प्रस्तावना :-
|
कर्तव्य व जबाबदाऱ्या : - मिरा भाईंदर महानगरपालिका
क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने खाली
नमूद केल्याप्रमाणे कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका
क्षेत्रात एकुण ६ प्रभाग कार्यालय समित्या कार्यरत असून, प्रत्येक समितीसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा. आयुक्त तथा
पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केलेले आहेत. शहरातील अतिक्रमणे तथा अनाधिकृत
बांधकामावर प्रभावी पणे कार्यवाही करणेकामी प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत पथके
नेमलेली आहेत. या पथकात सहा.आयुक्त, कनिष्ठ् अभियंता व मजुर वर्ग अशा प्रकारे १० ते १२ कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे. तसेच या ६ प्रभाग समिती कार्यालयात
कर विभागाचे लिपीक कर्मचारी यांचे ४० बीट मध्ये विभाजन करुन त्यांना बीट निरीक्षक
म्हणून त्यांचे कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे होणार नाही याची
दक्षता घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या
प्रभाग अधिकाऱ्यांना “पदनिदैशित अधिकारी” म्हणून संबोधले असून त्यांना विशिष्ट्
अधिकार देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या मार्फत अतिक्रमण व अनधिकृत
बांधकामे काढून टाकण्याच्या विहित केलेल्या कार्यपध्दती नुसार नियमित कार्यवाही
करण्यात येते. मिरा–भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व
अनाधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
१९४९ चे कलम २६० (१), २६१, २६४, २६७, ४७८ नुसार कार्यवाही करणेकरीता
पदनिर्देशित अधिकाऱ्यांना निश्चित अधिकार दिले आहेत. पदनिर्देशित अधिकाऱ्यांन मार्फत अनाधिकृत बांधकामास
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० (१ क), २६४, २६७ व ४७८ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६
चे कलम ५२, ५३, ५४ व ५५ प्रमाणे नोटीस देऊन नोटीसची मुदत संपल्या नंतर कायदेशिर
प्रक्रियेचा अवलंब करुन कागदपत्राची छाणणी/ पडताळणी करुन पुढील कार्यवाही केली जाते. याप्रमाणे पदनिर्देशित अधिकाऱ्याची कार्यपध्दती व जबाबदारी
निश्चित करुन अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई कायद्यानुसार विहीत
केलेल्या कार्यपध्दती नुसार करण्यात येत आहे. मा. आयुक्त महोदय यांचे
जा.क्र.मनपा/आयुक्त/056/2020-21 दि.24/12/2020 रोजीच्या आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील
धोकादायक / मोडकळीस आलेल्या किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणेची
कार्यपध्दती (SOP) विहीत करण्यात आलेली असून
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 च्या प्रयोजनाकरीता संबधित प्रभाग समिती क्षेत्राचे प्रभाग
अधिकारी यांना राजपत्राद्वारे पदनिर्देशित अधिकारी यांना अधिकार प्रदान केलेले
आहे. तरी विहीत केलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) नुसार कार्यवाही करण्यात येते. मिरा भाईंदर महानगरपालिका
क्षेत्रात प्रसिध्द् होणारे अनधिकृत बोर्ड/ बॅनर दैनंदिन रित्या अनधिकृत बांधकाम
नियंत्रण पथकाकडून काढून टाकण्यात येतात.
मिरा भाईंदर महानगरपालिका
क्षेत्रातील ना फेरीवाला क्षेत्रात बसणारे फेरीवाले यांचेवर कारवाई करणेकरीता
प्रभाग समितीचे सहा.आयुक्त यांचे अधिनिस्त फेरीवाला पथक प्रमुख व मजुर वर्ग तसेच
सुरक्षा रक्षक नियुक्त केले असून सदर पथकामार्फत दैनंदिनरित्या अनधिकृत
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असते. |
अतिक्रमण विभागातील कामकाज :-
|
जॉबचार्ट :-
|
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग : -
|
अंदाजपत्रके :- सन 2020-21
सन 2021-22
|