मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

Admin

प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन चौक येथील उद्यानात प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची स्थळ पाहणी केली. प्रसंगी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. यापूर्वी पाहणी दरम्यान उद्यानात असलेले काँक्रिटचे बांधकाम, ग्रिल बांधणीचे काम, डेब्रिज उचलणे, …

प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी अधिक वाचा & raquo;

आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती

दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात साजरी करण्यात आली.

भुयारी गटार नियोजन

दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मलनि:सारण केंद्र, भुयारी गटार नियोजन व त्याच्या स्वच्छतेची प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली.

परिवहन समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

एकूण ८ महिला कर्मचाऱ्यांना पदोन्नती पत्र देण्यात आले

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील प्रसविका या पदावर कार्यरत असणाऱ्या एकूण ८ महिला कर्मचाऱ्यांना महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत .

ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझी वसुंधरा अभियान

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मुख्य उपस्थितीत महानगरपालिका सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरित शपथ ग्रहण केली

मुख्य कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून शपथ ग्रहणाचा कार्यक्रम

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून शपथ ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन चौक येथील उद्यानात प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची स्थळ पाहणी केली

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन चौक येथील उद्यानात प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची स्थळ पाहणी केली. प्रसंगी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम उपस्थित होते.

ओमिक्रोन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता आफ्रिकन ओमिक्रोन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉक्टरांची आपत्कालीन बैठक घेतली.