शेवटचा बदल December 2nd, 2022 at 11:18 am

Video Gallery
दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी मा. महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे यांनी महानगरपालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांच्या समवेत परिवहन बसडेपो व तेथील अत्याधुनिक यंत्रणा, तसेच शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबतची पाहणी करुन आढावा घेतला. प्रसंगी मा. उपमहापौर हसमुख गहलोत, मा. सभापती स्थायी समिती राकेश शाह, परिवहन सभापती दिलीप जैन, विरोधी पक्षनेता धनेश पाटील, गटनेता निलम ढवण, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, उपायुक्त (परिवहन) स्वप्निल सावंत तसेच परिवहन समिती सदस्य व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक 03 जानेवारी 2022 रोजी मा. महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे व महापालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी मीनाताई ठाकरे कोविड लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांच्या सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेस भेट देऊन त्याठिकाणी लसिकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
दिनांक ०३ जानेवारी २०२२ रोजी मा. महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे व महापालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी मीनाताई ठाकरे कोविड लसीकरण केंद्रावर १५ ते १८ वर्षे वयोगटातील तरुणांच्या सुरू असलेल्या कोविड १९ लसीकरण मोहिमेस भेट देऊन त्याठिकाणी लसिकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. त्याचबरोबर लसिकरणासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांची मा. महापौर व आयुक्त यांनी जाणीवपूर्वक विचारणा केली. तसेच विद्यार्थ्यांची विचारपूस करताना कोविड १९ लसीकरण हे पूर्ण सुरक्षित आहे याबाबत त्यांच्या कुटुंबात, मित्रवर्गात जनजागृती करण्याचे आवाहन मा. महापौर व आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना केले.
सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात ३-१० लाख लोकसंख्येच्या गटामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेचा राष्ट्रीय स्तरावर देशात ८ वा व राज्यात दुसरा क्रमांक
समस्त नागरिकांचे, सफाई कामगारांचे महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केले हार्दिक अभिनंदन आणि आभार.
दिनांक ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विशेष लसीकरण मोहीम म्हणजेच “मिशन कवच कुंडल” उपक्रमास प्रोत्साहन देण्याचे मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचे नागरिकांना आवाहन.