Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल March 30th, 2022 at 09:11 am

Property Tax

Department head Contact no. E-mail
सुदाम गोडसे(सहा.आयुक्त-कर ) ०२२-२८१९२८२८ Ext. १२०/8422811311 propertytax@mbmc.gov.in
प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असून कर विभाग हा महानगरपालिकेचा कणा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे एकुण क्षेत्रफळ 79 चौ. कि.मी. एवढे असून महानगरपालिका हद्दीत एकुण 38473 एवढया मालमत्ता असून एकुण 3,57,992 मालमत्ता कर खातेदार आहेत. मालमत्ता कर विभागाचे 6 प्रभाग कार्यालये व 7 विभागीय कार्यालये असून त्या अतर्गंत 22 वसुली वॉर्ड आहेत. मालमत्ता कर विभागाचे संपूर्णत: कामकाज हे संगणकीकृत करण्यात आले आहे. सन 2013-14 या आर्थिक वर्षापासुन महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारक यांना ऑनलाईनव्दारे मालमत्ता कर भरणेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सन 2021-22 या वर्षापासुन ऑनलाईन कर भरणा प्रणालीत युपीआय(UPI) / पेमेंट वॉलेट उदा. गुगल पे / पेटीएम इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच सन 2021-22 या वर्षापासुन मालमत्ता कराचा भरणा करणेकरीता गुगल प्ले स्टोर वर MyMBMC हे ॲप्लिकेशन देखील उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

1) मालमत्ता कर

कर आकारणी झालेल्या मालमत्ताधारक यांना मागणी देयक बजावुन वसुली करणे, थकबाकीदार मालमत्ताधारक यांना नोटीस बजाविणे. नविन मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी करणे, केलेल्या कर आकारणी बाबत प्राप्त तक्रारी / हरकतींचा निपटारा करणे. वापरात बदल / क्षेत्र फळात बदल इ. सुधारणा बाबत प्राप्त विनंती अर्जावर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण बाबत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.

2) करमणुक कर
सिनेमा, थिएटर, सर्कस, नाटक, तमाशा व इतर यावर प्रती खेळ रु. 15/- या प्रमाणे करमणुक कर वसूल करण्यात येत असून सन 2018-2019 या आर्थिक वर्षात रु. 5,28,420/- एवढी रक्कम वसूल करण्यांत आली आहे.
कर्तव्य

मालमत्ता कर विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये

अ.क्रं.

Designationजबाबदारी व कर्तव्ये
1अति. आयुक्तमालमत्ता कर विभागाचे कामकाजाचे संनियंत्रण करणे.
  रु. 10 लक्ष पेक्षा जास्त करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांची कर आकारणी मंजुर करणे.
  कराधान नियम 41 नुसार शास्ती, नोटीस फी, जप्ती फी, अधिपत्र फी, पुर्णत: किंवा अंशत: माफ करणे. मिळकत अस्तित्वात नसलेली खाती बंद करणे.
  मालमत्ता करा अर्तंगत असलेल्या रक्कमेच्या 1,00,001 ते 3,00,000 पर्यंतच्या रक्कमेचा परतावा मंजुर करणे.
  मालमत्ता कर आकारणी बाबत व इतर हरकतीवर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय पारीत करणे.
  जमिनीची / इमारतीवर कर आकारणी नियमातील तरतुदीनुसार बंद करणे.
2उपायुक्त (कर )मालमत्ता कर विभागाचे कामकाजाचे संनियंत्रण करणे.
  रु. 1 लक्ष ते 10 लक्ष पर्यंतच्या करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांची कर आकारणी मंजुर करणे.
  रु. 10 लक्ष पेक्षा जास्त करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांचे कर आकारणीप्रस्ताव मा. अति. आयुक्त यांना सादर करणे.
  मालमत्ता करा अर्तंगत असलेल्या रक्कमेच्या 1,00,000 पर्यंतच्या रक्कमेचा परतावा मंजुर करणे.
  अपिलीय अधिकारी म्हणुन काम करणे.
3सहा. आयुक्त (कर )मालमत्ता कर विभागाचे कामकाजाचे संनियंत्रण करणे.
  रु. 50,001 ते 1 लक्ष पर्यंतच्या करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांची कर आकारणी मंजुर करणे.
  रु. 1 लक्ष पेक्षा जास्त करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांच्या कर आकारणीचे प्रस्ताव       मा. उपायुक्त (कर) यांना सादर करणे.
  कर आकारणी बाबत तक्रारीवर सुनावणी घेणे.
  वापरात बदल / क्षेत्रफळात बदला बाबचे प्रस्ताव मंजुर करणे
  रु. 1 लाखा पर्यंतच्या करयोग्य मुल्याची शास्ती रद्द करणे.
  माहिती अधिकारी म्हणुन काम करणे.
4वरिष्ठ लिपीकरु. 50,000 पेक्षा जास्त करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांच्या कर आकारणीचे प्रस्ताव सहा. आयुक्त (कर ) यांना सादर करणे.
 ( मुख्यालय )वापरात बदल / क्षेत्रफळात बदल याबाबतचे प्रस्ताव सहा. आयुक्त कर यांना सादर करणे.
  इतर विभागाकडुन येणा-या अहवालावर अभिप्राय देणे.
5Ward Officerरु. 50,000 पर्यंतच्या करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांची कर आकारणी मंजुर करणे.
  रु. 50,000 जास्त करयोग्यमुल्य असलेल्या मालमत्तांच्या कर आकारणीचे प्रस्ताव सहा. आयुक्त (कर ) यांना सादर करणे.
  वापरात बदल / क्षेत्रफळात बदल याबाबतचे प्रस्ताव सहा. आयुक्त (कर ) यांना सादर करणे.
  मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे मंजुन / ना मंजुर करणे
  माहिती अधिकारी म्हणुन काम करणे.
6Tax Inspectorनविन कर आकारणी प्रस्ताव छाननी करुन पुढील कार्यवाही प्रस्तावीत करणे.
  वापरात बदल / क्षेत्रफळात बदल प्रकरण तपासुन पुढील कार्यवाही प्रस्तावीत करणे.
  मालमत्ता कर वसुली करणेसाठी अंतिम नोंटीस मंजुर करणे
  मालमत्ता कर वसुली करणेसाठी नळ जोडणी खंडीत करणेसाठी लिपीक कर्मचारी यांचे सोबत कारवाई करणे
  मालमत्ता हस्तांतरण प्रकरण तपासुन प्रभाग अधिकारी यांना शिफारस करणे.
  प्रभाग कार्यालयातील वसुली चलन तपासुन अंतिम करणे
7लिपीकनविन कर आकारणी प्रस्ताव तयार करणे.
  दैनंदिन पत्रव्यवहार संभाळणे
  मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे तयार करणे
  वापरात बदल / क्षेत्र फळात बदल प्रस्ताव तयार करणे.
  वसुली प्रभागातील कर आकारणी न झालेल्या मालमत्तांचा शोघ घेणकामी सर्व्हेक्षण करणे.
  कर वसुली करीता थकबाकीदार मालमत्ताधारक यांची भेट घेणे.
  अंतिम नोटीस तयार करणे.
  नळ जोडणी खंडीत करणेकरीता नोटीस तयार करणे.
  नविन कर आकारणी / वापरात बदल / क्षेत्रफळात बदल / मालमत्ता हस्तांतरण इ नोंदी संगणकात घेणे.
  प्रभाग कार्यालयातील वसुली चलन तयार करणे.
  किरकोळ पावत्या फाडणे / पोटर्किद तयार करणे
8संगणक चालक  (ठेका)नागरी सुविधा केंद्रावर मालमत्ता कराची वसुली रोख / धनादेश / धनाकर्ष व्दारे स्विकारणे व त्याची पावती अदा करणे.
9शिपाईमालमत्ता कराची देयक वाटप करणे 
  जप्ती / अधिपत्र / नोटीस बजाविणे.
कर्मचारी माहिती

मालमत्ता कर विभागातील अधिकारी / कर्मचारी परंपरा
|
मा. अति. आयुक्त
|
मा. उपायुक्त (कर)
|
सहा. आयुक्त (कर)
|
वरिष्ठ लिपीक ( मुख्यालय )
|
Ward Officer
|
Tax Inspector
|
लिपीक
|
शिपाई

अधिकारी / कर्मचारी संख्या

अ.क्रं.Designationपदसंख्या
मुख्य कार्यालय
1सहा. आयुक्त (कर )1
2वरिष्ठ लिपीक1
3लिपीक1
4लेखा लिपीक3
5संगणक चालक4
6शिपाई3
 
प्रभाग समिती क्रं.01
1Ward Officer1
2Tax Inspector2
3लिपीक6
4संगणक चालक3
5शिपाई12
 
प्रभाग समिती क्रं.02
1Ward Officer1
2Tax Inspector1
3लिपीक3
4संगणक चालक2
5शिपाई4
 
प्रभाग समिती क्रं.03
1Ward Officer1
2Tax Inspector2
3लिपीक5
4बालवाडी शिक्षीका5
5संगणक चालक4
6शिपाई10
 
प्रभाग समिती क्रं.04
1Ward Officer1
2Tax Inspector1
3लिपीक3
4बालवाडी शिक्षीका2
5संगणक चालक3
6शिपाई9
 
प्रभाग समिती क्रं.05
1Ward Officer1
2Tax Inspector2
3लिपीक8
4संगणक चालक4
5शिपाई8
प्रभाग समिती क्रं.06
1Ward Officer1
2Tax Inspector1
3लिपीक6
4बालवाडी शिक्षीका2
5संगणक चालक3
6शिपाई13
कर संकलन केंद्रे ( CFC )

अ.क्रं.

कार्यालय पत्ता

वसुली वॉर्ड / झोन

1

नागरी सुविधा केंद्र, मुख्य कार्यालय, मिरा भाईंदर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर प.

(प्रभाग समिती क्रं. 01 व 02 )

A / B / C / D

3

प्रभाग समिती क्रं. 03
मराठी शाळा क्रं. 06, तलाव रोड, भाईंदर पुर्व, ता. जि. ठाणे.

F-1 / J / G / I / H / Z

4

प्रभाग समिती क्रं. 04
स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव, कनकिया रोड, मिरा रोड (पुर्व)

E-1,9,11 / F-2 ते  6

5

प्रभाग समिती क्रं. 05
मौलाना अब्दुल कलाम आझाद, स्व. इंदिरा गांधी रुग्णालय इमारत, पुनम सागर गृहसंकुल, मिरा रोड पुर्व.


E-2 ते 7 / E-12 ते 15

6

प्रभाग समिती क्रं. 06
राष्ट्रसंत आचार्य श्री पदमसागर सुरीश्वरजी (भवन), राम नगर, शांती गार्डन, सेक्टर – 5, मिरा रोड पुर्व.

LKQ E-8, 10, E-16 ते 20

मालमत्ता कर विभागीय कार्यालय संपर्क

अ.क्रं.

कार्यालय पत्ता

वसुली वॉर्ड / झोन

1

विभागीय कार्यालय, राम मंदिर शेजारी, मुर्धे

R

2

विभागीय कार्यालय, डोंगरी

P

3

विभागीय कार्यालय, उत्तन

S / T

4

विभागीय कार्यालय, मराठी शाळा क्रं. 09, चेणे गांव

M

5

विभागीय कार्यालय, पोस्टऑफीस बाजुला, काशी गांव

N

6

विभागीय कार्यालय, रेती बंदर, घोडबंदर

O

कर संकलन केंद्रावर उपलब्ध असलेल्या सेवा –
  1. मालमत्ता कर रोखीने / धनादेशाव्दारे / धनाकर्षाव्दारे स्विकारणे
  2. मालमत्ता कराचे देयकाची दुय्यम प्रत देणे.
प्रभाग कार्यालय संपर्क
अ.क्रं. कार्यालय पत्ता संपर्क क्रंमांक
1 प्रभाग समिती क्रं. 01 स्व. काका बाप्टीस्टा भवन, भाईंदर (पश्चिम) ता. जि. ठाणे. 022-28140002
2 प्रभाग समिती क्रं. 02 पहिला मजला नगर भवन, मांडली तलावा जवळ, भाईंदर (पश्चिम) ता. जि. ठाणे. 022-28144050
3 प्रभाग समिती क्रं. 03 मराठी शाळा क्रं. 06, तलाव रोड, भाईंदर पुर्व, ता. जि. ठाणे. 022-281962376 / 28186223
4 प्रभाग समिती क्रं. 04 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव, कनकिया रोड, मिरा रोड (पुर्व) 022-28113101
5 प्रभाग समिती क्रं. 05 मौलाना अब्दुल कलाम आझाद, स्व. इंदिरा गांधी रुग्णालय इमारत, पुनम सागर गृहसंकुल, मिरा रोड पुर्व. 022-28103101
6 प्रभाग समिती क्रं. 06 रसाझ थिएटर्सच्या बाजूस, उमराव हॉस्पिटल समोर, स्टेशन रोड, मिरा रोड पुर्व. 022-28123409
मालमत्ता कर विभागीय कार्यालय संपर्क

अ.क्रं.

कार्यालय पत्ता

संपर्क क्रंमांक

1

विभागीय कार्यालय, राम मंदिर शेजारी, मुर्धे

022-28144793

2

विभागीय कार्यालय, डोंगरी

022-28452448

3

विभागीय कार्यालय, उत्तन

022-28452383

4

विभागीय कार्यालय, मराठी शाळा क्रं. 09, चेणे गांव

 

5

विभागीय कार्यालय, पोस्टऑफीस बाजुला, काशी गांव

022-28454023

6

विभागीय कार्यालय, रेती बंदर, घोडबंदर

022-28454024

नागरीकांची सनद (मालमत्ता कर विभाग)

अ.क्रं.

कामाचा तपशील

काम पुर्ण होण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी व कार्यालय

1

अर्ज / टपाल स्विकारणे संबधीतास पोच देणे

त्याची दिवशी (1 दिवस)

तळ मजला, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)

2

नविन कर आकारणी निर्धारण करणे

5 दिवस

कर विभाग, संबधित प्रभाग कार्यालय

3

सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती करणे

2 दिवस

संबधित प्रभाग कार्यालय

4

असेसमेंट उतारा देणे

1 दिवस

कर विभाग, संबधित प्रभाग कार्यालय

5

मालमत्तांच्या वापरामधीत बदल केल्यास कर निर्धारणामध्ये बदल

1 दिवस

कर विभाग, प्रभाग कार्यालय

6

कर आकारणीतील मालमत्ता हस्तांतरण

20 दिवस

प्रभाग कार्यालयामधुनकार्यावाही केली जाते या बाबत प्रभाग अधिकारी यांना मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे बाबत अधिकार प्रदान करणेंत आलेले आहेत.

7

कर आकारणी बाबत केलेली तक्रार

30 दिवस

कर विभाग, प्रभाग कार्यालय

8

मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल प्रत

1 दिवस

नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय, भाईंदर (प)

9

मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल प्रत

3 दिवस

नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय, भाईंदर (प)

10

मालमत्ता कर भरल्याचा दाखला

3 दिवस

प्रभाग कार्यालये व नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय, भाईंदर (प)

11

लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या पत्रांना उत्तर देणे

15 दिवस

प्रभाग कार्यालये व नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय, भाईंदर (प)

12

केंद्रीय माहितीचा अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे

30 दिवस

जन माहिती अधिकारी तथा उप कर निर्धारक व संकलक व सहा. जन माहिती अधिकारी तथा कर निरीक्षक

13

केंद्रीय माहितीचा अधिकार 2005 अन्वये प्राप्त अपिलावर कार्यवाही करणे

30 दिवस

अपिलीय अधिकारी तथा उप-आयुक्त (कर)

Agreegate Demand and Collection 2018 to 2021
      ( आकडे कोटीत )
वर्ष मागणी वसुली थकबाकी
2018-19 203.11 113.07 90.04
2019-20 246.16 127.75 118.41
2020-21 232.01 174.94 57.07
आकारणी रजिस्टर माहिती(०१/०४/२०१७ ते ३१/०३/२०१८ )