मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल सप्टेंबर 21st, 2021 at 09:11 am

वाहन विभाग

प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिकेची एकुण 66 वाहने आहेत. सदर वाहनामध्ये कार, टेम्पो, ट्रॅक्टर, मोबाईल जीप, महिंद्रा मॅक्सीमो, रुग्णवाहिका , शववाहिनी, तसेच अग्निशमन सेवेत रेस्क्यु व्हॅन, वॉटर टेंडर, टँकर इ. वाहने सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग, पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत.

सदर वाहनाची आवश्यकते नुसार दरपत्रके प्रसिध्दी देऊन दुरुस्ती केली जाते.

महापालिकेकडे असलेली वाहने पदाधिकारी व अधिकारी यांच्या तुलनेत अपुरी असल्याने वाहन विभागामार्फत वाहने वाहन चालकासह इंधनासह(संपूर्ण सेवा) भाडयाने घेणे कामी वार्षिक निविदा मंजुर करुन ठेका वाहने पुरवठा करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत अग्निशमन विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागात 2 ते 3 पाळी मध्ये वाहने कार्यरत असल्याने महापालिकेकडे असलेले कायम वाहन चालकांची संख्या अपुरी असल्याने मनपाच्या विविध विभागातील वाहनांवर ठेका पध्दतीने वाहन चालक पुरवठा करणे वार्षिक निविदा प्रसिध्द करुन निविदेतील मंजुर दरानुसार किमान वेतनानुसार ठेका वाहन चालक पुरवठा करण्यात येतो.मिरा भाईंदर महापालिकेचे जे पदाधिकारी व अधिकारी मनपाच्या कार्यालयीन कामकाजा करीता महापालिकेच्या वाहना ऐवजी स्वत:चे वाहन वापरतात अशा पदाधिकारी व अधिका-यांना मा. स्थायी समितीच्या ठरावा नुसार वाहन प्रतिपुर्ती भत्ता अदा केला जातो.

कर्तव्ये व कामकाज :-
  • महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमध्ये वेळोवेळी उत्पन्न होणारी दुरुस्ती करणे, इंधन पुरवठा करणे, पदाधिकारी/ अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे, तसेच विभागाच्या मागणीनुसार मा. आयुक्त साो. यांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा, आपतकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ.
  • विभाग प्रमुख (वाहन) यांनी जन माहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.
अ.क्र.      पदनाम                      कर्तव्ये व कामकाज
1. उप-आयुक्त (वाहन) 1.   मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वाहन विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून सर्व जबाबदा-या पार पाडणे. 2.   वाहन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 3.   रक्कम रु. 2 लाखापेक्षा कमी रक्कमेच्या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देणे व निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, मुदतवाढ देणे. 4.   मंजुर निविदाधारकांसोबत करारनामा करणे, कार्यादेश देणे. 5.   माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये वाहन विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.
2. विभाग प्रमुख (वाहन)
  1. महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमध्ये वेळोवेळी उत्पन्न होणारी दुरुस्ती करणे, इंधन पुरवठा करणे, पदाधिकारी/ अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे, तसेच विभागाच्या मागणीनुसार मा. आयुक्त साो. यांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा, आपतकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ.
  2. विभाग प्रमुख (वाहन) यांनी जन माहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.
  लिपीक 1.   आवक-जावक पत्रव्यवहारची नोंद घेणे. 2.   निविदा प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही करणे. 3.   माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये वाहन विभागाचे सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे.
जॉब चार्ट

आयुक्त
|
उप-आयुक्त (वाहन)
|
सहा.आयुक्त (वाहन)
|
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (रिक्त)
|
लिपीक
|
वाहन चालक
|
संगणकचालक (ठेक्यावर)
|
शिपाई
|
सफाई कामगार

1) निविदा प्रक्रिया करुन दरकरार करणे
2) आवश्यकतेनुसार खरेदी करणे
3) वाहनांचे वाटप करणे.
4) स्टॉक रजिस्टरला नोंदी घेणे.
5) नमुना नं.127 (लॉगबुक) व नमुना नं.126 (इंधनबुक) नोंद वही मध्ये
नोंद घेणे.
6) देयक अदा करणे
7) इतर अनुषंगिक कामे.

.क्र. अधिकारी कर्मचायाचे नाव   पदनाम   सोपविण्यात आलेली कामे  
1   श्री. मारुती गायकवाड   उपआयुक्त (वाहन)   उप-आयुक्तांकडे सोपविलेल्या विभागातील विविध कामासाठी प्रत्येक कामाच्या प्रकरणी निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, विविध कामाच्या मंजुर निविदा धारका सोबत करारनामा करणे, कामाचे आदेश देणे, वेळोवेळी कामास मुदतवाढ देणे. इ.
2   श्री. सचिन बच्छाव   विभाग प्रमुख (वाहन)   महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर                     देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमधे वेळोवेळी उत्पन्न होणारी दुरुस्ती करणे, पदाधिकारी/ अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे, तसेच विभागाच्या मागणीनुसार मा. आयुक्त साो. / मा. उप-आयुकयांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा, आपतकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने  व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ.  
3     कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)   पद रिक्त आहे.  
4   श्री.उल्हास आंग्रे   लिपिक   ठेका पध्दतीने वाहन पुरवठा करणे, तसेच ठेका वाहन पुरवठा करणे कामाच्या निविदांचे व दरपत्रकाचे दस्तऐवज, आवक/जावक रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, प्रस्ताव रजिस्टर, तरतुद रजिस्टर, नमुना नं.126, नमुना नं.127, मोटार वाहन विषयक माहिती व दुरुस्ती अभिलेख इतिहास बुक अद्यावत करणे तसेच माहिती अधिकार व पदाधिकारी नागरीकाच्या पत्रांना उत्तर देणे, पदाधिकारी व अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता तयार करणे  इ.
5   वाहनचालक (३८) पदाधिकारी/अघिकारी यांच्या वाहनांवर मनपाच्या विविध विभागातील वाहन वाहनचालक म्हणुन काम करणे व वाहनाची निगा राखणे.
6   निलिमा वैती (ठेका) संगणकचालक कार्यालयीन पत्रव्यवहार, माहिती अधिकार पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज.
8 श्री. रोहित पाटील शिपाई वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे,  विविध कार्यालयात जाऊन देयकांवर स्वाक्षरी घेणे, इतर कार्यालयीन कामकाज.
9 श्री. भरत पाटील सफाई कामगार वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे
10 श्री. पिटर थॉमस सफाई कामगार वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे
  • मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागांकरीता दैनंदिन कामकाजाकरीता तसेच अत्यावश्यक सेवेकरीता व आपत्कालीन सेवेकरीता वाहने वाहन चालकासह इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे, विविध विभागात ठेका वाहनचालक पुरवठा करणे, निविदा प्रक्रिया पुर्ण करणे व त्या अनुषंगीक कारवाई पुर्ण करुन आवश्यकतेनुसार विविध विभागांच्या मागणीनुसार मा.आयुक्त साो / मा. उप-आयुक्त यांच्या मान्यतेने अधिकारी/पदाधिकारी व लोकोपयोगी वाहने खरेदी करणे.
  • वाहन दुरुस्ती, सर्विसींग, पंक्चर, इ कामी निविदा तसेच दरपत्रके मागविणेची अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे.
  • वाहनांची देखभाल दुरुस्ती तसेच नविन वाहनांचे प्रादेशिक कार्यालय, ठाणे यांचे मार्फत रजिस्ट्रेशन करणे, करात माफी, विमा काढणे, विमा नुतनीकरण करणे, इ.
  • विविध विभागातील नादुरुस्त वाहनांची दुरुस्ती करणे
विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती :-

1. श्री. मारुती गायकवाड, उप-आयुक्त (वाहन)
2. श्री. सचिन बच्छाव, विभाग प्रमुख (वाहन)
3. श्री. उल्हास आंग्रे, लिपीक
4. श्री. रोहित पाटील, शिपाई
5. कु. निलिमा वैती, संगणक चालक (ठेका)

शासन निर्णय :-

• शासन निर्णय क्र.भाकस 2014/ प्र.क्र. 82/भाग- 3/उद्योग-4/गि.30 ऑक्टोबर 2015,
• शासन निर्णय वाहन 2014/ प्र.क्र.9/14/विनिमय, दि.08 मे,2014, व शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, मोटार वाहन अधिनियम, 1988 अन्वये
• शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.23/14/विनिमय, दि. 30 मे 2014
• शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.5/सेवा-5, दि. 03 जुन 2104
• शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.36/14/विनिमय, दि. 22 ऑगस्ट 2014
• शासन निर्णय क्रमांक: वाहन 2014/प्र.क्र.9/14/विनिमय, दि. 8 मे 2014