्तांसंदर्भात वेळोवेळी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय प्रस्तावित करणे. 7.   कर्मचा-यांकडे आलेले टपाल पत्र जलद गतीने निपटारा होणेसाठी नियंत्रण ठेवणे तसेच अधिनिस्त  कर्मचा-यांच्या कार्यविविरण नोंदीवहीवरून आठवडा,पंधरवडा, मासिक गोषवारा काढुन वरिष्ठांकडे सादर करणे. 8.   कार्यालयीन कामकाजात प्रशासकीय गतीमानता आणणे व विभागाकडील कामे सुरळीत पार पाडणेसाठी प्रयत्न करणे. 9.   विभागाचे अभिलेख 6 गठ्ठा पध्दतीप्रमाणे ठेवणेबाबतची कार्यवाही करणे, अधिनस्त कर्मचा-यांची दफतर तपासणी करणे. 10. विभागाकडील संपुर्ण विषयासंबंधी प्रशासनीक दुवा म्हणुन आणि इस्टेट मॅनेजर यांचे मार्गदर्शनाखालील जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करणे. 11. मा.उप आयुक्त यांचे आदेशानुसार कामकाज सांभाळणे, कार्यवाही करणे. 12. मालमत्ता हस्तांतरण बाबत कार्यवाही व पाठपुरावा करणे. 13. जमिन भुईभाडे संदर्भात कार्यवाही करणे. 14. मालमत्तेसंबंधी न्यायलयीन प्रकरण हाताळणे व त्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित करणे. 15. मालकी हक्क संबंधी अन्य विभागाकडुन आलेल्या प्रकरणांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तांत्रिक अहवालासह माहिती सादर करणे. 16. वरिष्ठांनी वेळोवेळी सोपलेली कामे. 17. आवक जावक नोंद वहया ठेवणे. 18. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.03 (मध्यवर्ती नोंदणी शाखेतील आवक नोंदवही), नमुना क्र.07 (संचिका नोंद वही), नमुना क्र. 09 (अभिलेख कक्षाकडे पाठविलेल्या संचिकांची नोंदवही), नमुना क्र.11 (नियतकालीन विविरणपत्र-ब (PR-B) यांचे विवरण पत्र ठेवणे. 19. सर्व सभा,बैठका,तारंकित व अतारांकित प्रश्न, महासभा प्रश्नोत्तरे, मा.आयुक्तांकडील बैठका यांची उत्तरे देणे. 20. इतिवृत्त तयार करणे व जतन करणे. 21. रचना व कार्यपध्दतीप्रमाणे 6 गठ्ठे पध्दतीनुसार दप्तर अद्यावत ठेवणे. 22. ई-मेलद्वारे येणा-या तक्रारी (ई-ग्रिवेन्सेस) तपासणे व उत्तरे देणे. इत्यादी 23. स्विय सहाय्यकाशी संबंधीत सर्व कामे व वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली कामे. 24. मालमत्ता विभागाकडील आस्थपना/प्रशासकीय कामकाज पार पाडणे. 25. कायम तसलमत विषयक कामकाज पाहणे. 26. गोपनिय अहवाल संकलित करून वरिष्ठांना सादर करणे. 27. विभागास लागणा-या आवश्यक वस्तुंची मागणी भांडार विभागाकडुन करणे. 28. डेडस्टॉक रजिस्टर अद्यावत ठेवणे. 29. अभिलेख संबंधित कामकाज पाहणे. 30. आयकर व मत्ता दायीत्व संबंधित कामकाज पाहणे. 31. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंद वही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 32. सामाजिक सुविधा संबंधित सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, निवासस्थाने इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्तांचा संपादन, विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 33. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, शाळेय इमारती विनियोग महानगरपालिका निवासस्थाने नियंत्रण, भाडेकरार, वसुली, जाहिरात व त्याचे करारनामे करणेसंबंधीचे कामकाज पाहणे. 34. सामाजिक सुविधा संबंधित सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, निवासस्थाने इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्तांचा संपादन, विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 35. निवास्थान इमारतीची देखभाल देयके प्रस्तुत करणे. 36. नॅशनल म्युनिसीपल अकाऊंट कोडप्रमाणे, स्थायी मालमत्ता (Immovable) रजिस्टर अद्यावत ठेवणे. 37. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंदवही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 38. व्यवसायीक प्रयोजन संबंधीत सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. दुकान-गाळे, मार्केट गाळे, कार्यालये, ओटले-पिचेस, तलाव इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्ताचा संपादन विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 39. महापालिका इमारतीची देखभाल देयके प्रस्तुत करणे. 40. नॅशनल म्युनिसीपल अकाऊंट कोड प्रमाणे, स्थायी मालमत्ता (Immovable) रजिस्टर अद्यावत ठेवणे. 41. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंद वही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 42. मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे निहित झालेल्या सर्व मालमत्तांच्या नोंदी ठेवणे. शासन, केंद्र शासन, सिडको व एम.आय.डी.सी. यांचेकडे भूखंड/जागा हस्तांतरण करणेबाबत पाठपुरावा करणे आणि सदर बाबतीत आवश्यकतेप्रमाणे वरिष्ठांना माहिती सादर करणे. 43. सिडको व एम.आय.डी.सी. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, जिल्हापरिषद ठाणे व शासन यांचेकडील आलेल्या विविध मिळकतीचे दस्ताऐवज उपलब्ध ठेवणे, आवश्यकतेप्रमाणे मागणी करणे, सर्व मालमत्तांच्या नोंदी ठेवणे, नोंदणी रजिस्टर अद्यायावत ठेवणे तसेच त्याचे करारनामा, मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक वसूलीबाबत अद्यायावत माहिती ठेवणे. 44. भूमी अभिलेख, मालमत्ता हस्तांतरण व जमिन  याबाबत कार्यवाही करणे. 45. वरीष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे.

खात्याचे नाव :- मिळकत विभाग

No.

सार्वजनिक प्राधिकरणाची निर्मीती कारकनुसार विभागणी

Name of Public Authority

 ठिकाण/ संपुर्ण पत्ता

1

राज्यघटनेतच अनुस्युत किंवा राज्यघटनेनुसारनिर्मीती

Estate Department

 

मिरा-भाईंदर महानगपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 107

Contact no. : 28192828

 

2

संसदेने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती

3

विधान मंडळाने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती

4

संबंधित राज्य वा केंद्र शासनाच्या परिपत्रकाने वा आदेशाने निर्मीती

अपिलीय अधिकारी यांची तपशिलावर माहिती

Index.No.

अधिकार पद

अपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा

संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक

1

कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक

Estate Department

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, of (.),

दुरध्वनी क्र. 8422811340

Index.No.

अधिकार पद

माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा

संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक

1

उप अभियंता

Estate Department

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, of (.),

दुरध्वनी क्र. 8422811350

Index.No.

अधिकार पद

Asst.. Information

संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक

1

कनिष्ठ अभिंयता

Estate Department

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, of (.),

दुरध्वनी क्र. 9152078533