पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह दि. 12 जून 1985 रोजी
मिराभाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर 23 जानेवारी
1990 रोजी
राईमुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेश झाला. या
नगरपालिकेच्यासभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय
उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, वसईची खाडी, उत्तन, गोराई
बिच असा एकुण 79.40 चौ. कि.मी. एवढ्याक्षेत्रफळात निसर्ग
सौंदर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर.लोकसंख्या वाढीनुसार दि. 28 फेब्रुवारी
2002 रोजी
नगरपालिकेचे महानगरपालिकेतरूपांतर झाले, मिटा
भाईंदर शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 8,09,378 एवढी
असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणातलोकसंख्या वाढत आहे.
ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणातशहराची लोकसंख्या जवळजवळ
वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरीसेवा सुविधांवर त्याचा ताण
पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणेप्रशासनास अडचणीचे होत
असले तरी महानगरपालिका नागरीकांना जास्तीत जास्त सेवादेण्याचा प्रयत्न करीत
आहे.
महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन
महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री.शिवमुर्ती नाईक यांनी
कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत , श्रीसंजय
श्रीपतराव काटकर, (भा.प्र.से.)हेआयुक्तआहेत.