Skip to main content
logo
logo

नगर सचिव


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई- मेल
वासुदेव शिरवलकर(नगरसचिव)

Extn.123.28184924

nagarsachiv@mbmc.gov.in


इतिहास

दि. १२ जून १९८५ रोजी भाईंदर, नवघर, मिरा, काशी व घोडबंदर या पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राई-मुर्धे, डोंगरी, उत्तन वर्सोवा या चार ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्यात आला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, धारावी जंजिरे किल्ला, आई धारावी मातेचे पुरातन मंदिर, चौक येथे चिमाची अप्पा स्मारक, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सो॑दर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. लोकसंख्या वाढीनुसार दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले, मिरा भाईंदर शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या ,०९,३७८ एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत असले तरी महानगरपालिका नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.

दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन प्रथम महापो॑र म्हणुन सौ. मायरा गिल्बर्ट मेंडोसा उपमहापो॑र श्री. मुझफ्फर हुसैन हे निवडून आले तद्नंतर सन २००७, २०१२ २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडलेल्या आहेत. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असून, शासनामार्फत महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तसेच महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) आयुक्त आहेत.

प्रस्तावना :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सचिव विभाग हा प्रशासन व लोकप्रतिनीधी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक 2017 नुसार एकुण 24 प्रभाग सद्यस्थितीत आहेत.

महानगरपालिकेने एकुण प्रभाग समित्या स्थापन केलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ४ नियम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिका व स्थायी समितीच्या अखत्यारीत कार्यरत आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असूनशासनामार्फत मा. संजय श्रीपतराव काटकरआयुक्त तथा प्रशासक (भा.प्र.से) महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

विभागाची कामे :- 


·         मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणुका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे.

·         मा. महासभा व मा. स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे.

·         मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत, गोषवारे, विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.

·         विभागात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.


कर्तव्य :-


१. नगरसचिवांची कार्ये

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ४ कलम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिकेचा व स्थायी समितिचाही सचिव असेल व त्याने पुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

·         या अधिनियमान्वये किंवा तदनुसार पार पाडण्याविषयी त्यास निर्देश देण्यात येईल अशी कर्तव्ये आणि महानगरपालिका व स्थायी समितिकडुन त्या फर्मविण्यात येईल अशी अन्य कर्तव्ये पार पाडणे.

·         (एक) महानगरपालिकेच्या कलम ३० किंवा ३१ अन्वये महानगरपालिकेने नेमलेल्या कोण्त्याही समितिच्या (दोन) स्थायी समितिच्या व तिच्या कोणत्याही उपसमितिच्या कामकाजा संबंधिची सर्व कागदपत्रे व दस्ताएवज अभिरक्षेत ठेवणे.

·         स्थायी समिति वेळोवेळी जे निर्देश देईल त्यांच्या अधीन, प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करणा~या अधिका~यांची व कर्मचा~यांची कर्तव्ये विहित करणे आणि

·         स्थायी समितीच्या आदेशांच्या अधीन, उक्त अधिका~यांच्या व कर्मचा~यांच्या कृतींवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आणि विनियमांच्या अधीन, उक्त अधिका~यांची सेवा, पारिश्रमिक व विशेषाधिकार या संबंधीचा सर्व प्रश्नांचा निकाल करणे. तसेच मा. आयुक्त वेळोवेळी आदेश देतील त्यानुसार कामे करणे. अपिलीय अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अपिलांचा निपटारा करणे


२.उपसचिवांची कार्य :-


> मा. आयुक्त मा. नगरसचिव यांचे अधिपत्याखाली कामकाज पहाणे तसेच जनमाहिती अधिकारी म्हणुन नगरसचिव कार्यालयात प्राप्त माहिती अधिकारातील अर्जांना माहिती उपलब्ध करुन देणे.

> मा. महासभा मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांताचा अंतिम मसुदात पासुन घेणे.


3 लिपिक कर्मचा-यांची कार्ये :-


·         नगरसचिव कार्यालयामध्ये प्राप्त माहिती अधिकार पत्र, शासकिय पत्र, नागरीकांची पत्र, लोकशाही दिन पत्र या सर्व पत्रांची कार्यविवरन नोंद वहीमध्ये घेऊन मा. सचिव व उपसचिव यांचे निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देणे व अर्जांचा निपटारा करणे.

·         मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या सभांच्या इतिवृत्तांतामध्ये दुरुस्ती करुन अंतिम इतिवृत्तांत मा. उपसचिवांकडे सादर करणे.

·         मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावांचे मा. सचिव व मा. उपसचिव यांच्या मार्गदर्शनानुसार ठराव नोंद रजिस्टर मध्ये ठरावांची नोंद घेणे.


 

माहिती अधिकारी :-

.क्र

माहिती अधिकाऱ्याचं नावअधिकारी पदमाहिती अधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षासंपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक-मेल आयडी (या कायद्या-पुरताच)अपिलीय प्राधिकारी
1.श्री. दिनेश कानगुडेउपसचिवमिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

सचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय

निरंक

श्री. वासुदेव शिरवळकर, नगरसचिव

अपिलीय अधिकारी :-

.क्रअपिलीय    प्राधिकाऱ्यांचे नाव

अधिकारी पद

अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षाअहवाल देणारे माहिती अधिकारीसंपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक
1.श्री. वासुदेव शिरवळकरनगरसचिवमिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

उपसचिव

 (सचिव विभाग)
स्व.इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, भाईंदर (.)

आयुक्त  

नगरसचिव

उपसचिव

लिपीक

संगणक चालक

मजूर/.का



नगरसचिव विभागात कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांची माहिती :-


विभागपदनामएकुण.कार्यत.पदेकार्यरत पदावरील अधिकारी कर्मचा-यांचे नावत्यांचेकडील कार्यभारदुरध्वनी क्र.व बसण्याचे ठिकाण
नगरसचिव विभागनगरसचिवश्री. वासुदेव शिरवळकरसर्व समित्यांचे आयोजन करणे, सर्व समित्यांच्या निवडणूकांचे आयोजन करून त्या पार पाडणे.

०२२-२८१९२८२८ (विस्तारक्र.१२३)

सचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय

नगरसचिव विभागउपसचिवश्री. दिनेश कानगुडेमा. सचिव यांना सभेच्या वेळी सहकार्य करणे. सचिव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करून त्याची अंमलबजावणी करून घेणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

सचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय
नगरसचिव विभागलिपीक. श्री. कैलास दामोदर म्हात्रे

. नगरसचिव विभागात प्राप्त तक्रार अर्ज / विनंती अर्जांना मुदतीत माहिती / उत्तरे देणे.

. शासनास अपेक्षीत माहिती सादर करणे

. विवीध प्रकरणी अहवाल सादर करणे.

. करारनाम्यांची नोंद घेणे.

. जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकार नियमांतर्गत प्राप्त अर्जांना मुदतीत माहिती / उत्तरे देणे.

. महासभा स्थायी समिती सभांची विषयपत्रिका संगणकचालक यांचेकडून तयार करुन घेणे. तसेच प्रशासकिय ठराव, महासभा स्थायी समिती सभेमध्ये पारित ठरावांवर ठराव क्रमांकाची नोंद घेणे.

. महानगरपालिका संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करणे तसेच नगरसेवकांचे मानधन अदा करणेबाबत कार्यवाही करणे. तसेच आवश्यकतेनुसार विवीध कामांची निवीदा प्रक्रिया पूर्ण करणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

सचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय
नगरसचिव विभागलिपीक. श्री. जयेश दामोदर पाटील

. नगरसचिव विभागात प्राप्त सर्व विनंती अर्ज / तक्रार अर्ज स्विकारणे, कार्यविवरण नोंदवहीमध्ये नोंद घेणे विनंती अर्ज / तक्रार अर्ज नगरसचिव यांचे निदर्शनात आणणे. तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी पदाचे कामकाज पाहणे.

. माहिती अधिकार अर्ज स्विकारणे, कार्यविवरण नोंदवहीमध्ये नोंद घेणे उक्त अर्ज जनमाहिती अधिकारी यांचे निदर्शनात आणणे. तसेच प्राप्त अर्जांनुसार मुदतीत माहिती तयार करणे. तसेच विविध विभागाकडून प्रशासकिय, महासभा, स्थायी समिती सभेच्या मान्यतेस्तव प्राप्त गोषवारे स्विकारणे, गोषवारा नोंदवहीमध्ये नोंद घेणे

. प्रशासकिय ठराव, महासभा स्थायी समिती सभेमध्ये पारित ठरावांची नोंद ठराव नोंदवहीमध्ये घेणे. तसेच पारित सर्व ठरावांची साक्षांकित प्रत संबंधीत विभागाकडे वर्ग करणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.

. लघुलेखकांमार्फत तयार करण्यात आलेले महासभा, स्थायी समिती सभा विवीध समिती सभांचे / निवडणुकांचे इतिवृत्तांत तपासून त्यामध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे लघुलेखकांमार्फत अंतिम इतिवृत्तांत तयार करुन घेणे सभेच्या मान्यतेस्तव ठेवणे. तसेच विषयपत्रिका, गोषवारे इतिवृत्तांत सन्मा. पालिका सदस्यांना / समिती सदस्यांना नगरसचिव विभागातील शिपाई यांचेमार्फत मुदतीत पोच करणे
वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागसंगणक चालकश्री. विरेंद्र यशवंत पाटील

. प्रशासकीय, महासभा, स्थायी समिती सभांची तसेच विवीध समिती निवडणुकी संबंधीत विषयपत्रिका तयार करणे. तसेच सर्व अर्जांची माहिती / उत्तरे, अहवाल संगणकावर तयार करणे.

. शासनाकडून / मनपाकडून मागविण्यात आलेल्या माहितीचे विवरणपत्र तयार करणे. तसेच नगरसचिव विभागाच्या ईमेलवर दैनंदीन ईमेल संगणकावर तपासून त्यांची प्रिंट मारणे वरिष्ठांच्या निदर्शनात आणणे.

. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नगरसचिव विभागा संबंधिची माहिती वेळोवेळी अद्यावत करणे प्रसिध्द करण्यात आलेली माहिती योग्यरित्या प्रसिध्द केली आहे का तपासणे. तसेच सर्व प्रकारची कागदपत्र संबंधीतांना ईमेल करणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.

. नगरसचिव विभाग तसेच नगरसचिव विभागाच्या अधिनस्त विभागांची बजेटची ऑनलाईन एन्ट्री करणे. तसेच सर्व सभांच्या विषयपत्रिका, गोषवारे इतिवृत्तांताच्या छायांकित प्रती काढणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

नगरसचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय
नगरसचिव विभागसफाई कामगारश्री. हेमंत रामचंद्र किणीसभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

नगरसचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय
नगरसचिव विभागसफाई कामगारश्री. नेत्रेश्वर जनार्दन पाटीलसभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागसफाई कामगारमधुकर रामचंद्र भोईरसभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागसफाई कामगारअरुणासलम आरसनसभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.वरीलप्रमाणे
नगरसचिव विभाग

मजूर

श्री. नितीन लाकडेसभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागशिपाईश्री. सागर घागससभांचे इतिवृत्तांत विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

वरीलप्रमाणे

नगरसचिव विभागसंगणक चालक तथा लिपीकप्रणाली सुधाकर भोईर

. नगरसचिव विभागाच्या ईमेलवर दैनंदीन ईमेल संगणकावर तपासून त्यांची प्रिंट मारणे वरिष्ठांच्या निदर्शनात आणणे. तसेच माहिती अधिकार अर्जांची उत्तरे संगणकावर तयार करणे.

. ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार, GM पोर्टल, ऑनलाईन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त दैनंदिन अर्जांची प्रिंट काढून लिपीक नगरसचिव यांचे निदर्शनात आणणे तक्रार अर्जांचे ऑनलाईन निवारण करणे.

. नगरसेवकांची हजेरी तपासून, नगरसेवकांचे मानधन तयार करणे. तसेच सर्व सभांचे अंतिम इतिवृत्तांताच्या छायांकित प्रती काढणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.
वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागलघुलेखक. सौ. डायना संजय करास

. स्थायी समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, प्रभाग समिती क्र. 1 2 सभांचे इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर नोंद घेणे अंतिम इतिवृत्तांत वरिष्ठांकडे सादर करणे.

. मा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, पदाधिकारी दालनातील सुनावणी संबंधीत इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर नोंद घेणे अंतिम इतिवृत्तांत संबंधीत विभागाकडे वर्ग करुन, वर्ग केल्याची नोंद, नोंदवहीमध्ये घेणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

नगरसचिव विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्यालय
नगरसचिव विभागलघुलेखक
. श्री. गुणवंत सपकाळे

. मा. महासभा, महिला बालकल्याण समिती, प्रभाग समिती क्र. 3 ते 6 सभांचे इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर टायपिंग करणे अंतिम इतिवृत्तांत वरिष्ठांकडे सादर करणे.

. मा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, पदाधिकारी दालनातील सुनावणी संबंधीत इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर नोंद घेणे अंतिम इतिवृत्तांत संबंधीत विभागाकडे वर्ग करुन, वर्ग केल्याची नोंद, नोंदवहीमध्ये घेणे.

. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.
वरीलप्रमाणे

सार्वत्रिक निवडणूक उमेदवार यादी

>> सार्वत्रिक निवडणूक 2017 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2012 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2007 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2002 मधील उमेदवारांची यादी

सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांस प्राप्त मते

>> सार्वत्रिक निवडणूक 2017 उमेदवारांस प्राप्त मते
>> सार्वत्रिक निवडणूक 2012 उमेदवारांस प्राप्त मते
>> सार्वत्रिक निवडणूक 2007 उमेदवारांस प्राप्त मते
>> महासभेकरिता करण्यात आलेली पूरक घोषणा
>> महासभेकरिता आलेले प्रश्न व त्यांना दिलेली उत्तरे

अधिनियम १९४९ कलम ६० अन्वये :- 

>> सचिव विभाग महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ६० अन्वये १३ मुद्दयांची माहिती २०२४-२०२५
>> पदाधिकारी व समिति सदस्य यादी

स्थायी समिती सभा इतिवृत्तांत :-

>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2003-04
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2004-05
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2005-06
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2006-07
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2007-08
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2008-09
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2009-10
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2010-11
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2011-12
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2012-13
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2013-14
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2014-15
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2015-16
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2016-17
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2017-18
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2018-19
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2019-20
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2020-21
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2021-22
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2022-23