शेवटचा बदल December 26th, 2022 at 11:03 am

Garden Department
उप. आयुक्त (उद्यान व वृक्ष प्राधिकरण) | Contact no. | सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष Officer | Contact no. |
---|---|---|---|
संजय शिंदे | EXTN.261 | कविता बोरकर (सहाय्यक आयुक्त ) |
Ward office no. 1,2 & 3
Park Superintendent | Contact no. | |
---|---|---|
हंसराज मेश्राम | ०२२-२८१०३४०९ | mbmc.garden@gmail.com / garden@mbmc.gov.in |
Ward office no. 4,5 & 6
Park Superintendent | Contact no. | |
---|---|---|
नागेश विरकर | ०२२-२८१८४५५३ | mbmc.garden@gmail.com / garden@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना 28/02/2002 रोजी झाली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेत मा.वृक्ष प्राधिकरण समिती दि. 19/06/2003 पासुन अस्तिवात आली असुन सदर समितीचे अध्यक्ष मा. आयुक्त सो. असतात. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कामकाज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम,1975 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कामकाज करण्यात येते
उदयान विभाग :-
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्याने-88, स्मशाने-14, मैदाने-15 व दुभाजके-20 विकसीत करुन सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत सदर ठिकाणची निगा व देखभाल विभागामार्फत करण्यात येते.
- मिरा – भाईंदर हे शहर हरित व सुंदर रहावे याकरिता सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या, स्मशाने व दुभाजकांचे सुशोभिकरण केलेले असुन (पान-फुलांनी सजवलेले आहेत) त्यांची योग्य ती निगा व देखभाल करण्यात येते.
- नागरीकांच्या मॉर्निंग वॉककरिता उद्याने, मैदाने सकाळी 05:00 ते सकाळी 09:00 या वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहेत.
- उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याकरिता आत्याधुनिक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. तसेच उद्याने व मैदानामध्ये खुल्या जागेतील व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले आहे.
- तसेच सन 2022-23 मध्ये नविन 2 उद्याने विकसीत करण्याचे काम चालू असून विकसीत करुन नागरीकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
वृक्ष प्राधिकरण विभाग :-
- महानगरपालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात वृक्षारोपण करुन मिरा-भाईंदर “हरित शहर” करण्याचे काम करण्यात येते. नविन विकसीत केलेले रस्ते, मैदाने, उद्याने, व इतर महापालिकेच्या जागेमध्ये वृक्ष लागवड करुन त्यांची निगा व देखभाल करण्यात येते.
- मिरा भाईंदर महानगरपालिका प्रतीवर्षी “५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन” व १६ जुन “वटवृक्ष दिन” साजरा केला जातो. भारताच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमृतवने विकसीत केलेली आहेत. मियावॉकी पध्दतीने भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याकरीता पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रदुषणामुळे होणाऱ्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा आहे. त्यादृष्टीने उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते.
- सन 2021 मध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या 3000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
- प्रदुषणमुक्त शहर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरणात वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये वृक्ष तोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात येतात.
- खाजगी जागेतील धोकादायक/विकासकामातील झाडे काढणेकामी या विभागामार्फत पाहणी करुन परवानगी देण्यात येते.
- मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येते.
- वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
- राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे लोक जैव विविधता रजिस्टर (PBR) तयार करण्यात आलेले आहे.