शेवटचा बदल मार्च 23rd, 2023 at 09:50 am

ग्रंथालय विभाग
विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
प्रियांका भोसले | २८०४४९५९ | library@mbmc.gov.in |




प्रस्तावना
मिरा भाईंदर शहराचे भौगोलिक क्षेत्र 79.40 चौ. किमी इतके विस्तृत आहे. मिरा भाईंदर नगरपरिषद काळात शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन 13 फेब्रुवारी 1993 रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या नगरभवन इमारतीमध्ये नगरवाचनालय या नावाने सुसज्ज वाचनालय सुरु करण्यात आले.भाईंदर शहरात वाचनालयाकरिता मिळालेला उत्तम प्रतिसाद व इतर भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मिरा रोड (पुर्व) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय दि. 01 नोव्हेंबर 2010 रोजी स्थापना करण्यात आले. तदृनंतर भाईंदर (पुर्व) येथे प्रभाग समिती कार्यालय इमारतीमध्ये ग्रंथालय सुरु करण्यात आले. अशाप्रकारे संपुर्ण मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना वाचनालय/ग्रंथालयाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.ग्रंथालयाचा स्थापनेनंतर शहरातील विदयार्थ्यांच्या सोयीकरीता ग्रंथालयासोबत अभ्यासिकाही सुरु करण्यात आल्या आहेत. विदयार्थ्यांच्या वाठत्या संख्येमुळे अन्य 7 ठिकाणी अभ्यासिका सुरु आहेत. तसेच एकुण 4 ठिकाणी नागरिकांकरीता मोफत वृत्तपत्र वाचनाची सोय करण्यात आली आहे.ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात विपुल ग्रंथसंपदेमुळे नागरिक खुश आहेत. वाचनालयाकडुन वाचनालय सभासद नोंदणी व विदयार्थ्यांकरिता अभ्यासिका नोंदणीबाबतच्या सेवेबाबतही नागरिक संतुष्ट आहेत. यामुळेच वरील दोन्ही करीता नागरिक व विदयार्थ्याचा प्रतिसाद दिवसांगणिक वाढत आहे. यापुढेही ग्रंथालय व अभ्यासिकेची संख्या वाढविण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
नगरवाचनालय व अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), दुसरा मजला, मांडली तलाव समोर, भाईंदर (प.)
नगरवाचनालयाची स्थापना 13 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 21,565 ग्रंथांचा समावेश
आहे. नगरवाचनालयात एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी
उपलब्ध करुन दिले जातात. नगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे
एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. नगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची
सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना वाचनालयात दररोज 34 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.)
येथे दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 20,000 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात.वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 वाचनालय व अभ्यासिका, तलाव रोड, भाईंदर (पू.)
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पु.) येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व पहिल्या / तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 6451 ग्रंथ आहेत. तसेच या वाचनालयात एकूण 37 नियतकालिके (20 मासिके, 7 पाक्षिके,
10 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 73 ते 100 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना
अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज 13 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
आरक्षण क्रमांक 100 विरंगुळा केंद्र अभ्यासिका, फ्लायओव्हर ब्रिज जवळील आय.डी.बी.आय. बँके जवळ भाईंदर (प.)
आरक्षण क्र.100, विरंगुळा केंद्र या इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, गोडदेव-फाटक रोड भाईदर (पू.)
हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू.) येथे तळमजल्यावर वाचनालय व पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 5,200 ग्रंथ
वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच वरील ठिकाणी 06 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, नवघर रोड भाईंदर (पू.)
सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) ईमारतीमधील तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, इंदिरा गांधी रुग्णालय, पुनमसागर कॉम्प्लेक्स मिरारोड (पू.)
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 20,000 ग्रंथ
वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात.
वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली
आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
विभागाने राबिवलेले विविध कार्यक्रम यांची सविस्तर माहिती मिराभाईंदर महानगरपालिका कार्यरत अभ्यासिकांची माहिती
अ.क्र. | अभ्यासिकांची नावे व पत्ता |
01. | नगरवाचनालय अभ्यासिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजला. मांडली तलावजवळ, भाईंदर (प.) |
02. | राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, तळमजला व दुसरा मजला, मिरारोड (पु.) |
03. | प्रभाग समिती कार्यालयक्रं 3/4 वाचनालय अभ्यासिका दुसरा मजला व तिसरा मजला, तलावरोड, भाईंदर (प.) |
04. | हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, तळमजला व पहीला मजला, हनुमान नगर.भाईंदर(पु.) |
05. | आरक्षणक्र.100 अभ्यासिका, पहिला मजला व दुसरा मजला, विरंगुळाकेद्र, भाईंदर (प.) |
06 | सावित्रीबाई फुले अभ्यासिका, पहिल्या मजला यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू) |
07 | ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पहिल्या मजला पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) |
08 | गणेश देवल नगर अभ्यासिका, भाईंदर (प.) |
01. | नगरवाचनालय वाचनालय, ई-वाचनालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजल भाईंदर (प.) |
02 | राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, तळमजला व दुसरा मजला, मिरारोड (पु.) |
03 | प्रभाग समिती कार्यालयक्रं 3/4 ई-वाचनालय पहिला मजला तलावरोड, भाईंदर (प.) |
कामाचे विस्तृत स्वरुप
- शासकिय / निमशासकीय /खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवकइ. पत्रव्यवहार.
- महापालिकाक्षेत्रातनवीन वाचनालय/अभ्यासिका स्थापन करणे.
- सर्व वाचनालयाकरीता नवीन ग्रंथ, नियतकालिके यांची खरेदी करुन वाचकांना उपलब्ध करुन देणे.
अंदाजपत्रक
अ.क्र. | अंदाजपत्रक | मंजुर रक्कम | नियोजित वापर | शेरा (असल्यास) |
1. | स्थायीआस्थापना | 23.22 | आस्थापनाविभागामार्फत | |
2. | सार्वजनिक वाचनालय पुस्तक खरेदी | 25.00 | निरंक | |
3. | वाचनालय रिडींग रुम व्यवस्था/ ई वाचनालय | 10.00 | बांधकामविभागामार्फत | |
4. | वाचनालय सुरक्षा / इतरखर्च | 35.00 | आस्थापनाविभागामार्फत | |
5. | वाचनालयविकास/अभ्यासिका | 20.00 | बांधकामविभागामार्फत | |
एकूण | 113.22 |
अ.क्र. | अंदाजपत्रक | मंजुर रक्कम | नियोजित वापर | शेरा (असल्यास) |
1. | सार्वजनिक वाचनालय पुस्तक खरेदी/ शाळापुस्तकेखरेदी | 25.00 | – | |
2. | नियतकालिके खरेदी | – | – | |
3. | नमुने छपाई, स्टेशनरी | – | – | |
4. | वाचनालय रिडींग रुम व्यवस्था/ ई वाचनालय | 5.00 | – | |
5. | वाचनालय इतर सुरक्षाखर्च | 50.00 | 34.21 | |
6. | वाचनालयविकास/अभ्यासिका | 20.00 | 02.03 |
अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये
अ.क्र. | पदनाम | कायदेशीर तरतुद | जबाबदारी व कर्तव्ये |
1) | उपायुक्त | सर्व वाचनालये, अभ्यासिका यांचे व्यवस्थापन करणे. | |
2) | सहा. आयुक्त | सर्व वाचनालये, अभ्यासिकांचे व्यवस्थापन करण्यासंबंधी प्रस्ताव सादर करणे. | |
3) | ग्रंथपाल |
|
|
4) | लिपिक (1) |
|
|
5) | लिपिक (2) |
|
नागरिकांची सनद
अ.क्र. | पदनाम | कामाचा तपशिल | सेवा पुरवण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाचा अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा |
1 | सहा-आयुक्त | वाचनालय विभागाच्या कामाचा आढावा घेणे | 7 दिवस | उप-आयुक्त (वाचनालय) |
2 | प्र.विभाग प्रमुख | मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व वाचनालयाचे व्यवस्थापन, मा. पदाधिकारी व अधिकारी तसेच सभासद , नागरिक यांच्या पत्रावर कार्यवाही करणे. केंद्र शासन माहीती अधिकार, जनहित याचिका संबधित पत्र व्यवहार ग्रंथखरेदी निविदा ग्रंथासंबधीत कामे तसेच आवक. जावक पोटर्कीद/चलन व इतर ग्रंथालयीन सर्व कामे पाहणे | 7 दिवस | उप-आयुक्त (वाचनालय) |
3 | शिपाई | वाचनालयाचे कामकाज पाहणे, क्रेंद्रशासन माहिती अधिकार संबंधित पत्र व्यवहार, आवक-जावक ग्रंथालय/अभ्यासिकेचे नविन सभासद बनविणे पोटर्कीद लिहीणे व चलन बनविणे इ. कामे करणे. | 7 दिवस | उप-आयुक्त (वाचनालय) |
4 | बा. शिक्षिका / लिपिक (अर्धवेळ) | वाचनालयाचे कामकाज पाहणे, ग्रंथालय/अभ्यासिकेचे नविन सभासद बनविणे, पोटर्कीद लिहीणे व चलन बनविणे इ. कामे करणे. | 7 दिवस | उप-आयुक्त (वाचनालय) |