Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल December 23rd, 2022 at 12:23 pm

Transport Department

Department HeadContact no.E-mail
Transport Office       सुदाम गोडसे  transport@mbmc.gov.in
INTRODUCTION

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार “परिवहन उपक्रम” स्थापन करण्याची तरतूद आहे.त्यानुसार “मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रम” सन 2005 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 25 नुसार 13 सदस्यांची परिवहन समितीची नेमणूक करण्यात येते.यामध्ये महापालिका सदस्य असतील वा नसतील अशा व्यक्तीकंडून “12 व्यक्तींची सदस्य” म्हणून मा.महासभेद्वारे नेमणूक करण्यात येते.तसेच “स्थायी समितीचा सभापती” हा परिवहन समितीचा “पदसिद्ध सदस्य” असतो.असे परिवहन समितीमध्ये एकूण 13 सदस्य असतात. मा.महासभेने नेमलेल्या सदस्यांपैकी एकाची परिवहन समिती “सभापती” पदावर निवड केली जाते.
महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या परिवहन समितीच्या सदस्यांपैकी “निम्मे सदस्य” प्रत्येक दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात.
मिरा भाईंदर महानगरपालिकेची “परिवहन समितीची नेमणूक” माहे सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आलेली असून सदर परिवहन समितीमध्ये एकूण 12 परिवहन समिती सदस्यांची निवड झालेली होती.
त्याअनुषंगाने परिवहन समिती सदस्य यांचा 02 वर्षे कालावधी पूर्ण झालेले असल्याने अधिनियमाच्या तरतुदीनुसार निम्मे सदस्य निवृत्त करणे आवश्यक होते.त्यानुसार मा.परिवहन समिती सभा दि.24/01/2022 (दि.03/12/2021 रोजीची तहकूब सभा) मध्ये चिठ्ठया काढून 06 सदस्य निवृत्त झालेले आहेत.
तरी, निवृत्त सदस्यांच्या जागी अधिनियमातील तरतूदीनुसार 06 नविन सदस्य निवडीबाबची कार्यवाही करण्याबाबत मा.नगरसचिव, यांना कळविले असून त्यांचे मार्फत कार्यवाही सुरू आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील बस तपशिल

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे एकूण 74 बस उपलब्ध आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील उपलब्ध बस ताफा

No.Detailsबस संख्याTotalशेरा
1

Tata Midi Buses

(प्रवासी क्षमता 34 + 9 = 43)

1010
2.

Volvo AC Buses

(प्रवासी क्षमता 32 + 19 = 51)

0505
3.

Tata Standard Buses

(प्रवासी क्षमता 40 + 19 = 59)

5959
Total7474 

• टिप :- प्रवर्तनासाठी आज रोजी 74 बस उपलब्ध.

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रम पायाभूत सुविधा (Infrastructure)

परिवहन उपक्रमासाठी मौजे घोडबंदर येथे सुसज्ज व अद्यावत “बस आगार”बांधण्यात आलेले आहे.यामध्ये अद्यावत “Traffic Building” व “बस दुरुस्ती/निगा कार्यशाळा” (Workshop) उभारण्यात आलेली आहे. तसेच जागतिक बँकेकडून GEF (Global Environment Facility) Assisted Efficient and Sustainable City Bus Services (ESCBS) प्रकल्पाअंतर्गत अर्थसहाय्य / अनुदानातून कार्यशाळेसाठी लागणारे 23 प्रकारचे “Depot Equipment” खरेदी करण्यात आलेले आहेत. तसेच या प्रकल्पाअंतर्गत Intelligent Transport System (ITS) तयार केली असून घोडबंदर बस आगार येथे ITS Control Centre उभारण्यात आले आहे. ITS अंतर्गत अद्यावत अशी Electronic Ticketing सुविधा उपलब्ध झालेली आहे.

सद्यस्थितीत मे.महालक्ष्मी कृपा इन्फ्रा एलएलपी (बस ऑपरेटर) तर्फे प्रवाशांसाठी एकूण 70बसेस निरनिराळ्या 18 बसमार्गांवर चालविण्यात येत आहे.सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

No.

बस मार्ग क्र.

बस मार्गाचे नाव

दि.30/06/2022 पासून प्रवासी बससंख्या

सोमवार ते शुक्रवार

शनिवार

रविवार व सार्व. सुट्टीचे दिवस

1

1

भाईंदर स्थानक (प.) ते चौक

5

5

5

2

2

भाईंदर स्थानक (प.) ते उत्तन नाका

5

5

5

3

3

भाईंदर स्थानक (प.) ते मनोरी तर (मोर्वा)

1

1

0

3

4

भाईंदर स्थानक (प.) ते एक्सेल वर्ड

2

4

3

4

5

भाईंदर स्थानक (प.) मॅक्सेस मॉल

0

0

0

5

6

उत्तन नाका ते मनोरी तर

3

3

3

6

7

नविन बस मार्ग

मॅक्सेस मॉल, भाईंदर (प.) ते अंधेरी स्थानक (पू.)

0

0

0

7

7 AC

नविन बस मार्ग

मॅक्सेस मॉल, भाईंदर (प.)  ते अंधेरी स्थानक (पू.)

0

0

0

8

10

भाईंदर स्थानक (प.) ते ठाणे स्टेशन (पू.) (कोपरी) व्हाया W.E.Hमाजीवाडा

7

7

7

9

10 AC

भाईंदर स्थानक (प.) ते ठाणे स्टेशन (पू.) (कोपरी) व्हाया W.E.Hमाजीवाडा

2

2

1

10

12

नविन बस मार्ग

भाईंदर स्थानक (पू.) ते वेस्टर्न हॉटेल व्हाया इंद्रलोक मंगल नगर

3

3

2

11

14

भाईंदर स्थानक (पू.) ते नॅशनल पार्क व्हाया काशिमीरा, बोरीवली स्थानक (पू.)

10

7

6

12

15

मिरारोड स्थानक (पू.) ते घोडबंदर बस डेपो(व्हाया एस.के. स्टोन बेव्हर्ली पार्क, सिनेमॅक्स

4

4

3

13

16

मिरारोड स्थानक (पू.) ते तिवारी कॉलेज (व्हाया एस.के. स्टोन, बेव्हर्ली पार्क, सिनेमॅक्स)

4

4

3

14

17

नविन बस मार्ग

मिरारोड स्थानक (पू.) ते विनय नगर (व्हाया जे.पी. गार्डन सीटी ओम मनी टॉवर) प्लेझंट पार्क

3

3

2

15

18

वेस्टन पार्क ते जोगेश्वरी स्थानक (प.)

1

1

0

16

21

मिरारोड स्थानक (पू.) ते KD एम्पायर (व्हाया रसाज थिएटर भारती पार्क शिवार गार्डन

3

3

2

17

22

मिरारोड स्थानक (पू.) ते घोडबंदर गांव 

2

2

1

18

24

मिरारोड स्थानक (पू.) ते वेस्टर्न पार्क

7

7

6

19

28

नविन बस मार्ग

मिरारोड स्थानक (पू.) ते अंधेरी स्थानक (पू.)

0

0

0

20

28AC

नविन बस मार्ग

मिरारोड स्थानक (पू.) ते अंधेरी स्थानक(पू.)

0

0

0

21

29

मिरारोड स्थानक (पू.) ते कोपरी ठाणे(पू.)

7

7

7

22

29AC

मिरारोड स्थानक (पू.) ते कोपरी ठाणे(पू.)

2

2

1

Total

70

67

57

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये:-
No. Designation प्रशासकीय / आर्थिक अधिकार व कर्तव्ये कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णया परिपत्रक
१) अति.आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक १)     लोकांच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार परिवहन सुविधा उपलब्ध करुन देणे. २)    परिवहन सुविधा देणेसाठी बसेस चालविण्याच्या धोरणाबाबत मा. आयुक्त यांचेकडे  प्रस्ताव सादर करणे. ३)    शासन निर्णयानुसार तसेच परिपत्रकानुसार प्राप्त झालेत्या आदेशाची अंमलबजावणी करणे ४)   मा. महासभा व मा. स्थायी समिती यांनी केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे. ५)   परिवहन सुविधा देण्यासाठी होणा-या खर्चास मान्यता घेण्यासाठी मा. आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करणे. ६)    देयके प्रदान करणे. महाराष्ट्र महानगरपालिका  अधिनियम
२) परिवहन उप-व्यवस्थापक १)     विभागांतर्गत नेमुन दिलेली कामे पार पाडणे २)    बस सुविधा संदर्भातील प्रस्ताव परिवहन व्यवस्थापक यांचेकडे सादर करणे. ३)    शासन नियमानुसार परिवहन सेवा देण्यासाठी  बसेस चालविण्याचे धोरण ठरविणेबाबत प्रस्ताव सादर करणे. ४)   बस चालविणेसाठी येणा-या खर्चास व त्या अनुषंगाने येणा-या इतर खर्चास   मान्यता घेणेसाठी प्रस्ताव सादर करणे. ५)   शासन निर्णय परिपत्रकाची अंमलबजावणी करणे. महाराष्ट्र महानगरपालिका  अधिनियम
३) प्रशासकीय अधिकारी (अ.का.) १) विभागांतर्गतनेमून दिलेली प्रशासकीय कामे करणे. २)बस सुविधा संदर्भातील प्रस्ताव परिवहन उप-व्यवस्थापक यांचेकडे सादर करणे. महाराष्ट्र महानगरपालिका  अधिनियम
४) Clerk विभागांतर्गत नेमून दिलेली प्रशासकीय कामे करणे. महाराष्ट्र महानगरपालिका  अधिनियम
५) संगणक चालक तथा लिपीक वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे करणे.
६) संगणक चालक तथा लिपीक वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे करणे.