मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

शेवटचा बदल डिसेंबर 11th, 2021 at 01:25 pm

माझी वसुंधरा अभियान (स्वातंत्र्य अमृत महोत्सव )

मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्र.06 खारी येथे माझी वसुंधरा अभियान व संविधान दिनानिमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

हरित शपथ

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” अभियानाअंतर्गत शिक्षण विभागामार्फत “किल्ले बांधणी” उपक्रम मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळेत सुरु असुन “मिरा भाईंदर, काशी मराठी शाळा क्र.04” शाळेला भेट दिली.

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” अभियानाअंतर्गत शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कविता बोरकर मॅडम ह्यांच्याशी संवाद साधला व सोलर वॉटर कुलिंग आणि टेरस गार्डनची शाळेत कशी अंमलबजावणी करु शकतो ह्या बद्दल चर्चा केली व त्याच्या वर मॅडमने सकारात्मक प्रतिसाद दिला.

हरित शपथ

वैद्यकीय संघटना

मीरा भाइंदर शहरातस्वच्छतेची दिवाळीहा उपक्रम राबविण्यात यावा असे निर्देश आयुक्त दिलीप ढोले यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांना दिले.त्यानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली सार्व.आरोग्य विभागामार्फ़तस्वच्छतेची दिवाळीहा नाविन्यपूर्ण उपक्रम स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवी वर्षात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील सर्व रस्त्यांच्या नियमित करण्यात येणाऱ्या साफसफाईसोबतच सर्व चौकांची ही स्वच्छता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. यावेळी शहरातील ७५ चौक सुशोभित करुन पणत्या रांगोळ्या काढण्यात आल्यात.

यावेळी मा.महापौर,मा.आमदार,मा.आयुक्त   मा.नगरसेवक,पत्रकार,शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे आईवडील, शहरातील नागरीक महापालिकेचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छतेची दिवाळी हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात आला आहे.कोरोनाची परिस्थिती हळूहळू निवळत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये सकारात्मक यावी जनजीवन सुरळीत व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला.

हा उपक्रम सन्मा.नगरसेवकांच्या सहभागातून नागरिकांच्या उस्फूर्त प्रतिसादातून महापालिकेचा एकही रुपया खर्च करता राबविण्यात आला.

उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत बोलतांना मिरा भाईंदर शहराच्या महापौर श्रीमती ज्योत्स्ना हंसनाळे यांनी सांगितले कि,आज मिरा भाईंदर शहरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.गेली दोन वर्षे आपण कोविड या भयंकर साधीच्या रोगाशी लढा देत असून मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त अजित मुठे (सार्वजनिक आरोग्य) त्यांचे कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाची निष्पत्ती म्हणजे आज मिरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय अल्प आहे.आजचा हा उपक्रम चैतन्याकडे घेवून जाणारा आहे.

मिरा भाईंदर शहराच्या आमदार श्रीमती गिता जैन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.मिरा भाईंदर शहरात असा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला असून अशा उपक्रमामुळे नागरिकांच्या मनातील नैराश्य दुर होते.या उपक्रमाबाबत त्यांनी आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त अजित मुठे त्यांच्या टिमचे अभिनंदन केले.

बालदिन-चित्रकला स्पर्धा फोटो