शेवटचा बदल January 2nd, 2023 at 08:01 am

Solid Waste Department
Department head | Contact no. | |
---|---|---|
रवि पवार | 28192828 117 | public.health@mbmc.gov.in |
INTRODUCTION
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कल 63 नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
- शहरातील रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
- शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे व त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे.
- अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
- पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.
- पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.
- प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
- स्वच्छ भारत अभियान राबविणे.
मिरा भाईंदर महानगरपालिका दैनंदिन दररोज निर्माण होणारा घनकचरा प्रभाग समिती निहाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी वाहनामार्फत घरोघरी जाऊन थेट पध्दतीने गोळा करून मौजे उत्तन येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी वाहनामार्फत वाहतुक करण्यात येत आहे. परिणामी शहरात कुठेही कचऱ्याचे ढिग दिसून येत नाहीत.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणी सुरु आहे. सदर अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे कामी नागरीकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र एकुण 1139 अर्जापैकी 874 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे.
वैयक्तीक शौचालय बांधकाम करणे कामी केंद्र सरकारकडून रु. 4000/-, महाराष्ट्र शासनाकडून रु. 8000/- 14वा वित्त आयोगाकडून रु. 5000/- व महानगरपालिकेकडून
रु. 5000/- असे एकुण रु. 22000/- प्रती लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) :-
भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण भारतामध्ये “स्वच्छ सर्वेक्षण” 2017 पासून संपुर्ण भारतात सुरु झाले. सदर सर्वेक्षणात देशातील एकुण 4242 शहराने भाग घेतला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने “स्वच्छ सर्वेक्षणात” 2017 पासून ते 2020 मध्ये भाग घेतला असून मिरा भाईंदर महानगरपालिकेचा खालीलप्रमाणे क्रमांक आला आहे.
Swachh Survekshan (SS) |
National Level Rank |
State Level Rank |
SS 2017 |
130 |
09 |
SS 2018 |
47 |
07 |
SS 2019 |
27 |
03 |
SS 2020 |
19 |
04 |
SS 2021 |
31 |
09 |
मिरा भाईंदर महानगरपालिकेस “कचरा मुक्त शहर” म्हणून गौरविण्यात आले असून मिरा भाईंदर शहर ODF++ घोषित करण्यात आले आहे. याकरीता खालीलप्रमाणे मानांकन देण्यात आले आहे.
Swachh Survekshan (SS) |
Garbage Free City |
ODF |
SS 2018 |
– |
ODF |
SS 2019 |
3 Star |
ODF+ |
SS 2020 |
3 Star |
ODF++ |
SS 2021 |
– |
ODF++ |
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविल्याबाबत सन 2019 मध्ये महानगरपालिकेस SKOCH Award नवि दिल्ली प्रदान करण्यात आला आहे.
- महानगरपालिकेस मा. श्री. दुर्गाशंकर मिश्रा, प्रधान सचिव यांच्या हस्ते दिन दयाळ अंतोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संत तेरेसा वस्तीस्तर संघ, उत्तन यांनी उत्तन गावात स्वच्छता अभियान राबविल्याबाबत राज्य पातळीवर 03 क्रमांक उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्यात आला.
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत व शहरास 05 स्टार नामाकंन मिळविण्याकरीता भाग घेण्यात आलेला आहे. त्यानुसार केंद्रशासनाच्या पथकामार्फत शहरात माहे. मार्च 2022 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.
- केंद्र शासनाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या Water++ मध्ये शहराने भाग घेण्यात आलेला आहे. परंतु अद्याप केंद्रशासनाच्या पथकामार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.
- स्वच्छ सर्वेक्षण 2022 करीता जनजागृतीसाठी विविध दर्शनिय भागात बॅनर लावण्यात आले आहेत.
- 24 वॉर्डामध्ये दर्शनिय ठिकाणी स्वच्छतेच्या संदेशाबाबत भिंती रंगविण्यात आले आहेत.
- घनकचरा व्य्वस्थापन व हाताळणी नियम 2016 तरतुदीनुसार मिरा भाईंदर शहरात निर्माण होणा-या कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच 90% Segregation करण्यात येत आहे.
- सदर ओला कचरा व सुका कऱ्यावर 90% Processing करण्यात येत आहे.
- शहरात 141 सार्वजनिक व सामुदायिक शौचालय उत्कृष्ट दर्जाचे आहेत.
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, गटारे, यांची दैनंदिन साफसफाई, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, गोळा केलेला कचरा घनकचरा प्रक्रिया प्रक्ल्पापर्यंत वाहतुक करणे, प्रक्रिया करणे इत्यादी कामे पार पाडली जातात. याकामी 1464 कंत्राटी मजुर व 147 वाहने आहेत.
- मिरा भाईंदर शहरातून दैनंदिन 480 ते 500 टन इतका घनकचरा निर्माण होत आहे. सदर घनकचऱ्याची “घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 नुसार विल्हेवाट लावण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्लॉस्टिक व थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी व साठवणूक) अधिसुचना 2018 :-
महाराष्ट्र प्लॉस्टिक व थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी व साठवणूक) अधिसुचना 2018 मधील तरतुदीनुसार प्लॉस्टिक पासुन बनविल्या गेलेल्या पिशव्या तसेच थर्माकॉल व प्लॉस्टिक पासुन बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु इत्यादी तसेच अशा प्रकारच्या अनेक वस्तुचे उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री वाहतुक आयात व निर्यात करण्यास राज्यात पूर्णत: बंदी आहे.
सदर अधिसुचनेच्या अंमलबजाणीसाठी व नियमांतर्गत कारवाई करणेसाठी महाराष्ट्र अविघटनशिल कचरा नियंत्रण कायदा, 2006 च्या कलम 12 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत मा. आयुक्त यांनी सार्व. आरोग्य विभागामार्फत 16 स्वच्छता निरिक्षक/ प्र.स्वच्छता निरिक्षक यांची नियुक्ती करून महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमे दरम्यान महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशिल अधिसुचना 2018 कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकुण 6521 व्यवसायधारकांवर माहे एप्रिल, 2018 ते माहे जुलै, 2022 पर्यंत कारवाई करून त्याअंतर्गत प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच दंडात्मक कारवाई करून अंदाजे रु. 40,51,500/- इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. तसेच यापुढे सदरची माहिम सुरु ठेवण्यात येणार असून प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे सुचनेनुसार उपआयुक्त (आरोग्य) यांचे अध्यक्षतेखाली दक्षता कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे.
पावसाळ्यापुर्वी कच्चे/पक्के नाले सफाई :-
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकुण 155 कच्चे /पक्के नाले आहेत. मनपा. क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी कच्चे/ पक्के नाल्यांची साफ सफाईची कामे दि. 19/05/2022 रोजी पासून सुरु करण्यात आले होते. सदर कामी जे.सी.बी. मशिन, पोकलन मशिन, बोटसह पोकलन मशिन, हायड्रा मशिन, डंपर, टोरस व मनुष्यबळ आवश्यकतेनुसार उपलब्ध करणेसाठी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आली होती. सदरचे कच्चे /पक्के नाले सफाईची कामे मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता अधिकारी व उपआयुक्त (आरोग्य) यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली दि. 16/06/2022 पर्यंत पुर्ण करण्यात आलेली आहेत.
मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्र हे खाडीलगत असल्याने शहरातील सखल/ अतिसखल भागामध्ये पावसाचे पाणी साचत असते. अशावेळी नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपसा करणेकामी अंदाजे 75 ठिकाणी भाड्याने सक्शन पंप लावणे कामी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्यांचेमार्फत साचणाऱ्या पाण्याचा उपसा वेळीच करण्यात येत आहे.
पावसाळ्या दरम्यान मनपा. क्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी 24 तास कार्यरत राहण्यासाठी प्रभाग समिती निहाय दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर दक्षता पथकामार्फत पावसाळ्याचे दिवसात येणाऱ्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्यात येत आहे.
विभागाची कामे :-
- शहरातील सार्वजनीक रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
- शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर, येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक वाहनामार्फत करणे व घनकचरा प्रक्रिया ठिकाणी टाकण्यात येतो.
- अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
- पावसाळयापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.
- घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत कारवाई करणे.
- प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
- स्वच्छ भारत अभियान राबविणे.
Jobchart
अधिकार पदनाम | कामाचा तपशिल |
---|---|
उप-आयुक्त (आरोग्य) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ६३ नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा व घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २०१६ ची अंमलबजावणी करणे करीता, राज्य शासनाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
|
1) स्वच्छता अधिकारी
2) स्वच्छता अधिकारी 1) स्वच्छता अधिकारी 2) स्वच्छता अधिकारी |
|
विभागीय स्वच्छता निरिक्षक व प्र.स्वच्छता निरिक्षक मुर्धे ते उत्तन तलाव रोड, भाईंदर पुर्व काशिगाव मिरारोड पुर्व गोल्डन नेस्ट ते हटकेश प्र.स्वच्छता निरिक्षक खारीगाव, भाईंदर पुर्व शांतीपार्क, मिरारोड पुर्व
शांतीनगर, मिरारोड पुर्व कनकिया पेणकरपाडा, चेना ते दहिसर चेक नाका (हायवे पट्टा) |
|
छायाचित्रे :-



उपक्रम / योजना :-
मनपा. क्षेत्रातील दैनंदिन घनकचरा वाहतुक करणेकामी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शासन निर्णय क्र. स्वमअ-2018/ प्र.क्र.355(6)/ नवि-34, दि.30/1/2019 घनकचरा वाहतुक करणेकामी GeM Portal द्वारे 117 वाहने खरेदी करणेसाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार GeM Portal द्वारे 117 वाहने खरेदी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
घनकचरा निर्मात्याने कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून स्वतंत्र डब्ब्यात देणे बंधनकारक आहे. ओला कचरा व सुका कचऱ्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.
- ओला कचरा (जैविक विघटनशिल कचरा) यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या कवट्या, फुले, बागेतील कचरा इत्यादी तसेच स्वयंपाक घरातील टाकाऊ पादार्थ यांचा समावेश आहे.
- सुका कचरा (पुर्नवापर करण्यात येणारा कचरा) यामध्ये प्लास्टिक, लाकुड, थर्माकॉल, धातुचे वस्तु, काच, रबर, प्लास्टिक /काचेच्या बाटल्या, रेगझीन यांचा समावेश आहे.
इमारती /सोसायटीमधून निर्माण होणारा घनकचरा ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून महानगरपालिकेस न दिल्यास महानगरपालिकेतर्फे कचरा उचलण्यात येणार नाही.
नागरिकांची सनद :-
1 | सार्वजनीक प्राधिकरणाचे नाव | सार्वजनीक आरोग्य विभाग |
2 | Complete Address | मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम. |
3 | Office Head | उप-आयुक्त (आरोग्य) |
4 | Under which department is this office? | Solid Waste Management Department
|
5 | Class : Geographical | Approximately 79 sq. km. |
6 | Mission | efficient administration |
7 | ध्येय धोरण (Vision) | Transparency in internal and external governance |
8 | Aim | Civil facilities |
9 | Brief details of the services provided to the public
| शहरातील दैनंदिन साफसफाई करणे, रस्ते, गटारे सफाई करणे, घरोधरी जाउन कचरा गोळा करुन उत्तन येथील प्रकल्प ठिकाणी वाहतुक करणे तसेच शहरातील पावसाळयापुर्वी कच्चे /पक्के नाले सफाई खोदाई करणे आदी कामे करण्यात येतात. |
10 | Office hours and telephone numbers (all telephone numbers, fax numbers, e-mails and after-hours emergency contact numbers, if any) | सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत कार्यालयीन दुरध्वनी – 28192828/28193028 public.health@mbmc.gov.in |
Index. No. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्दा | आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा |
1 | उघडी गटारे तुंबून व भरुन वाहणेबाबत | सहा.आयुक्त (आरोग्य), संबंधित स्वच्छता निरिक्षक | एक दिवस | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
2 | रस्ते सफाई / कचरा वाहतुक | सहा.आयुक्त (आरोग्य), संबंधित स्वच्छता निरिक्षक | सोमवार ते शनिवार वेळ सकाळी 7.00 ते 3.00 | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
3 | कचरा कुंडीतील कचरा, रॅबिट/माल हलविणे | सहा.आयुक्त (आरोग्य), संबंधित स्वच्छता निरिक्षक | 24 तासात | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
4 | गटारातील साचवलेला गाळ काढणे | संबंधित स्वच्छता निरिक्षक | तक्रार आल्यास 24 तासाचे आत | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
5 | रस्त्यावरील कचरा /माती उचलणेसाठी संबंधित मालकांना नोटीस देणे | संबंधित स्वच्छता निरिक्षक | 48 तासाचे आत | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
6 | संबंधित मालकाने रॅबिट / माती महानगरपालिकेच्या सफाई कामगारामार्फत उचलणे | संबंधित स्वच्छता निरिक्षक | नोटीस, मुदतीनंतर 9 दिवसाचे आत संबंधित रक्कम मालकाकडून वसूल करण्यात येईल | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
7 | मृत जनावरांची विल्हेवाट लावणे | संबंधित स्वच्छता निरिक्षक | 24 तासात | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
8 | सार्व. शौचालये व खाजगी इमारतीचे सेप्टीक टँक सफाई करणे | लिपिक, मुख्य कार्यालय, सार्व. आरोग्य विभाग | फी भरल्यानंतर 24 तासात | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
9 | गटारामधील गाळ काढणे | मुकादम / संबंधित स्वच्छता निरिक्षक | आठवड्यातून एकदा | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
10 | संबंधित मालकाने राडारोडा न उचलल्यास मनपाने उचलणे | मुकादम / संबंधित स्वच्छता निरिक्षक | नोटीस मुदती नंतर सुमारे सात दिवसाचे आत मालकाकडून दंड रक्कम वसुल करणे | मा. उप-आयुक्त (आरोग्य) |
निविदा :-
वार्ड साफसफाई / नाले सफाई/ सक्शन पंप / मुख्य कार्यालय व प्रभाग समिती 01 ते 06 हाऊसकिपिंग एजन्सी नेमणे/ स्मशान भुमि जळाऊ लाकडे खरेदी करणे
दरपत्रके :-
निरंक
कार्यालयीन पत्रके:-
नेमणूक बदली:-
कामाचे आदेश:-
- प्रभाग समिती वॉर्ड साफसफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.
- नाले सफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.
- सक्शन पंप पुरवठा कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.
निविदा निवड यादी :-
- उप-आयुक्त (मु.) – अध्यक्ष
- शहर अभियंता – सदस्य
- मुख्यलेखाधिकारी – सदस्य
- मुख्य लेखापरिक्षक – सदस्य
- विभाग प्रमुख – आरोग्य विभाग
नागरी संदेश :-
- ओला व सुका कचरा वेगवेगळा करून स्वतंत्र कचरापेटीत देणेबाबत. (सोबत फोटो जोडला)
- सार्वजनीक स्थळांवर कचरा न टाकणे व सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवणे.
- प्लास्टिक पिशव्या न वापरणे.
- उघडयावर शौचास बसणेस प्रतिबंध करणे बसणे व शौचालयाचा वापर करण्या प्रवृत्त करणे.
- ‘स्वच्छ सुंदर मिरा भाईंदर” करणेस सहकार्य करणे.
अंदाजपत्रके :- दि.01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 मंजुर अंदाजपत्रक तपशिल.
Index.No. | लेखाशिर्षाचे नाव | लेखा संकेतांक | (Rs.. लाखात) | Details |
1 | दुर्गंधी नाशके/ साहित्य वस्तु खरेदी | 2532 | 75.00 | महानगरपालिका मालकीच्या आस्थापनातील अंतर्गत दैनंदिन साफसफाई करणे व शहरात विविध धार्मिक सण /उत्सव निमित्त सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी फवारणी करणेकामी आवश्यक दुर्गंधी नाशके खरेदी करणे. |
2 | वॉर्ड सफाई/नाले सफाई | 2550 | 13000.00 | महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटारे सफाई, निर्माण होणारा घनकचरा गोळा करून वाहतुक करणेकामी आवश्यक लागणारा मनुष्यबळ व कचरा वाहतुक वाहने भाड्याने घेणे |
3 | पावसाळ्यापुर्वी नाले सफाई/ खोदाई |
| 300.00 | महानगरपालिका क्षेत्रातील कच्चे, पक्के नाले सफाई करणे, गाळ, माती, कचरा वाहतुक करणेकामी जे.सी.बी., पोकलन, बोटपोकलन, हायड्रा मशिन, टोरस, मनुष्यबळ इत्यादी भाड्याने घेणे |
4 | स्वच्छ महाराष्ट्र अभियान |
| 100.00 | केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान / स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृती करणे अंतर्गत नमुद केलेली कामे करणे. |
5 | मनपा. मालकी आस्थापना मधील दैनंदिन साफसफाई House Keeping एजन्सी नेमणे |
| 150.00 | महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत देखभाल व साफसफाई करणे. |
6 | कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटी देणे |
| 100.00 | मनपा.च्या सार्व. आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटी देणे. |
7 | रुग्णालये व दवाखाने स्मशानभुमि (2) बेवारस प्रेत विल्हेवाट/ लाकडे खरेदी करणे | 2539 | 100.00 | महानगरपालिका मालकीच्या एकुण 14 स्मशानभुमिमध्ये प्रेत दहनाकरीता जळाऊ लाकडे खरेदी करणे. |
8 | बांधकाम अ) सार्व. शौचालय व मुतारी देखभाल व साफसफाई दुरुस्ती | 2434 | 700.00 (बांधकाम / आरोग्य)
| मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात नागरीकांना शौचालय सुविधा अंतर्गत सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देणेत आले आहेत. सदर शौचालये साफसफाई, देखभाल निगा राखणे. |
भांडवली खर्च
लेखाशिर्षाचे नाव | लेखा संकेतांक | (रु. लाखात) | Details |
अ) डस्टबिन खरेदी करणे | 4160 | 10 | महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग दि. 29 एप्रिल, 2017 परिपत्रकानुसार घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 नुसार शहरात निर्माण होणारा घनकचरा जागेवरच स्वतंत्र वर्गीकरण करून महानगरपालिकेस हस्तांतरीत करणेकामी शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था/ संकुले यांना बंधनकारक असून आवश्यक लागणारे डस्टबिन खरेदी करणे |
ब) सक्शन पंप मशिन, भाडे/ वाहन खरेदी (मलनिस:रण) | 50 | महानगरपालिका क्षेत्रात सखल / अतिसखल भागात पावसाळ्या दरम्यान साचणारे पाण्याचा वेळीच उपसा करणेकामी सक्शन भाड्याने घेणे तसेच खाजगी इमारतीच्या शौचालयाच्या सेप्टीक टँक सफाई करणेकामी कार्यरत वाहनांची देखभाल, दुरुस्ती व निगा राखणे तसेच नविन वाहने खरेदी करणे. |
हाती घेतलेली कामे:-
- शहरातील दैनंदिन साफसफाई करणे, रस्ते, गटारे सफाई करणे, घरोघरी जाउन कचरा गोळा करुन उत्तन येथील प्रकल्प ठिकाणी वाहतुक करणे, शहरातील पावसाळयापुर्वी कच्चे /पक्के नाले सफाई खोदाई करणे तसेच पावसाळया दरम्यान नागरी वसाहतीमधील सखल भागात जमा होणारे पावसाचे पाण्याचा सक्शन पंपाद्वारे उपसा करणे आदी कामे करण्यात येतात.
- मनपा. क्षेत्रातील रस्ते/ मार्गावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे, उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्ती/ संस्थाना दंड करावयाचे खालीलप्रमाणे परिपत्रक, अधिसुचना, महानगरपालिका उपविधी अन्वये दिलेल्या ठरावीक रक्कमेनुसार करणे बंधनकारक आहे.
- घनकचरा,व्यवस्थापन नियम 2016 च्याअनुषंगाने, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग मंत्रालय यांचेकडील दि. 10/07/2018 चे परिपत्रक,
- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर 19, 2018,
- शासन निर्णय क्र.स्वमअ-2017/ प्र.क्र.256/नवि-34, दि.30/12/2017.
- महानगरपालिका घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी दि. 01/07/2019 अधिसुचना.
- पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांचेमार्फत दि.23 मार्च, 2018 अधिसुचना.
Index. No. | कृती /बाब | “क” and “ड” वर्ग महानगरपालिका रुपये |
1 | रस्ते /मार्गावर घाण करणे | 150/- |
2 | सार्वजनिक ठिकाणी थुंकणे | 100/- |
3 | उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे | 100/- |
4 | उघड्यावर शौच करणे | 500/- |
5 | सोसायटी/ घरे यांनी विलगीकरण न केलेला व वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपविल्याबद्दल अ) व्यक्ती |
|
| पहिला प्रसंग | 50/- |
दुसरा प्रसंग | 100/- | |
तिसरा प्रसंग | 150/- | |
नंतरच्या प्रत्येक प्रसंगी | 150/- | |
| ब) मोठ्याप्रमाणावरील कचरा निर्माण करणारे जनक |
|
पहिला प्रसंग | 3000/- | |
दुसरा प्रसंग | 6000/- | |
तिसरा प्रसंग | 9000/- | |
नंतरच्या प्रत्येक प्रसंगी | 9000/- | |
6 | कचरा जाळल्यास (विशिष्ट वर्गवारी/ परिस्थिती) | 300/- |
7 | सार्वजनिक सभा/ समारंभ संपल्यावर चार तासांच्या आत स्वच्छता न केल्याबद्दल | स्वच्छता अनामत रक्कम जप्त करणे. |
8 | Construction & Demolition waste सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागा या ठिकाणी टाकल्यास | 15,000/- प्रती वाहन |
घेतलेली कंत्राटे :-
वॉर्ड साफसफाई / नाले सफाई/ सक्शन पंप पुरवठा/ हाऊस किपिंग/ सार्वजनिक शौचालय सफाई



पर्यावरण अहवाल
Enviroment Status Report
Swachh Survekshan 2022
- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण इंटर्नशिप प्रोग्रॅम योजना
- स्वच्छ सागर सुरक्षित सागर सुरक्षित समुद्र अभियान राबविणे कामी सुरक्षा साहीत्य वस्तु खरेदी करणे
- टी शर्ट खरेदी करणे
- INDAIAN SWACHHATA LEAGUE कामी बिस्कीट व पाणी पुरवठा करणे
- INDIAN SWACHHTA LEAGUE प्रमाणपत्र सन्मान चिन्ह व झेंडे खरेदी करणे