1. महानगरपालिका क्षेत्रातंर्गत घनकचरा
प्रक्रिया प्रकल्पाअंतर्गत आवश्यक कामांची निकड ठरविणे व त्याबाबत अंदाजपत्रके
बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणे.
2. कामाचे निविदा, कामाचे आदेश, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता याबाबत कार्यवाही करणे.
3. कामावर पर्यवेक्षण करणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी व कनिष्ठ अभियंता
यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
4. कामांच्या प्रशासकीय तसेच तांत्रिक नोंदी
ठेवणे.
5. विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण
होतील आणि कामाच्या योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे.
6. 25.00 लक्षापर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी
देणे.
7. सर्व 25.00 लक्षापर्यंतच्या कामांची निविदा तयार करून
प्रसिद्ध करणे व रू.25.00 लक्षावरील कामांच्या
निविदा शहर अभियंता यांच्या मंजूरीने प्रसिद्ध करणे, सर्व कामांच्या निविदा उघडणे, कार्यादेश देणे.
8. उपमुख्य स्वच्छता अधिकारी व कनिष्ठ अभियंता
यांनी तयार केलेल्या
कामांचे 5% मोजमाप तपासणे.
9. कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी
शर्तीनूसार वेळोवेळी देणे.
10. अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे.
11. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
12. कंत्राटांच्या संबंधित बाबी विषयी पत्र
व्यवहार करणे.
13. लेखा परिक्षण विषयक कामे करणे.
14. अभिलेख जतन करणे.
15. विधानसभा/ विधानपरिषद तारांकित/ अतारांकित प्रश्न लक्षवेधींची उत्तरे तयार
करणे.
16. कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण करणे.
17. महासभा प्रश्नांची उत्तरे तयार करणे.
18. खासदार/ आमदार/ महापौर/ पदाधिकारी/ नगरसेवक यांच्या पत्रांवर कार्यवाही करणे.
19. रु. 25.00 लक्ष वरील कामे तपासून शहर अभियंताकडे
तांत्रिक मान्यतेकरीता अग्रेषीत करणे.
20. प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर (Completion
Certificate) देणे, ठेकेदाराचे अनुभव दाखले, गोपनीय अहवाल देणे.
21. विविध समित्यांच्या बैठकांना हजर रहाणे.
22. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प विभागातील
कर्मचारी / अधिकारी यांच्या
कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमित बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. वर्ग - 4, वर्ग -3, कर्मचारी, कनिष्ठ अभियंता यांचे उपअभियंता यांनी
प्रतिवेदित केलेले गोपनीय अहवाल पुर्नविलोकीत करणे, उपअभियंता यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित
करुन पुर्नविलोकीत करण्याकरीता शहर अभियंता यांच्याकडे पाठविणे.
23. विविध न्यायालयातील घनकचरा प्रक्रिया
प्रकल्प विभागा संदर्भात प्रकरणे हाताळणे, पाठपुरावा करणे, पत्रव्यवहार करणे, वकालतनामा सहया करणे.
24. विविध विकास कामांबाबत अडथळा निर्माण
झाल्यास संबधित खात्याशी पत्रव्यवहार करणे, पोलिस स्टेशनशी पत्रव्यवहार करणे, बंदोबस्त घेणे, पाठपुरावा करणे.
25. इसारा रक्कम, सुरक्षा अनामत, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमा परत
करण्यासाठी लेखा विभागाकडे पत्राद्वारे कळविणे.
|