मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल मार्च 16th, 2022 at 10:50 am

सार्वजनिक आरोग्य विभाग

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
                                             रवि  पवार 
9689931521 public.health@mbmc.gov.in

प्रस्तावना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कल 63 नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

 1. शहरातील रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
 2. शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे व त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे.
 3. अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
 4. पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.
 5. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.
 6. प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
 7. स्वच्छ भारत अभियान राबविणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका दैनंदिन दररोज निर्माण होणारा घनकचरा प्रभाग समिती निहाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी वाहनामार्फत घरोघरी जाऊन थेट पध्दतीने गोळा करून मौजे उत्तन येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी वाहनामार्फत वाहतुक करण्यात येत आहे. परिणामी शहरात कुठेही कचऱ्याचे ढिग दिसून येत नाहीत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणी सुरु आहे. सदर अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे कामी नागरीकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र एकुण 1139 अर्जापैकी 874 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे.

वैयक्तीक शौचालय बांधकाम करणे कामी केंद्र सरकारकडून रु. 4000/-, महाराष्ट्र शासनाकडून रु. 8000/- 14वा वित्त आयोगाकडून रु. 5000/- व महानगरपालिकेकडून
रु. 5000/- असे एकुण रु. 22000/- प्रती लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) :-

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण भारतामध्ये “स्वच्छ सर्वेक्षण” 2017 पासून संपुर्ण भारतात सुरु झाले. सदर सर्वेक्षणात देशातील एकुण 4242 शहराने भाग घेतला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने “स्वच्छ सर्वेक्षणात” 2017 पासून ते 2020 मध्ये भाग घेतला असून मिरा भाईंदर महानगरपालिकेचा खालीलप्रमाणे क्रमांक आला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेस “कचरा मुक्त शहर” म्हणून गौरविण्यात आले असून मिरा भाईंदर शहर ODF++ घोषित करण्यात आले आहे. याकरीता खालीलप्रमाणे मानांकन देण्यात आले आहे.

 • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविल्याबाबत सन 2019 मध्ये महानगरपालिकेस SKOCH Award नवि दिल्ली प्रदान करण्यात आला आहे.
 • महानगरपालिकेस मा. श्री. दुर्गाशंकर मिश्रा, प्रधान सचिव यांच्या हस्ते दिन दयाळ अंतोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संत तेरेसा वस्तीस्तर संघ, उत्तन यांनी उत्तन गावात स्वच्छता अभियान राबविल्याबाबत राज्य पातळीवर 03 क्रमांक उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्यात आला.
 • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2021 ची कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत व शहरास 05 स्टार नामाकंन मिळविण्याकरीता भाग घेण्यात आलेला आहे. त्यानुसार केंद्रशासनाच्या पथकामार्फत शहरात माहे. मार्च 2021 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.
 • केंद्र शासनाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या Water + मध्ये शहराने भाग घेण्यात आलेला आहे. परंतु अद्याप केंद्रशासनाच्या पथकामार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.
 • स्वच्छ सर्वेक्षण 2021 करीता जनजागृतीसाठी विविध दर्शनिय भागात बॅनर लावण्यात आले आहेत.
 • 24 वॉर्डामध्ये दर्शनिय ठिकाणी स्वच्छतेच्या संदेशाबाबत भिंती रंगविण्यात आले आहेत.
 • घनकचरा व्य्वस्थापन व हाताळणी नियम 2016 तरतुदीनुसार मिरा भाईंदर शहरात निर्माण होणा-या कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच 90% Segregation करण्यात येत आहे.
 • सदर ओला कचरा व सुका कऱ्यावर 90% Processing करण्यात येत आहे.
 • शहरात 141 सार्वजनिक व सामुदायिक शौचालय उत्कृष्ट दर्जाचे आहेत.
 • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, गटारे, यांची दैनंदिन साफसफाई, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, गोळा केलेला कचरा घनकचरा प्रक्रिया प्रक्ल्पापर्यंत वाहतुक करणे, प्रक्रिया करणे इत्यादी कामे पार पाडली जातात. याकामी 1464 कंत्राटी मजुर व 128 वाहने आहेत.
 • मिरा भाईंदर शहरातून दैनंदिन 480 ते 500 टन इतका घनकचरा निर्माण होत आहे. सदर घनकचऱ्याची “घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 नुसार विल्हेवाट लावण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्लॉस्टि‍क व थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी व साठवणूक) अधिसुचना 2018 :-

महाराष्ट्र प्लॉस्टि‍क व थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी व साठवणूक) अधिसुचना 2018 मधील तरतुदीनुसार प्लॉस्ट‍िक पासुन बनविल्या गेलेल्या पिशव्या तसेच थर्माकॉल व प्लॉस्ट‍िक पासुन बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु इत्यादी तसेच अशा प्रकारच्या अनेक वस्तुचे उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री वाहतुक आयात व निर्यात करण्यास राज्यात पूर्णत: बंदी आहे.

सदर अधिसुचनेच्या अंमलबजाणीसाठी व नियमांतर्गत कारवाई करणेसाठी महाराष्ट्र अविघटनशिल कचरा नियंत्रण कायदा, 2006 च्या कलम 12 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत मा. आयुक्त यांनी सार्व. आरोग्य विभागामार्फत 13 स्वच्छता निरिक्षक यांची नियुक्ती करून महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमे दरम्यान महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशिल अधिसुचना 2018 कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकुण 4505 व्यवसायधारकांवर माहे एप्रिल, 2018 ते माहे जुन, 2021 पर्यंत कारवाई करून त्याअंतर्गत 16523 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच दंडात्मक कारवाई करून अंदाजे रु. 32,49,600/- इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. तसेच यापुढे सदरची माहिम सुरु ठेवण्यात येणार असून प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे सुचनेनुसार उपआयुक्त (आरोग्य) यांचे अध्यक्षतेखाली दक्षता कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे.

पावसाळ्यापुर्वी कच्चे/पक्के नाले सफाई :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकुण 155 कच्चे /पक्के नाले आहेत. मनपा. क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी कच्चे/ पक्के नाल्यांची साफ सफाईची कामे दि. 10/05/2021 रोजी पासून सुरु करण्यात आले होते. सदर कामी जे.सी.बी. मशिन, पोकलन मशिन, बोटसह पोकलन मशिन, हायड्रा मशिन, डंपर, टोरस व मनुष्यबळ आवश्यकतेनुसार उपलब्ध करणेसाठी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आली होती. सदरचे कच्चे /पक्के नाले सफाईची कामे मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता अधिकारी व उपआयुक्त (आरोग्य) यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली दि. 15/06/2021 पर्यंत पुर्ण करण्यात आलेली आहेत.

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्र हे खाडीलगत असल्याने शहरातील सखल/ अतिसखल भागामध्ये पावसाचे पाणी साचत असते. अशावेळी नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपसा करणेकामी अंदाजे 48 ठिकाणी भाड्याने सक्शन पंप लावणे कामी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्यांचेमार्फत साचणाऱ्या पाण्याचा उपसा वेळीच करण्यात येत आहे.

पावसाळ्या दरम्यान मनपा. क्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी 24 तास कार्यरत राहण्यासाठी प्रभाग समिती निहाय दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर दक्षता पथकामार्फत पावसाळ्याचे दिवसात येणाऱ्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्यात येत आहे.

विभागाची कामे :-

 1. शहरातील सार्वजनीक रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
 2. शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर, येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक वाहनामार्फत करणे व घनकचरा प्रक्रिया ठिकाणी टाकण्यात येतो.
 3. अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
 4. पावसाळयापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.
 5. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.
 6. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत कारवाई करणे.
 7. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
 8. स्वच्छ भारत अभियान राबविणे.

जॉबचार्ट

अधिकार पदनामकामाचा तपशिल
उप-आयुक्त (आरोग्य)
अजित मुठे

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ६३ नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा व घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २०१६ ची अंमलबजावणी करणे करीता, राज्य शासनाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

 • शहरातील दैनंदिन साफसफाई व दररोज निर्माण होणारा कचरा वाहतुक करणेबाबत धोरण निश्चित करणे.
 • शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे व त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणेबाबत धोरण निश्चित करणे.
 • पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुर करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणेबाबत धोरण निश्चित करणे.
 • स्वच्छ भारत अभियान राबविणे.
 • केंद्रीय माहितीचा अधिकार – 2005 नुसार अपिलीय अधिकारी म्हणून काम करणे.

1) स्वच्छता अधिकारी

राजकुमार कांबळे

2) स्वच्छता अधिकारी
संदिप शिंदे
1) स्वच्छता अधिकारी
राजकुमार कांबळे

2) स्वच्छता अधिकारी
संदिप शिंदे

 • शहरातील रस्ते, पदपथ व जागा यांची झाडलोट व साफसफाई करून कचरा वाहतुक करणे.
 • शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे व त्यावर प्रकिया करून विल्हेवाट लावणे.
 • अंतर्गत गटारे सफाई करणे.
 • पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची सफाई व अडथळे दुर करू पावसाळी पाणी प्रवाहीत करणे.
 • पावसाळ्या दरम्यान दक्षता पथकाची नेमणुक करणे, महानगरपालिकेच्या सखल परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा सक्शन पंप द्वारे करणे.
 • ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा साठविणे व त्याची वाहतुक करणे संदर्भात नियोजन करणे.
 • विकेंद्रीकरण पध्दतीचा अवलंब करून, कचरा निर्मितीच्या ठिक्ाणीच ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती अथवा बायोगॅस करणे सबंधित गृहनिर्माण संस्था/ व्यापारी संकुले यांना प्रोत्साहित करणे.
 • कचऱ्याचे स्त्रोताचे ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरण करीता नागरीकांचा सहभाग घेणे करीता प्रोत्साहन देणे.
 • घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम 2016 ची अंमलबजावणी करणेसाठी विधी तज्ञाच्या सहाय्याने उपविधी तयार करून सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने अंमलबजावणी करणे.
 • घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम 2016 तरतुदीनुसार वापर शुल्क (User Charges) वसुलबाबतचे धोरण सादर करणे.
 • कचरा वेचक कामगारांचा सहभाग घेऊन Self Help Group बनविणे व सुकचरा गोळा करणेबाबत धोरण सादर करणे.
 • मंजुर उपविधीनुसार सार्वजनिक रस्ते पदपथ व उपयोगाच्या जागा इत्यादी ठिकाणी केरकचरा, विष्टा, मलमुत्र करून उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांचे विरुध्द दंडात्मक व कायदेशिर कारवाई करणे.
 • भाजी मार्केट, मच्छीमार्केट, मटन मार्केट, हॉर्टीकलचर वेस्ट इत्यादी व्यवसायातून निघणाऱ्या कच-याची विल्हेवाट शास्त्रोयुक्त पध्दतीने त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे करीता सेंद्रीय खताचा अथवा बायोगॅस प्लांट स्थापन करणे संबंधी धोरण आखून सादर करणे.
 • कचऱ्यापासून अर्थजन्य करणेकरीता विकेंद्रीकरण पध्दतीच वापर करून मोठ्या गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, मॉल येथून Bio-methanation Microbial Composting पध्दतीच वापर करण्यात प्रोत्साहन देणे.
 • रस्ते झाडून संकलीत करण्यात आलेला कचऱ्याची विल्हेवाट व गटार सफाईतून निघालेला गाळ यांची विल्हेवाट लावणेबाबत नियंत्रण करणे.
 • नागरीकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जागृती करणे संबंधी IEC संबंधी घनकचरा व्यवस्थापन व लोकशिक्षण करून, मानवी स्वभावात बदल करणे संबधी धोरण आखणे. (Education, Communication & Changing in Behaviour)
 • ओला व सुका कचरा वाहतुकीच्या कामाचे नियोजन करणे करीता, वाहनाची मार्गक्रमणिका तयार करणे त्यांच्या वेळेची नियोजन करणे.
 • वाहनाचे (Vehicle Movement) GPRS व GPS System चा वापर करून Vehicle Tracking करणे व नियोजीत वेळ व प्रत्यक्ष कचरा वाहतुकीच्या कामातील वेळ यांच्या मध्य होणारी तफावत तपासून, कमीत कमी वेळात कचरा वाहतुक कार्यक्षमपणे केली जाईल याबाबत नियमन व नियोजन करणे.
 • केंद्र शासनाच्या आदेशानुसार कचरा वाहतुकीच्या वाहनावर बसविण्यात येणा-या GPRS व GPS System चा वापर करून, बिन्स मधील कचरा निर्धारीत वेळेत उचलण्यात आला काय? याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने पर्यवेक्षण करणे व परिचालन करणे. तसेच सफाई कामगरांची हजेरी नोंद बायोमेट्रीक पध्दतीने नोंद घेणे.
 • केंद्र शासनाच्या धोरणानुसार नागरीकांना साफसफाई विषयक कामाची तक्रार करणे करीता ICT Based चा वापर करून संगणक प्रणाली विकसीत करणे.
 • प्रभाग समिती निहाय दैनंदिन साफसफाई, घनकचरा वाहतुक अंतर्गत गटार सफाई व पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाले सफाईच्या कामाचे नियोजन करणे.
 • आरोग्य विभागासंबंधीत विविध विषयाच्या टिपणी, प्रस्ताव, मा.आयुक्त यांच्या मंजुरीस्तव सादर करणे, मा. महासभा/ स्थायी समितीच्या मंजुरीकरीता गोषवारा तयार करणे.
 • केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून प्राप्त होणारे तारांकित / अतारांकित प्रश्नाचे टिपणी व उत्तरे तयार करणे.
 • महानगरपालिका विविध विभागातील पत्रांना उत्तरे देणे, शासकीय पत्र व्यवहार पाहणे, माहितीचा अधिकार, लोकशाही दिन, आपले सरकार, पि.मए. पोर्टल तक्रार निवारण करणे, मा. महासभा, मा.स्थायी समिती बाबतचे पत्र व्यवहार पाहणे.
 • सार्वजनिक आरोग्यास उपद्रव करणारे व्यक्ती/ इमारती सोसायटी तबेलेधारक विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे.
 • नागरीकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणे करीता इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीया व केबल नेटवर्कचा वापर करणे.
 • प्लॅस्टिक पिशव्या विक्रेते, वाहतुक करणारे, साठवणूक करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करणे व प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमाची अंमलबजावणी करणे.
 • महानगरपालिकेच्या सर्व स्मशानभुमिमध्ये प्रेत दहन करणे करीता लाकडे पुरवठा करणे.
 • केंद्रीय माहितीचा अधिकार – 2005 नुसार माहिती अधिकारी म्हणून काम करणे.
 • स्वच्छ भारत अभियान राबविणेची कार्यवाही करणे.

विभागीय स्वच्छता निरिक्षक व प्र.स्वच्छता निरिक्षक
निळकंठ उदावंत,
भाईंदर (प.)
अरविंद चाळके,
मुर्धे ते उत्तन
प्रकाश पवार
जनतानगर, भाईंदर (प.)
कांतीलाल बांगर,
तलाव रोड, भाईंदर पुर्व

विजय पाटी,
काशिगाव

नितीन खैरे,
मिरारोड पुर्व

अनिल राठोड,
गोल्डन नेस्ट ते हटकेश

प्र.स्वच्छता निरिक्षक
रमेश घरत
खारीगाव, भाईंदर पुर्व
श्याम चौगुले
शांतीपार्क, मिरारोड पुर्व

 श्रीकांत पराडकर,

शांतीनगर, मिरारोड पुर्व
रविंद्र पाटील
कनकिया
मोहन पेडवी,
पेणकरपाडा, चेना ते दहिसर चेक नाका (हायवे पट्टा)

 • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ६३ नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा व घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २०१६ ची अंमलबजावणी करणे करीता, राज्य शासनाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
 • शहरातील रस्ते, पदपथ व जागा यांची झाडलोट व साफसफाई करून कचरा वाहतुक करणे इत्यादी कामे संबंधित कंत्राटदाराकडून पारपाडणे
 • शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे व त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणेबाबतचे अंमलबजावणी करणे.
 • अंतर्गत गटारे सफाई करणेबाबत अंमलबजावणी करणे.
 • पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची सफाई व अडथळे दुर करून पावसाळी पाणी प्रवाहीत करणेचे अंमलबजावणी करणे.
 • घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 ची जाहिरात करून जनजागृती करणे.
 • महानगरपालिका मुख्य कार्यालय, मनपा. विविध आस्थापना, समाज मंदिर, विरंगुळा केंद्र इत्यादी ठिकाणी कार्यालयीन साफसफाई व शौचालय सफाई कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
 • महानगरपालिलकेच्या स्मशानभुमित प्रेत दहन करणे करीता लाकडे उपलब्ध करून देणे व साफसफाई करून अद्यावत ठेवणे.
 • कचरा निर्मितीच्या ठिकाणची यादी अद्यावत करून कचरा निर्मिती करणाऱ्या विविध घटकांचा सहभाग घनकचरा व्यवस्थापनांमध्ये करून घेणे व कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रशिक्षण संबंधितांस देणे.
 • संबंधित विभागातील दैनंदिन साफसफाई कामावर स्वच्छता निरिक्षकांनी तपासणी करून असमाधानकारक काम करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक रक्कम इ. बाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविणे.
 • साफसफाई कामाचा दैनंदिन अहवाल अद्यावत ठेवणे.
 • घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा साठविणे करीता प्रचार प्रसारण करणे व उक्त नियमातील तरतुदीनुसार साठविण्यात आलेल्या ओला व सुका कचऱ्याची स्वतंत्ररित्या वाहतुक, कचरा वाहतुक कंत्राटदाराकडून करून घेणे.
 • सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रस्ते, पदपथ इत्यादी ठिकाणी कचरा, तत्सम पदार्थ व उघड्यावर शौच करणाऱ्या ठिकाणी शौचालयाचे वापर करणेबाबत जनजागृती करणे.
 • प्लॅस्टिक पिशव्या विक्रेते, वाहतुक करणारे, साठवणुक करणाऱ्या व्य्क्तीं विरुध्द कारवाई करणे.
 • सार्वजनिक आरोग्यास उपद्रव करणारे व्यक्ती/ इमारती सोसायटी विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे.
 • वरिष्ठ व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सुचनेनुसार कामे पारपाडणे.
 • कंत्राटदाराने आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्रीस न पुरविल्यास संबंधित कंत्राटदारा विरुध्द विभाग स्तरावरून प्रथमत: नोटीस बजावणे.
 • आपले सरकार, पि.एम. पोर्टलवरील तक्रारींवर कारवाई करणे.
 • घनकचरा शुल्क वसुल व दंड वसुल करणे व किरकोळ पावती पुस्तीका व पोटकिर्द अद्यावत ठेवणे.
 • स्वच्छ भारत अभियान राबविणेची कार्यवाही करणे.

कर्मचारी माहिती

अधिकाऱ्याचे वा कर्मचाऱ्याचे नांवपदनामदुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल
अजित मुठेउप-आयुकत (आरोग्य)9420610003
सचिन बच्छावसहा. आयुक्त9599513222
राजकुमार कांबळेस्वच्छता अधिकारी8422811299
संदीप शिंदेस्वच्छता अधिकारी8422811291
निळकंठ उदावंतस्वच्छता निरिक्षक8422811285
अरविंद चाळकेस्वच्छता निरिक्षक8422811287
निळकंठ उदावंतस्वच्छता निरिक्षक8422811285
प्रकाश पवारस्वच्छता निरिक्षक8433911170
कांतीलाल बांगरस्वच्छता निरिक्षक8433911177
रमेश घरतप्र. स्वच्छता निरिक्षक8422811266
नितीन खैरेस्वच्छता निरिक्षक8422811289
विजय पाटीलस्वच्छता निरिक्षक8422811296
अनिल राठोडस्वच्छता निरिक्षक8422811295
श्याम चौगुलेप्र. स्वच्छता निरिक्षक8422811290
मोहन पेडवीप्र. स्वच्छता निरिक्षक8422811298
रविंद्र पाटीलप्र. स्वच्छता निरिक्षक8433911169
श्रीकांत पराडकरप्र. स्वच्छता निरिक्षक8422811292
दत्तात्रेय वरकुटेवरिष्ठ लिपिक9969565953
दिनेश कानगुडेलिपिक8422811359

छायाचित्रे :-

उपक्रम / योजना :-

मनपा. क्षेत्रातील दैनंदिन घनकचरा वाहतुक करणेकामी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शासन निर्णय क्र. स्वमअ-2018/ प्र.क्र.355(6)/ नवि-34, दि.30/1/2019 घनकचरा वाहतुक करणेकामी GeM Portal द्वारे 117 वाहने खरेदी करणेसाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार GeM Portal द्वारे 117 वाहने खरेदी करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

घनकचरा निर्मात्याने कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून स्वतंत्र डब्ब्यात देणे बंधनकारक आहे. ओला कचरा व सुका कचऱ्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.

 1. ओला कचरा (जैविक विघटनशिल कचरा) यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या कवट्या, फुले, बागेतील कचरा इत्यादी तसेच स्वयंपाक घरातील टाकाऊ पादार्थ यांचा समावेश आहे.
 2. सुका कचरा (पुर्नवापर करण्यात येणारा कचरा) यामध्ये प्लास्टिक, लाकुड, थर्माकॉल, धातुचे वस्तु, काच, रबर, प्लास्टिक /काचेच्या बाटल्या, रेगझीन यांचा समावेश आहे. इमारती /सोसायटीमधून निर्माण होणारा घनकचरा ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून महानगरपालिकेस न दिल्यास महानगरपालिकेतर्फे कचरा उचलण्यात येणार नाही.

नागरिकांची सनद :-

सार्वजनीक प्राधिकरणाचे नाव सार्वजनीक आरोग्य विभाग
संपुर्ण पत्ता मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम.
कार्यालय प्रमुख उप-आयुक्त (आरोग्य)
कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे? घनकचरा व्यवस्थापन विभाग
कार्यकक्षा : भौगोलिक सुमारे 79 चौ. कि.मी.
अंगीकृत व्रत (Mission) सक्षम, तत्पर प्रशासन
ध्येय  धोरण (Vision) अंतर्गत व बाह्य प्रशासनात पारदर्शकता
साध्ये नागरी सुविधा
जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल शहरातील दैनंदिन साफसफाई करणे, रस्ते, गटारे सफाई करणे, घरोधरी जाउन कचरा गोळा करुन उत्तन येथील प्रकल्प ठिकाणी वाहतुक करणे तसेच शहरातील पावसाळयापुर्वी कच्चे /पक्के नाले सफाई खोदाई करणे आदी कामे करण्यात येतात.
कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा) सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत कार्यालयीन दुरध्वनी – 28192828/ 28193028 health@mbmc.gov.in mbmchealth@gmail.com
सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्दा आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
उघडी गटारे तुंबून व भरून वाहणेबाबत सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)
रस्ते सफाई / कचरा वाहतुक सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक सोमवार ते शनिवार मा. उप-आयुक्त (आरोग्य)
वेळ सकाळी 7.00 ते 3.00
कचरा कुंडीतील कचरा, रॅबिट /माल हलविणे सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
गटारातील साचवलेला गाळ काढणे संबंधित स्वच्छता निरिक्षक तक्रार आल्यास 24 तासाचे आत साप्ताहीक कार्यक्रम राबविणे मा. उप-आयुक्त (आरोग्य)
रस्त्यावरील कचरा /माती उचलणेसाठी संबंधित मालकांना नोटीस देणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 48 तसाचे आत मा. उप-आयुक्त (आरोग्य)
संबंधित मालकाने रॅबिट/ माती महानगरपालिकेच्या सफाई कामगारा मार्फत उचलणे संबंधित स्वच्छता निरिक्षक नोटीस, मुदतीनंतर 9 दिवसाचे आत संबंधित रक्कम मालकाकडून करण्यात येईल. मा. उप-आयुक्त (आरोग्य)
मृत जनावरांची विल्हेवाट लावणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
सार्व. शौचालये व खाजगी इमारतीचे सेप्टीक टँक सफाई करणे लिपिक, मुख्य कार्यालय, आरोग्य विभाग फी भरल्यानंतर 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
किटक नाशके/ औषध फवारणी मुकादम/ स्वच्छता निरिक्षक आठवडयातून एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)
गटारामधील गाळ काढणे स्वच्छता निरिक्षक आठवडयातू एकदा मा. उप-आयुक्त (आरोग्य)
संबंधित मालकाने राडारोडा न उचलेस मनपाने उचलणे मुकादम/ स्वच्छता निरिक्षक नोटीस मुदती नंतर सुमारे सात दिवसाचे आत संबंधित मालकाकडून दंड रक्कम वसूल करणे मा. उप-आयुक्त (आरोग्य)

निविदा :-

वार्ड साफसफाई / नाले सफाई

दरपत्रके :-

निरंक

कार्यालयीन पत्रके:-

नेमणूक बदली:-

कामाचे आदेश:-

 1. प्रभाग समिती वॉर्ड साफसफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.
 2. नाले सफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.

निविदा निवड यादी :-

मा. अति.आयुक्त – अध्यक्ष
उप-आयुक्त (मु.) – सदस्य
मुख्यलेखाधिकारी – सदस्य
शहर अभियंता – सदस्य
मुख्य लेखापरिक्षक – सदस्य
विभाग प्रमुख – आरोग्य विभाग

नागरी संदेश :-

 • ओला व सुका कचरा वेगवेगळा करून स्वतंत्र कचरापेटीत देणेबाबत. (सोबत फोटो जोडला)
 • सार्वजनीक स्थळांवर कचरा न टाकणे व सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवणे.
 • प्लास्टिक पिशव्या न वापरणे.
 • उघडयावर शौचास बसणेस प्रतिबंध करणे बसणे व शौचालयाचा वापर करण्या प्रवृत्त करणे.
 • स्वच्छ सुंदर मिरा भाईंदर करणेस सहकार्य करणे.

अंदाजपत्रके :- दि.01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 मंजुर अंदाजपत्रक तपशिल.

लेखाशिर्षाचे नावलेखा संकेतांक(रु. लाखात)तपशिल
दुर्गंधी नाशके/ साहित्य वस्तु खरेदी253250महानगरपालिका मालकीच्या आस्थापनातील अंतर्गत दैनंदिन साफसफाई करणे व शहरात विविध धार्मिक सण /उत्सव निमित्त सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी फवारणी करणेकामी आवश्यक दुर्गंधी नाशके खरेदी करणे.
वॉर्ड सफाई/नाले सफाई25501000महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटारे सफाई, निर्माण होणारा घनकचरा गोळा करून वाहतुक करणेकामी आवश्यक लागणारा मनुष्यबळ व कचरा वाहतुक वाहने भाड्याने घेणे
अ) पावसाळ्यापुर्वी नाले सफाई/ खोदाई 300महानगरपालिका क्षेत्रातील कच्चे, पक्के नाले सफाई करणे, गाळ, माती, कचरा वाहतुक करणेकामी जे.सी.बी., पोकलन, बोटपोकलन, हायड्रा मशिन, टोरस, मनुष्यबळ इत्यादी भाड्याने घेणे
पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनविणे222510महानगरपालिका क्षेत्रातील हवा, पाणी, माती यांचे परिक्षण दर माह मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1965 कलम 67(अ) नुसार पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनविणे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान 100केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान / स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृती करणे अंतर्गत नमुद केलेली कामे करणे.
मनपा. मालकी आस्थापना मधील दैनंदिन साफसफाई House Keeping एजन्सी नेमणे 100महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत देखभाल व साफसफाई करणे.
कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटी देणे 10मनपा.च्या सार्व. आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटी देणे.
रुग्णालये व दवाखाने253980महानगरपालिका मालकीच्या एकुण 14 स्मशानभुमिमध्ये प्रेत दहनाकरीता जळाऊ लाकडे खरेदी करणे.
04 स्मशानभुमि
(2) बेवारस प्रेत विल्हेवाट/ लाकडे खरेदी करणे
बांधकाम – 11 (06)2434600मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात नागरीकांना शौचालय सुविधा अंतर्गत सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देणेत आले आहेत. सदर शौचालये साफसफाई, देखभाल निगा राखणे.
अ) सार्व. शौचालय व मुतारी देखभाल व साफसफाई दुरुस्ती(बांधकाम / आरोग्य)
भांडवली खर्च
लेखाशिर्षाचे नावलेखा संकेतांक(रु. लाखात)तपशिल
अ) डस्टबिन खरेदी करणे416010महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग दि. 29 एप्रिल, 2017 परिपत्रकानुसार घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 नुसार शहरात निर्माण होणारा घनकचरा जागेवरच स्वतंत्र वर्गीकरण करून महानगरपालिकेस हस्तांतरीत करणेकामी शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था/ संकुले यांना बंधनकारक असून आवश्यक लागणारे डस्टबिन खरेदी करणे
ब) सक्शन पंप मशिन, भाडे/ वाहन खरेदी (मलनिस:रण) 50महानगरपालिका क्षेत्रात सखल / अतिसखल भागात पावसाळ्या दरम्यान साचणारे पाण्याचा वेळीच उपसा करणेकामी सक्शन भाड्याने घेणे तसेच खाजगी इमारतीच्या शौचालयाच्या सेप्टीक टँक सफाई करणेकामी कार्यरत वाहनांची देखभाल, दुरुस्ती व निगा राखणे तसेच नविन वाहने खरेदी करणे.

हाती घेतलेली कामे:-

 1. शहरातील दैनंदिन साफसफाई करणे, रस्ते, गटारे सफाई करणे, घरोघरी जाउन कचरा गोळा करुन उत्तन येथील प्रकल्प ठिकाणी वाहतुक करणे, शहरातील पावसाळयापुर्वी कच्चे /पक्के नाले सफाई खोदाई करणे तसेच पावसाळया दरम्यान नागरी वसाहतीमधील सखल भागात जमा होणारे पावसाचे पाण्याचा सक्शन पंपाद्वारे उपसा करणे आदी कामे करण्यात येतात.
 2. मनपा. क्षेत्रातील रस्ते/ मार्गावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे, उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्ती/ संस्थाना दंड करावयाचे खालीलप्रमाणे परिपत्रक, अधिसुचना, महानगरपालिका उपविधी अन्वये दिलेल्या ठरावीक रक्कमेनुसार करणे बंधनकारक आहे.
 • घनकचरा,व्यवस्थापन नियम 2016 च्याअनुषंगाने, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग मंत्रालय यांचेकडील दि. 10/07/2018 चे परिपत्रक, 
 • महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर 19, 2018, 
 • शासन निर्णय क्र.स्वमअ-2017/ प्र.क्र.256/नवि-34, दि.30/12/2017.
 • महानगरपालिका घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी दि. 01/07/2019 अधिसुचना. 
 • पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांचेमार्फत दि.23 मार्च, 2018 अधिसुचना.
कृती /बाब“क” व “ड” वर्ग महानगरपालिका रुपये
रस्ते /मार्गावर घाण करणे150/-
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे100/-
उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे100/-
उघड्यावर शौच करणे500/-
सोसायटी/ घरे यांनी विलगीकरण न केलेला व वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपविल्याबद्दल अ) व्यक्ती 
पहिला प्रसंग50/-
दुसरा प्रसंग100/-
तिसरा प्रसंग150/-
नंतरच्या प्रत्येक प्रसंगी150/-
ब) मोठ्याप्रमाणावरील कचरा निर्माण करणारे जनक 
पहिला प्रसंग3000/-
दुसरा प्रसंग6000/-
तिसरा प्रसंग9000/-
नंतरच्या प्रत्येक प्रसंगी9000/-
कचरा जाळल्यास (विशिष्ट वर्गवारी/ परिस्थिती)300/-
सार्वजनिक सभा/ समारंभ संपल्यावर चार तासांच्या आत स्वच्छता न केल्याबद्दलस्वच्छता अनामत रक्कम जप्त करणे.
Construction & Demolition waste सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागा या ठिकाणी टाकल्यास15,000/- प्रती वाहन

घेतलेली कंत्राटे :-

वॉर्ड साफसफाई / नाले सफाई/ सक्शन पंप पुरवठा/ हाऊस किपिंग/ सार्वजनिक शौचालय सफाई

स्वच्छता निरिक्षक यांचे कार्यक्षेत्राची माहिती :-

स्वच्छता निरिक्षकाचे नाव विभाग प्रभाग समिती क्र. वॉर्ड क्र. मोबाईल क्रमांक
निळकंठ उदावंत भाईदर (प) 1 8 8422811285
अरविंद चाळके मुर्धे ते राई डोंगरी ते उत्तन 23, 24 8422811287
निळकंठ उदावंत भाईदर (प) 2 6, 7 8422811285
प्रकाश पवार जनता नगर 1 8433911170
कांतीलाल बांगर नवघर भाईदर (पूर्व) 3 3, 10, 11 8433911177
रमेश घरत तलाव रोड भाईदर (पूर्व) 2, 4, 5 8422811266
नितीन खैरे पुजा नगर मिरा रोड 4 22, 9 8422811289
विजय पाटील काशिमिरा मिरा रोड 16 8422811296
अनिल राठोड हटकेश 12, 18 8422811295
श्याम चौगुले शांतीनगर मिरारोड 5 20, 21 8422811290
मोहन पेडवी मिरा ते चेना 6 14, 15, 8422811298
रविंद्र पाटील गोल्डन नेस्ट 13 8433911169
श्रीकांत पराडकर शितल नगर मिरारोड 17, 19 8422811292
पर्यावरण अहवाल
Swachh Survekshan 2022