शेवटचा बदल जानेवारी 2nd, 2023 at 06:50 am

मध्यवर्ती भांडार विभाग
सहा.आयुक्त (भांडार) | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
जगदीश भोपतराव | 28192828 – 144 | mbmcstore@gmail.com / store@mbmc.gov.in |
प्रस्तावना
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भांडार विभागामार्फत विविध विभागास स्टेशनरी खरेदी, विविध प्रकारची नमुने, फॉर्म, रजिस्टर छपाई करणे, फर्निचर खरेदी, दुरुस्ती, बोर्ड-बॅनर पुरविणे, वृत्तपत्रे खरेदी, ओळखपत्र निविदा/ दरपत्रके मागवून पुरवठा करणे तसेच आस्थापनेवरील स्थायी चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक वर्ग-03 यांना DBT धोरणाअंतर्गत पावसाळी साहित्य (छत्र्या, रेनकोट, गमबूट) तसेच गणवेश पुरवठा करणे व इतर कामकाज करण्यात येते.
कर्तव्ये व कामकाज :-
अ.क्र. | पदनाम | कर्तव्य व कामकाज |
1. | उप-आयुक्त (भांडार) | 1. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भांडार विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून सर्व जबाबदा-या पार पाडणे. 2. भांडार विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 3. रक्कम रु. 2 लाखापेक्षा कमी रक्कमेच्या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देणे व निविदा मागविणे, मा. निविदा समिती मंजुरीअंती निविदा दर मंजुरीप्रमाणे कार्यादेश देणे, मुदतवाढ देणे. 4. मंजुर निविदाधारकांसोबत करारनामा करणे, कार्यादेश देणे. 5. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे. |
2. | भांडार अधिकारी | 1. महानगरपालिकेच्या विविध विभागास लागणारे स्टेशनरी साहित्य, विविध प्रकारचे नमुने, बोर्ड बनविणे, फर्निचर खरेदी करणे, कर्मचा-यांना दर 2 वर्षानी छत्र्या, रेनकोट, गणवेश पुरवठा करणे कामी निविदा प्रक्रिया करणेसाठी प्रस्ताव सादर करणे. मंजुर निविदाधारकांस मागणीनुसार कामाचे कार्यादेश देण्याची कार्यवाही करणे. 2. महानगरपालिकेचे पदाधिकारी, जनसंपर्क विभाग, पत्रकार कक्ष, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे वृत्तपत्रे पुरवठा करणे. 3. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे. |
3. | वरिष्ठ लिपीक | 1. आवक-जावक पत्रव्यवहारची नोंद घेणे. 2. निविदा प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही करणे. 3. कंत्राटदाराने पुरवठा केलेल्या साहित्यांची नोंद स्टॉक रजिस्टरला घेणे व सदरचे साहित्य संबधीत विभागास वितरीत करुन त्याची नोंद घेणे. 4. पुरवठा केलेल्या मालाचे देयक तयार करणे. 5. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे. 6. मा. आयुक्त सो. यांचे आदेश परिपत्रकानुसार भांडार विभागाचे कामकाज विहित मुदतीत पुर्ण करणेबाबत कामकाज करणे. 7. अभिलेख जतन कायदा 2005 अंतर्गत अभिलेख निंदणीकरण जतन करणेकामी अ, ब, क, ड वर्गीकरण करुन अभिलेख अद्यावत करणे. 8. प्रस्ताव रजिस्टरवर नोंदी घेणे. 9. प्राप्त लेखा आक्षेप अनुपालन अहवाल सादर करणे आणि अभिलेख उपलब्ध करुन देणे. 10. नमुना नं. 116, नमुना नं. 78, नमुना नं. 1, किरकोळ पावती पुस्तकात नोंदवहीत नोंदी घेणे. 11. देयक रजिस्टर नोंदी घेणे. |
शासन निर्णय :-
- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : सीएलजी-1083/2514/24 दिनांक 19 सप्टेंबर 1990 अन्वये शासकीय चुतर्थश्रेणी कर्मचा-यांना टेरिकॉट कापडाचा गणवेश देणेबाबत शासन निर्णय आहे.
- राज्य शासकिय व जिल्हा परिषद कार्यालयातील वाहनचालक यांना टेरिकॉट (सफेद रंगाचा) गणवेश पुरविण्याबाबत शासन निर्णय क्र. सामान्य प्रशासन विभाग-गणवेश-3493/प्र.क्र.45/95/29 मुंबई दि. 07 जुन 1996 अन्वये प्रत्येक वाहनचालकास दर 2 वर्षातुन एकदा रु. 1000/- एवढया रक्कमेची गणवेश खरेदी करणेकरिता मंजुरी प्राप्त असुन उक्त रक्कमेची खरेदी पावत्या सादर करणे बंधनकारक राहिल.
- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : गणवेश-3406/प्र.क्र.126/2004/29 दिनांक 26 मार्च 2008 अन्वये राज्य शासकिय चुतर्थश्रेणी संवर्गातील शिपाई कर्मचाऱ्यांच्या (पुरुष) गणवेशाच्या शिलाई दर रु. 250/- व स्त्रियांसाठी ब्लाऊज शिलाई रु. 50/- प्रती एक जोड इतके दर शासन निर्णयाप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : भांखस-2014/प्र.क्र. 82/उद्योग-4 दि. 30 ऑक्टोंबर 2015 अन्वये “शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका” प्रसिध्द झालेली आहे.
- महाराष्ट्र शासन निर्णय क्र. 054/31/2016/39 दि. 11 मे 2019 अन्वये रक्कम रु. 10.00 लाखापेक्षा अधिक खर्चाची साहित्य खरेदी करणेकामी ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्यात येते.
परिपत्रक :-
- सन 2020-21 या वित्तीय वर्षात महानगरपालिका कर्मचारी वर्ग – 4 करिता छत्र्या, रेनकोट व गमबूट वस्तुरुपात मिळणा-या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणेबाबत.
कार्यादेश :-
- मिरा भाईंदर महानगरपालिकेस विविध प्रकारचे नमुने, फॉर्म, रजिस्टर छपाई करणेकामी मे. गजानन इमेजिंग प्रिंट सोल्युशन, मे. अनिरुध्द इम्प्रेशन व मे. वसंत ट्रेडर्स यांच्या निविदा मा. आयुक्त सो. यांनी दि. 20/10/2021 रोजी मंजुर केलेल्या आहेत.
- महानगरपालिकेस विविध प्रकारचे बोर्ड-बॅनर, होर्डिग्ज, नेमप्लेट छपाई करणेकामी मे. श्री. ए.डी. इंटरप्रायजेस, मे. सह्योगिनी वस्तीस्तर संस्था, मे. ओमकार इंटरप्रायजेस यांच्या निविदा मा. आयुक्त साो. यांनी दि. 23/12/2021 रोजी मंजुर केलेल्या आहेत.
- महानगरपालिकेस विविध प्रकारची स्टेशनरी साहित्य खरेदी करणेकामी दरपत्रके मागविण्यात आलेली असुन मे. एम.एस.इंटरप्रायजेस, मे. ओमकार इंटरप्रायजेस व मे. सुजल नोव्हेल्टी या मंजुर दरपत्रकधारकास मा. आयुक्त सो. यांनी दि. 23/03/2022 रोजी मंजुरी दिलेली आहे.
- मिरा भाईंदर महानगरपालिकेस विविध प्रकारचे फर्निचर साहित्य खरेदी करणेकामी मे. श्री. इंटरप्रायजेस, मे. युनिवर्सल ट्रेडींग कंपनी व मे. श्री. ए. डी. इंटरप्रायजेस यांच्या निविदा मा. आयुक्त सो. यांनी दि.31/03/2022 रोजी मंजुरी दिलेली आहे.
- मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुख्य कार्यालय, प्रभाग कार्यालय क्र. 1 ते 6 व इतर विभागीय कार्यालयातील विभागप्रमुख यांच्या देखरेखीखाली व मान्यतेने कार्यालयातील कागदपत्रांचे, नस्त्यांचे अ,ब,क,ड वर्गीकरणानुसार लाल, पिवळा, हिरवा व सफेद कपड्याचे गठ्ठे बांधून लावणे व ड वर्ग रद्दी पेपर, फाईल पुठ्ठे उचलून तेथील कार्यालयाची अंतर्गत व बाह्य संपुर्ण स्वच्छता करणेबाबत ड वर्ग रद्दी विक्रीचे दरपत्रक काढण्यात आलेले असुन मे. महालक्ष्मी रद्दी पेपर स्क्रॅप मार्ट यांचे दरपत्रक मा. आयुक्त सो. यांनी दि. 24/02/2022 रोजी मंजुरी दिलेली आहे.
अंदाजपत्रक
अ.क्र. | लेखाशिर्षक | तरतुद | कोड नंबर |
1. | सामान्य प्रशासन – स्टेशनरी / छपाई खर्च | 80.00 | 2214 |
2. | स्थानिक संस्था कर – स्टेशनरी / छपाई खर्च | 2.00 | 2214 |
3. | कर विभाग – स्टेशनरी / छपाई खर्च | 8.00 | 2214 |
4. | रुग्णालये – स्टेशनरी / छपाई खर्च | 10.00 | 2214 |
5. | जन्म/मृत्यू – स्टेशनरी / छपाई खर्च | 2.00 | 2214 |
6. | ग्रंथालये – स्टेशनरी / छपाई खर्च | 3.00 | 2214 |
7. | नियतकालिके पुरवठा | 9.00 | 2243 |
8. | कर्मचारी गणवेश व पावसाळी साहित्य | 25.00 | 2145 |
9. | फर्निचर देखभाल दुरुस्ती इ. | 5.00 | 2480 |
10. | 26 जाने, 15 ऑगस्ट, 1 मे खाऊ वाटप | 1.00 | 2742 |
11. | साहित्य / फर्निचर / मशीन खरेदी | 10.00 | 4180 |
देयके :-
- विविध प्रकारची स्टेशनरी
- विविध प्रकारची छपाई
- विविध प्रकारची बोर्ड-बॅनर, होर्डिग्ज, फलक