मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

शेवटचा बदल जानेवारी 5th, 2023 at 11:00 am

नागरिकांचा जाहिरनामा

नागरिकांच्या दैनंदिन व नियतकालिन गरजा ह्या इतर भागापेक्षा महानगरात जास्त असतात.बऱ्याचदा त्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या असतात . त्या गरजा सक्षमपणे, समर्थपणे,नियोजनबद्धरित्या व विनासायास सोडविण्याचे दायित्व त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनावर येते म्हणून नागरिकांच्या अडचणी सयमबद्ध वेळात निकाली काढण्यासाठी एखादे सोपे,सुटसुटीत पण तेवढेच निर्णयात्मक व प्रभावी माध्यम स्विकारायला पाहिजे व त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिकांचे मूळ नियम,उपविधी व शासनाकडून येणारी वेळोवेळीची मार्गदर्शक तत्वे यांच्या परिसिमित प्रशासनाने काम करायला हवे.अशाप्रकारे काम करायचा विडा एकदा प्रशासनाने उचलला की फार थोड्या वेळासाठी प्रशासकांना काही अडचणी येतील परंतु एकदा कामाला साचेबद्धपणा आला कि नागरीकांची कामे झटपट होतील.त्यातून महानगरपालिकेच्या कार्यामुळे महानगरपालिकेचे नावं नागरिकांच्या आदरास पात्र होऊ शकेल व हेच ह्या नागरिकांच्या जाहीरनाम्याचे फलित असेल.

          यासाठी महानगरपालिकेच्या कर्तव्यात जी नागरी कामे सुस्पष्टपणे दाखविली आहेत व जी कामे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपेक्षिली जातात अशा सर्व कामाचा एक आकृती बंध महापलिका पातळीवर तयार कारायला पाहिजे .त्यात नागरिकांच्या दृष्टीने नियमित महत्वाच्या सर्व प्रकराच्या बाबी अंतर्भूत करायला हव्यात .मात्र इतर महानगरपालीकांपेक्षा येथील कामाची पद्धत फार जटील आहे, वेळ काढू आहे व स्वारस्यपूर्ण नाही ,असे होऊ नये म्हणून नागरिकांच्या सोयी ,सुविधा ,कामे तत्परतेने होण्याच्या दृष्टीने नागरिकांकरिता जाहीरनामा केलेला आहे.