मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

मिरा भाईदर महानगरपालिकेने सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत देशस्तरावर रोवला झेंडा

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरीव्यवहार मंत्रालयाकडून आयोजितकरण्यात आलेल्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात मिरा- भाईंदर महापालिकेने देशपातळीवर आठवा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. या अभियानांतर्गत चांगली कामगिरी करण्यासाठी मागच्या वर्षभरापासून पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात होते.