शेवटचा बदल मे 9th, 2022 at 10:47 am

महिला व बाल कल्याण विभाग
विभाग प्रमुख | टेलीफोन / मोबाइल क्रमांक | ई-मेल |
---|---|---|
चारुशिला खरपडे | 022-28192828 Ext no.-126/8422811386 | mahilabalkalyan@mbmc.gov.in |
प्रस्तावना
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम- 30 अन्वये महिला व बालकल्याण विशेष समितीची स्थापना करण्यात येते.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम- 30 (2) अन्वये महानगरपालिकेस तिच्या सभेत उपस्थित असलेल्या व मत देणाऱ्या पालिका सदस्यांपैकी कमीत कमी दोन तृतीयांश पालिका सदस्यांनी मत देवून पारित केलेला विशिष्ट् ठरावाद्वारे महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाचे क्षेत्र, अधिकार, व कर्तव्य निश्चित करण्यात येते.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम- 30(3) अन्वये महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची सभापती व उपसभापती म्हणून नेमणूक करण्यात येते.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम- 30 (1)(अ) अन्वये महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यापैकी किमान 75 टक्के सदस्य हे महिला पालिका सदस्यांमधील असतील.
- महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समितीचे 15 सदस्य आहेत.
- महिला व बालकल्याण समितीची सभा प्रत्येक महिन्याला एक होणे अपेक्षित आहे.
समितीचे अधिकार व कर्तव्य
- शासन निर्णय क्रमांक संर्किर्ण 2005 प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 नुसार व योजनाच्या विविध मार्गदर्शन सुचना योजनेच्या अटीशर्तीस अधिन राहून योजना राबविणे अभिप्रेत आहे.
- या विशेष समितीचे वतीने होणारे सर्व कामकाज/निर्णयास त्या समितीच्या एकूण सदस्यापैकी निदान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठींबा अभिप्रेत आहे.
- महिला व बालकल्याण विभागाकरीता महानगरपालिका निधिमध्ये 5 टक्के तरतुद राखीव ठेवणे आवश्यक आहे.
महिला व बालकल्याण विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी तपशिल
अ.क्र् | अधिकारी/कर्मचारी | पदनाम | दुरध्वनी क्र. |
1. | चारुशिला खरपडे | महिला व बालकल्याण अधिकारी | 022-28192828 Ext no.-126 |
2. | दामोदर संखे | वरिष्ठ् लिपीक | |
3. | विणा वामन सरोदे | बालवाडी शिक्षिका | |
4. | रविंद्र कौर | बालवाडी शिक्षिका | |
5. | फ्रान्सेस सायमन | स.का | |
6. | शैला तुबडे | शिपाई |
अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशिल
अ.क्र. | अधिकारी पदनाम | अधिनयमाचे कलम, महानगरपालिका मंजुर ठराव, मा.आयुक्त यांचेकडील अधिकार प्रदान तपशिल | कर्तव्य व जबाबदारी |
1. | उपायुक्त | 1.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 30 अन्वये गठीत महिला व बालकल्याण समिती 2. शासन निर्णय क्र.संकिर्ण-2005/ प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 अंतर्गंत नमुद योजना राबविणे 3. महिलांच्या संर्वांगिण विकासाकरीता समितीने निर्देशित केलेल्या इतर योजनेची अमंलबजावणी करणे. | · महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचे संनियंत्रण व नियोजन करणे · शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा.आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे. · महिती अधिकार अधिनयम 2005 अन्वये प्रथम अपिलिय अधिकारी · विभागाशी संबंधित विविध योजना प्रस्ताव कार्यान्वित करण्यासाठी मा.आयुक्त यांना सादर करणे. · शासन / महानगरपालिका स्तरावरील महिला व बालकल्याण योजना राबविणे व फलश्रृती तपासून आढावा घेणे. · विविध न्यायाप्रविष्ठ् प्रकरणे /विधानसभा तारांकित/अंताराकित /लक्षवेधी यांची विहित मुदतीत माहिती शासनास सादर करणे · शासनाने वर्गवारी केलेले अभिलेख प्रतवारी अ,ब,क,ड नुसार सुस्थितीत ठेवण्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे. |
2. | चारुशिला खरपडे- महिला व बालकल्याण अधिकारी | वरील नमुद केलेल्या अधिनियमातील तरतुदीनुसार | · मा.महासभा व मा.महिला बालकल्याण समितीने मंजुर केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करणे व वरिष्ठांच्या मान्येतेसाठी सादर करणे. · विभागातील कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे · विभागातील कर्मचाऱ्याचे गोपनिय अहवाल प्रतिवेदन करणे · महिला व बालकल्याण समितीच्या बैठका आयोजित करुन विविध योजनांची अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव सादर करणे. · महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. · वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे |
3. | दामोदर संखे-वरिष्ठ लिपीक | टेबल क्र.01 | · विविध योजना राबविण्याकरिता प्रस्ताव वरीष्ठामार्फत महिला व बालकल्याण समिती पुढे सादर करणे · महिला व बालकल्याण समिती अंतर्गंत विविध प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव तयार करणे. · पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे त्यानुसार कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे · महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज पहाणे. · विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. ची दखल घेउन सदर पत्रावर कार्यावाही करणेबाबत विहित वेळेत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणे. · जिल्हा स्तरावरील बैठकांना वरिष्ठा समवेत उपस्थित राहणे. · ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे. · स्थानिक निधी, एजी व लेखापरीक्षण कार्यालय यांचे मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने तयार करणे. · वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. |
4. | विणा सरोदे, बालवाडी शिक्षिका | टेबल क्र.02 | · सकाळी 10 ते 12 पर्यंत नेमुन दिलेल्या बालवाडीतील मुलांना शिकविणे, तद्नंतर कार्यालयीन कामकाज पहाणे. · विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. प्राप्त होणारे टपाल वरिष्ठांना दाखवुन त्याची नोंद दैंनंदीन नोंदवहीत घेणे. · आवक / जावक नोंदवही अद्यावत ठेवणे. · प्रशिक्षण व सकसक आहाराचे रजिस्टर नोंदी घेवून अद्यावत ठेवणे · वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. |
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या / येणा-या योजनेचा तपशिल.
- सन 2020-21 या आर्थिक वर्षात महिला आणि बालकल्याण विभाग मार्फत राबविण्यात आलेल्या योजना.
- कोविड-19 चे नियमावलीनुसार 08 मार्च 2021 जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
- मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बेटी बचाओ योजने अंतर्गत विविध कामे उदा. पॅम्प्लेट छपाई, फोटो, बॅनर, पथनाट्य इ. करण्यात आली.
- निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची योजना राबविण्यात येत आहे.
- निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक मदत देण्यात येते.
- कर्करोग पिडीत महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते.
- महानगरपालिकेच्या शाळेतील मुलींना सॅनेटरी नॅपकीन पुरवठा करण्यात येते.
- महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजु महिलांना साहित्य वाटप करण्यात येते. (घरघंटी, शिलाई मशिन इ.)
- महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता विविध प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. (ब्युटी पार्लर, शिवणक्लास, मेहंदी, सॉफ्ट टॉईज. कुकिंग बेकींग, कापडी व कागदी पिशव्या, जुडो कराटे व योगा, इंग्लिश स्पिकिंग, MSCIT, बेसिक कॅम्पुटर. डी.टी.पी, वाहन प्रशिक्षण इ.)
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील गलिच्छ वस्ती झोपडयामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करुन त्या शिबीरामध्ये स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ असे वेगवेगळया तज्ञ डॉक्टरांना बोलावुन तपासणी करण्यात येते. तसेच सदर ठिकाणी विनामुल्य सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले.
- झोपडयामध्ये बेटी बचाव योजना जनजागृती कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी आवश्यक पॅम्पलेट तसेच सर्व झोपडपट्टयामध्ये सुविचाराद्वारे जनजागृती तथा प्रसार केला जातो.
- गरोदर माता व प्रसुतिकरिता आलेल्या मातां मनपा रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांना मोफत सकस आहार पुरविण्यात येतो. मनपाच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात व प.भिमसेन जोशी रुग्णालय येथे सुरु आहे.
- महिला व बालकल्याण समिती अंतर्गंत दरवर्षी मिरा भाईंदर क्षेत्रातील टेंभा हॉस्पीटल, भा(प), एच.आर.हॉस्पीटल, मिरारोड(पू.) तसेच इंदिरा गांधी हॉस्पीटल, मिरारोड(पू) येथील रुग्णालयामध्ये स्तन आणि गर्भाशय (mammography/paps) याची विनामुल्य तपासणी करण्यात येते.
महिला व बालकल्याण विभागाची योजनाची माहिती
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महिला व मुलींना विविध प्रकारचे व्यवसायीक प्रशिक्षण देवुन त्यांना स्वंयरोजगारासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्यामध्ये स्वत:चा लहानमोठा व्यवसाय(उद्योग) सुरु करण्याची क्षमता निर्माण करणेकरिता महिला व बालकल्याण समिती अंतर्गंत खालीलप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येते
- शिवणकाम प्रशिक्षण
- ब्युटीपार्लर प्रशिक्षण
- मेंदी व नेलआर्ट प्रशिक्षण
- एम.एस.सी.आय.टी कॉम्प्युटर प्रशिक्षण
- वेबडिझाईन प्रशिक्षण
- हॅडमेकिंग ज्वलेरी डिझाईन प्रशिक्षण
- वाहनचालक प्रशिक्षण्
- जुडो, कराटे व योगा प्रशिक्षण
- कापडी/कागदी पिशवी बनविणे
इ. विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते त्याद्वारे महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.