Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना उपक्रमास सुरूवात

शेवटचा बदल November 17th, 2021 at 11:39 am

 मीरा भाईंदर महापालिकेने रुग्णवाहिकेत फिरता दवाखाना सुरु केला असून त्याचे लोकार्पण महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते मंगळवारी केले गेले .

आदिवासी पाडे , नागरी वस्ती पासून तसेच पालिका आरोग्य केंद्रा पासून लांब असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी हि सुविधा सुरु केल्याचे आयुक्त म्हणाले. पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते. त्या अनुषंगाने पालिकेच्या रुग्णवाहिकेचा फिरता दवाखाना बनवण्यात आला असून त्यात डॉक्टर व परिचारीका तैनात असतील.