शेवटचा बदल January 2nd, 2023 at 09:18 am

वाहन विभाग
Department head | Contact no. | |
---|---|---|
कविता बोरकर (सहाय्यक आयुक्त ) | 9599513222 | vehicle@mbmc.gov.in |
INTRODUCTION
मिरा भाईंदर महानगरपालिकेची एकुण 68 वाहने आहेत. सदर वाहने अग्निशमन, सामान्य, आरोग्य, वैदयकिय आरोग्य, उदयान व वृक्षप्राधिकरण विभागात कार, टेम्पो, ट्रॅक्टर, मोबाईल जीप, महिंद्रा मॅक्सिमो, रुग्णवाहिका, शववाहिनी तसेच अग्निशमन सेवेत रेक्यु व्हॅन, वॉटर टेंडर, टॅकर इ. वाहने सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण विभाग, पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत. सदर वाहनाची आवश्यकतेनुसार दरपत्रके प्रसिध्दी देऊन दुरुस्ती केली जाते.
महापालिकेकडे असलेली वाहने पदाधिकारी व अधिकारी यांच्या तुलनेत अपुरी असल्याने वाहन विभागामार्फत वाहने वाहनचालकास इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे कामी वार्षिक निविदा मंजुर करून ठेका वाहने पुरवठा करण्यात येतात. तसेच महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेत अग्निशमन विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण विभागात तीन पाळीमध्ये वाहने कार्यरत असल्याने महापालिकेकडे असलेले कायम वाहन चालकांची संख्या अपुरी असल्याने मनपाच्या विविध विभागातील वाहनांवर ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे वार्षिक निविदा प्रसिध्द करून निविदेतील मंजुर दरानुसार किमान वेतनानुसार ठेका वाहनचालक पुरवठा करण्यात येतो. मिरा भाईंदर महापालिकेचे जे पदाधिकारी व अधिकारी मनपाच्या कार्यालयीन कामकाजाकरिता महापालिकेच्या वाहनाऐवजी स्वत:चे वाहन वापरतात अशा पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मा. स्थायी समितीच्या ठरावाच्या अनुषंगाने पदाधिकारी / अधिकारी / वैदयकिय अधिकारी / कनिष्ठ अभियंता यांना वाहन प्रतिपुर्ती भत्ता अदा केला जातो.
कर्तव्ये व कामकाज :-
- महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे. वाहनांमध्ये वेळोवेळी होणारी दुरुस्ती करणे, इंधन पुरवठा करणे, पदाधिकारी / अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे तसेच विभागाच्या मागणीनुसार मा. आयुक्त साो. यांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ.
- सहा.आयुक्त (वाहन) यांनी जनमाहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.
No. | Designation | कर्तव्ये व कामकाज |
1 | उप-आयुक्त (वाहन) |
|
2 | सहा.आयुक्त (वाहन) |
|
3 | Clerk |
|
Job Chart
Commissioner
|
उप-आयुक्त (वाहन)
|
सहा.आयुक्त (वाहन)
|
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (रिक्त)
|
Clerk
|
वाहन चालक
|
संगणकचालक (ठेक्यावर)
|
Peon
|
Cleaners
1) निविदा प्रक्रिया करुन दरकरार करणे
2) आवश्यकतेनुसार खरेदी करणे
3) वाहनांचे वाटप करणे.
4) स्टॉक रजिस्टरला नोंदी घेणे.
5) नमुना नं.127 (लॉगबुक) व नमुना नं.126 (इंधनबुक) नोंद वही मध्ये नोंद घेणे.
6) देयक अदा करणे
7) इतर अनुषंगिक कामे.
No. | Designation | सोपविण्यात आलेली काम |
1. | उप-आयुक्त (वाहन) | उप-आयुक्तांकडे सोपविलेल्या विभागातील विविध कामासाठी प्रत्येक कामाच्या प्रकरणी निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, विविध कामाच्या मंजुर निविदा धारकासोबत करारनामा करणे, कामाचे आदेश देणे, वेळोवेळी कामास मुदतवाढ देणे इ. |
2. | सहा.आयुक्त (वाहन) | महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमध्ये उत्पन्न होणारी दुरुस्ती वेळोवेळी करणे, पदाधिकारी / अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे तसेच विभागाच्या मागणीनुसार मा.आयुक्त साो. / मा. उप-आयुक्तांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा आपत्तकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ. |
3. | Junior Engineer | पद रिक्त आहे. |
4. | Clerk | ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे तसेच ठेका वाहन पुरवठा करणे कामाच्या निविदांचे व दरपत्रकाचे दस्तऐवज, आवक/जावक रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, प्रस्ताव रजिस्टर, तरतुद रजिस्टर, नमुना नं.126, नमुना 127, मोटार वाहन विषयक माहिती व दुरुस्ती अभिलेख इतिहास बुक अदयावत करणे तसेच माहिती अधिकार व पदाधिकारी नागरिकांच्या पत्रांना उत्तर देणे, पदाधिकारी व अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता तयार करणे इ. |
5. | वाहनचालक | पदाधिकारी / अधिकारी यांच्या वाहनांवर मनपाच्या विविध विभागातील वाहनचालक म्हणुन काम करणे व वाहनाची निगा राखणे. |
6. | Computer Operator | कार्यालयीन पत्रव्यवहार, माहिती अधिकार पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज. |
7. | Peon | वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे, विविध कार्यालयात जाऊन देयकांवर स्वाक्षरी घेणे, इतर कार्यालयीन कामकाज. |
8. | Cleaners | वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे. |
9. | Cleaners | वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे. |
- मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागांकरीता दैनंदिन कामकाजाकरीता तसेच अत्यावश्यक सेवेकरीता व आपत्कालीन सेवेकरीता वाहने वाहन चालकासह इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे, विविध विभागात ठेका वाहनचालक पुरवठा करणे, निविदा प्रक्रिया पुर्ण करणे व त्या अनुषंगीक कारवाई पुर्ण करुन आवश्यकतेनुसार विविध विभागांच्या मागणीनुसार मा.आयुक्त साो / मा. उप-आयुक्त यांच्या मान्यतेने अधिकारी/पदाधिकारी व लोकोपयोगी वाहने खरेदी करणे.
- वाहन दुरुस्ती, सर्विसींग, पंक्चर, इ कामी निविदा तसेच दरपत्रके मागविणेची अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे.
- वाहनांची देखभाल दुरुस्ती तसेच नविन वाहनांचे प्रादेशिक कार्यालय, ठाणे यांचे मार्फत रजिस्ट्रेशन करणे, करात माफी, विमा काढणे, विमा नुतनीकरण करणे, इ. विविध विभागातील नादुरुस्त वाहनांची दुरुस्ती करणे
शासन निर्णय :-
- शासन निर्णय क्र.भाकस 2014/ प्र.क्र. 82/भाग- 3/उद्योग-4/गि.30 ऑक्टोबर 2015,
- शासन निर्णय वाहन 2014/ प्र.क्र.9/14/विनिमय, दि.08 मे,2014, व शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, मोटार वाहन अधिनियम, 1988 अन्वये
- शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.23/14/विनिमय, दि. 30 मे 2014
- शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.5/सेवा-5, दि. 03 जुन 2104
- शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.36/14/विनिमय, दि. 22 ऑगस्ट 2014
- शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.9/14/विनिमय, दि. 8 मे 2014
परिपत्रक :-
- निर्लेखित / बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकिय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत. (शासन परिपत्रक क्रमाक:वाहन-2013/प्र.क्र.31/13/विनिमय, दि. 20 सप्टेंबर 2013.
- शासन निर्णय क्रमांक:संकिर्ण 2007/वाहन खरेदी/प्र.क्र.27/2008/नवि-26/मंत्रालय, मुंबई400032 दि. 18/02/2008 अन्वये राज्यातील सर्व मनपासाठी वाहन दुरुस्तीबाबत शासनाने सविस्तर सुचना निर्गमित केल्या आहेत.
Mandate :-
- मे. सिताराम ट्रॅव्हर्ल्स मनपा/वाहन/७४/२०१६-१७ दि. २९/०६/२०१७ अन्वये वार्षिक कार्यादेश.
- मे. सर्वस्व इंटरप्रेनर्स मनपा/वाहन/२५३/२०१८-१९ दि. २१/१२/२०१८ रोजीचा वार्षिक कार्यादेश
अंदाजपत्रक
No. | लेखाशिर्षक | कोड नंबर | सन 2022-23 करिता लागणारी तरतुद (लाखात) |
अस्थायी आस्थापना ठेका वाहनचालक खर्च | 2120 | 175.00 | |
सामान्य प्रशासन पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2260 | 50.00 | |
अस्थायी आस्था / सुरक्षा रक्षक / वाहनचालक | – | 550.00 | |
आरोग्य पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2460 | 12.00 | |
रुग्णालये पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2460 | 20.00 | |
खाजगी गाडया भाडे | 2560 | 175.00 | |
पदाधिकारी / अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता | 2149 | 150.00 | |
वाहन विमा रक्कम | 2217 | 20.00 |