Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल March 16th, 2023 at 01:15 pm

Ward Office - 1

Department headContact no.AddressEmail
कांचन गायकवाड  (सहाय्यक आयुक्त )) शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 101 ward01@mbmc.gov.in

INTRODUCTION :-भारताच्या राज्यघटनेतील 74 व्या दुरुस्तीनुसार स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदांना जास्तीत जास्त अधिकार देऊन नागरीकांच्या अडचणी, तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. ह्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने सन 2005-06 मध्ये प्रथमत: 4 प्रभाग समित्यांची स्थापना केली.

   प्रभाग समिती क्र.1 चे कार्यालय शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 101 येथे आहे. या कार्यालयाची वेळ शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9.45 ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत आहे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 022-28140002 व आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक 9920057697 असा आहे. प्रभाग समिती क्र.1 अंतर्गत निवडणूक प्रभाग क्र.8,23 व 24 हे प्रभाग येत असून या प्रभागाचे भाईंदर (प.) फाटक रोड, मॅक्सेस मॉल परीसर, 150 फुट रोड, 90 फुट रोड, गीता नगर, सत्संग रोड, आंबेडकर नगर, राई, मुर्धा, मोर्वा, डोंगरी, तारोडी, केशवसृष्टी, भाटेबंदर, उत्तन, चौक, पाली, पालखाडी, करईपाडा, धावगी रोड व इतर असे फार मोठे भौगोलिक क्षेत्र असून या प्रभागाचे मुख्य कार्यालय भाईंदर (प.) शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर येथे आहे. याशिवाय या प्रभागात राई, मुर्धे, डोंगरी, उत्तन असे तीन विभागीय कार्यालय आहेत. प्रभाग कार्यालय क्र.1 मध्ये टेंभा हॉस्पिटल (सरकारी), मॅक्सेस मॉल, डि-मार्ट, जंजिरा किल्ला, केशवसृष्टी (रामभाऊ म्हाळगी प्रभोदिनी), ज्यडिशिअल ॲकॅडमी, गोलकोंडा रिसॉर्ट, पाली बीच रिसॉर्ट व उत्तन सागरी किनारा अशी महत्त्वाची स्थळे या उत्तन परिसरात आहेत.

विशिष्ट कार्ये

प्रभाग समिती क्र.01 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदान, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व प्रभाग समिती कामकाज इ.

·         प्रभागातील सर्व विभागावर नियंत्रण ठेवून दैनंदिन कामकाज करणेसाठी सूचीत करणे व प्रलंबीत कामाचा आढावा घेणे. मा.खासदार, आमदार, नगरसेवक, शासकीय पत्रे तसेच नागरीकांचे पत्रे यांच्या तक्रारी अनुषंगाने कार्यवाही करणे.

·         प्रभागातील अनधिकृत बांधकामाचा कनिष्ठ अभियंता व त्याचे हाताखालील कर्मचाऱ्यांमार्फत अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे व अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास तोडक कार्यवाही करणे.

·         मा. प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार प्रभाग समितीची महिन्यातून एक सभा आयोजित करणे. 

  • प्रभागाच्या परीसरातील नागरीकांकडून येणाऱ्या विवाह नोंदणीच्या अर्जानुसार विवाह नोंदणी करुन त्यांना प्रमाणपत्र देणे.
  • मालमत्ता कराची वसुली करणे, थकबाकीदार यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांची मालमत्ता अटकावणे व त्यांच्या मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडीत करणे.
  • नवीन झालेल्या बांधकामाचा (मालमत्ता) यांचा कर निरीक्षक यांचेकडून शोध घेवून 1 लक्ष कर योग्य मूल्य असलेल्या मालमत्तांना प्रभाग स्तरावर नियमानुसार कर आकारणी करण्यात येते व 1 लक्ष पेक्षा जास्त कर योग मूल्या असलेल्या मालमत्तांना कर आकारणी करणेचे प्रभाग स्तरावरुन मुख्य कार्यालयात पाठविले जातात.
  • प्रभाग कार्यालयाच्या हद्दीमधील रस्तयावर अडथळा होणार नाही याबाबत वाहतूक शाखा (पोलिस निरिक्षक) मंडप टाकणेस व बॅनरवर लावणेस नियमानुसार परवानगी देण्यात येते.
  • प्रभाग कार्यक्षेत्रात असलेले समाजमंदिर, शाळेचे वर्ग यांचे नियमानुसार भाडे वसूल करुन परवानगी देणे.
  • प्रभाग कार्यक्षेत्रात होणाऱ्या चित्रीकरणासाठी परवानगी देणे व परवानगी न घेतलेल्या व्यक्तींवर रु.5 लाख दंड आकारणेची कार्यवाही केली जाते.
  • प्रभाग कार्यक्षेत्रांतर्गत प्राप्त होणाऱ्या परवान्याच्या अर्जानुसार कारखाने / दुकाने यांना व संबंधीतांस नवीन परवाने देणे व नुतनीकरण करणे.
  • प्रभाग कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाखा व प्रशासन आणि शाळांच्या जागा, कर्मचारी वर्ग, फर्निचर, साधनसामुग्री, दुरुस्त्या, शाळांच्या गरजा ठरविणे व त्याबाबतीत शिक्षण विभाग व महानगरपालिकेकडे मागणी करणे. नवीन शाळा उघडण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, प्रभागाच्या अधिनस्त शाळांमध्ये ग्रंथालय, वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, संगणक लॅब व इतर शैक्षणिक सुविधांची गरज निश्चित करणे व आवश्यकतेनुसार मागणी करणे. शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन अध्यक्षतेसाठी नामनिर्देश करणे तसेच शिक्षण विभागासंदर्भात कामे पाहणे.
  • ना फेरीवाला क्षेत्रात अनधिकृतरित्या बसलेल्या फेरीवाल्यावर मा.न्यायालयाच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यवाही करणे.
  • प्रभाग कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषीत केलेल्या इमारती पोलिस बंदोबस्त घेवून रिकामे करुन ठेकेदारांमार्फत तोडून घेणे, प्रभाग कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती निधीतील रु.10.00 लक्ष कामांना प्रशासकीय आर्थिक मान्यता देण्यासाठी प्रभाग समिती सभेपुढे प्रस्ताव देणे.
  • प्रभाग कार्यक्षेत्रातील आरोग्‍ विभागातील जलनि:सारण व मलनि:सारण कामे पाहणे, स्च्छता विषयक तरतुदींची अंमलबजावणी करणे, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नियमाचे तरतुदीनुसार कार्यवाही करणे, दैनंदिन साफसफाई व स्वच्छता निरिक्षक व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.
  • प्रभाग कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण संबंधी व बीला संबंधी तक्रारी स्वीकारणे, बिलाची नक्कल प्रत देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, पाणी देयकात नावात बदल करणे, पाणी पुरवठा खंडीत झाल्याच्या वेळी व धार्मिक कार्यक्रमासाठी पाण्याचे टँकर देणे.
प्रभाग कार्यालय क्र. 1 अधिकारी / कर्मचारी माहिती व कामाचे स्वरुप(JOB CHART)
No. Designation Nature of work
1. प्रभाग अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी व माहिती अधिकारी प्रभाग समिती क्र.1 कार्यालयीन कामकाज पाहणे, प्रभाग समितीच्या सभा आयोजित करणे, प्रभाग समिती क्र. 01 अंतर्गत होणारी अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे यावर नियंत्रण ठेवणे. आरोग्य विषयक व पाणी जलनि:सारण विषयी तक्रारीचे निवारण करणे, देखरेख करणे. विवाह निबंधक, कर वसुलीवर नियंत्रण व कराविषयी तक्रार निवारण व मालमत्ता हस्तांतरण करणे, नविन कर आकारणी करणे, मंडप परवानगी, समाज मंदिर भाडे वसुल करणे. मैदान भाडे वसुल करणे. चित्रिकरण परवानगी, शिक्षण विभाग, जाहिरात विभाग, परवाना विभाग, सार्व.बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग(दैनंदिन आरोग्य विभागावर लक्ष ठेवणे.)
आवक – जावक विभाग
3. लिपिक (आवक जावक) मालमत्ता हस्तांतरण फी स्विकारणे, हस्तांतरण फॉर्म विक्री/सर्व प्रकारच्या किरकोळ (सर्वसाधारण) फी वसुली करणे, तसेच दैनंदिन चलने महापालिका मुख्य कार्यालयात जमा करणे. उदा. मंडप, मैदान, समाजमंदिर, बॅनर इ. विवाह अर्ज स्विकारणे व प्रमाणपत्र तयार करणे मनपा मालकीचे समाज मंदिर, शाळा वर्ग व मैदान तसेच मंडप/बर्नर परवानगी तयार करणे तसेच विवाह नोंदणी करणे व प्रभाग अधिकारी यांनी सोपविलेली कामे करणे.
4. Peon आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे. तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
5. Cleaners कार्यालयीन कामकाल, श्री.दिलीप कांबळे यांना सहाय्यक म्हणुन विवाह नोंदणीचे काम पाहणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
6. Cleaners मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे, आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे, मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
7. Cleaners मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे तसेच मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
8. संगणक चालक (कंत्राटी) प्रभाग कार्यालय –  विवाह नोंदणी व समाज मंदिर हॉल, मंडप, मैदान, बॅनर परवानगी इ. कामकाज करणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
सभापती दालन
9. Clerk मा. सभापती यांनी दिलेली कामे करणे, मा. प्रभाग समिती सभांचे आयोजनाचे काम करणे, निवडणुकीचे काम पाहणे तसेच वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम पार पाडणे.
10. Cleaners सभापती दालन शिपाई, वरीष्ठांनी दिलेलया आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
11. Computer Operator मा. सभापती यांनी दिलेल्या पत्रव्यवहार टायपिंगची कामे करणे, मा. प्रभाग समिती सभेचे गोषवारे, ठराव व सभेशी निगडीत सर्व पत्रव्यवहाराचे टायपिंगचे काम करणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
Encrochment Department
12. कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करून अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरत
13. कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करुन अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरुन अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रहदारीस व पांदचाऱ्यांस रस्ता मोकळा करणे, फेरीवाले हटविणे इ. कामकाज करणे, माहिती अधिकार (अतिक्रमण) अर्जावर कार्यवाही करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
14. Clerk अतिक्रमण विभागातील कार्यवाही नोंदी घेणे, तक्रारीचे रजिस्टर लिहीणे, नोटीस/रजिस्टर/दावा रजिस्टर / सुनावणी रजिस्टर / फेरीवाले अहवाल रजिस्टर /बीलाचे रजिस्टर / निर्णय पारीत रजिस्टर / विधी रजिस्टर / माहिती अधिकार / लोकाशाही दिन / जनता दरबार / कार्यवाही रजिस्टर व फाईल अद्यावत करणे तसेच माहिती अधिकारातील पत्रांना उत्तरे देऊन निकाली काढणे, दस्ताऐवज स्कॅनींग करुन माहिती जतन करणे. तसेच प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
15. Peon पत्र वाटप करणे, तोडक कारवाई करणे, पडीक वाहने उचलणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
16. Cleaners श्रीम. माधुरी टोपले यांना सहाय्यक म्हणून काम करणे. तसेच मा.प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
17. संगणक चालक (कंत्राटी) अतिक्रमण विभागाची संगणकीय कामे करणे, पत्रव्यवहार टाईप करणे, सादर करणे इ. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
18. Cleaners अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
19. Cleaners अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
20. Cleaners अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
21. labour अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
Tax Department
22. लिपीक, भाईंदर (प.) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
23. लिपीक, भाईंदर (प.)
24. लिपीक, भाईंदर (प.)
25. Peon मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
26. Peon
27. Cleaners
28. Cleaners
29. रखवालदार
30. Computer Operator कर विभागातील कामकाज पाहणे तसेच मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
राई – मुर्धे विभागीय कार्यालय
31. लिपीक (राई-मुर्धे विभाग) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
32. बालवाडी शिक्षिका (राई-मुर्धे विभाग) बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
33. Cleaners मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
34. Cleaners
35. Cleaners
डोंगरी विभागीय कार्यालय
36. कर निरिक्षक (सहा. माहिती अधिकारी) कर विभाग, डोंगरी ते उत्तन कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
37. शिपाई (डोंगरी विभाग) मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
38. सफाई कामगार (डोंगरी विभाग)
39. Computer Operator कर विभागाचे संपूर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
उत्तन विभागीय कार्यालय
40. लिपीक (कर विभाग) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
41. बालवाडी शिक्षीका (उत्तन) बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
42. शिपाई (उत्तन विभाग) मालमत्ता करांची बिले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे. तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
43. सफाई कामगार (उत्तन विभाग)
44. सफाई कामगार (उत्तन विभाग)
45. Computer Operator  कर विभागाचे संपुर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे
जाहीरात विभाग
46. Cleaners अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा.आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
47. Cleaners अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
फेरीवाला विभाग
48. फेरीवाला पथम प्रमुख फेरीवाला पथक प्रमुख – प्राप्त तक्रारीप्रमाणे कार्यवाही करणे व त्यानुसार वरिष्ठांना अहवाल सादर करणे तसेच मा. आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे
प्रभाग कार्यालय क्र.01, सफाई कामगार
49. Cleaners मा. प्रभाग अधिकारी यांचे दालन सांभाळणे, प्रभाग कार्यालय साफ सफाईकरणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
50. Cleaners प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
51. Cleaners प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
52. Cleaners प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
53. Cleaners प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
नागरिकांची सनद (जाहीरनामा )
बॅनर गुन्हा दाखल यादी 2018 to 2022
अनधिकृत बांधकाम कारवाई यादी
मोबाईल टॉवर यादी