मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल ऑगस्ट 8th, 2022 at 08:53 am

पशु संवर्धन विभाग

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
डॉ. विक्रम निराटले 9819544642/ 28192828 Ext. 212 animalhusbandary@mbmc.gov.in

प्रस्तावना :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्याचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

 • शहरातील मोकाट श्वांनाचा व मांजरांचा बंदोबस्त करणे.
 • शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे.
 • महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. ०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.०७/०९/२००४ व महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. १०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.२२/०७/२००९ अन्वये जैन धर्मिंयांचे पर्युषण पर्व निमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची सुकाने बंद ठेवण्यास तसेच पर्युषण पर्वातील उर्वरीत दिवशी श्रावण वद्य १३ ते भाद्रपद शुध्द ३ व ५ या दोन दिवशी सर्व कत्तलखाने व मांसविक्रीच्या दुकानदारांना, कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद करणेबाबत महानगरपालिकेमार्फत आवाहान केले जाते.
 • शासन आदेश क्र. संकीर्ण १०/२००२/प्र.क्र.१११/नवि. २७, नगरविकास विभाग, दि.२८/०३/२००३ अन्वये दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाते.
 • शासन (गृह विभाग) परिपत्रक क्र. : डिआयएस०९१३/प्र.क्र.४३४/विशा१(ब), दि.०१/१०/२०१४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३३१ मधील तरतुदी अन्वये दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरी मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली जाते. बकरी ईदनिमित्त जनावरांची कत्तलपूर्व तपासणी करीता मा. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त, ठाणे (कार्यालय – मुलुंड (प.)) या कार्यालयाकडून पशूधन विकास अधिकारी तथा सक्षम अधिकारी यांची नेमणूक केली जाते.
 1.  

कर्तव्य :-

 1. शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे.
 2. जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे.
 3. दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे.
 4. दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे.
 5. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे.
 6. पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
 7. मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.

अधिकारी / कर्मचा-यांचे नाव

पदनाम

सोपविण्यात आलेले काम

श्री. अजित मुठे

8291808800

 

उप-आयुक्त

पशुसंवर्धन

1.        पशुसंवर्धन विभागास नेमून दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.

2.        पशुसंवर्धन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

3.        माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये पशुसंवर्धन विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.

4.        मा. आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.

डॉ. विक्रम निराटले

9819544642

 

 

 

पशुवैदयकीय अधिकारी

(ठोक मानधन)

1.         शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे.

2.           जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे.

3.           दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे.

4.           दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे.

5.           शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे.

6.           पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

7.           मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.

श्री. महादेव  बंदिछोडे

9867395688

लिपिक

1. विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे.

2.     शहरातील भटके / पिसाळलेल्या कुत्र्यासंबंधी तसेच मोकाट जनावरांसंबंधी येणा-या तक्रारीवर कारवाई करणे.

3.     मोकाट जनावरे बंदिस्त करुन जनावर मालकाकडून दंडात्मक कारवाई करणे.

4.     निविदा प्रक्रियेचे कामकाज करणे.

5.     वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसा कामकाज करणे.

6.     पशुसंवर्धन विभागाचे सहा. जन माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

श्री. किशोर पाटील

7900192717

शिपाई

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

श्री. महेश म्हात्रे

8652292672

शिपाई

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

 

श्री. पेरीनायगम आशिर्वादम

स.का.

१)      मिरा भाईंदर शहरातील रोडवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करणे.

२)     बंदिस्त केलेल्या जनावरांना चारा-पाणी देणे.

३)     बंदिस्त केलेल्या जनावरांच्या मालकाने दंड भरल्यानंतर त्यांना जनावरे ताब्यात देणे.

४)     वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे

 

श्री. तावडा नाटा

स.का.

कार्यादेश :-

 • मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करणेबाबत.
 • मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करणेबाबत.

अंदाजपत्रक:-

अर्थसंकल्पिय तरतुद सन 2022-23 पशुसंवर्धन विभाग

लेखाशिर्षकाचे नावउपलब्ध तरतूद
मोकाट कुत्रयांचा / इतर प्राण्यांचा बंदोबस्त्‍ / निर्बिजीकरण

रु. 75 लाख 

नागरिकांची सनद:-

सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव पशूसंवर्धन विभाग
संपुर्ण पत्ता मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम.
कार्यालय प्रमुख उप-आयुक्त (पशूसंवर्धन)
कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे? पशूसंवर्धन विभाग
कार्यकक्षा : भौगोलिक सुमारे 79 चौ. कि.मी.
अंगीकृत व्रत (Mission) सक्षम, तत्पर प्रशासन
ध्येय धोरण (Vision) अंतर्गत व बाह्य प्रशासनात पारदर्शकता
साध्ये नागरी सुविधा
जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल
कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा) सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत कार्यालयीन दुरध्वनी – 28192828/ 28193028 health@mbmc.gov.in mbmchealth@gmail.com
विभागाची कामे