Skip to main content
logo
logo

नगररचना


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई- मेल
पुरुषोत्तम शिंदे  

022-28108165/28121455 / 9766198000


tp@mbmc.gov.in
* बांधकाम प्रारंभ पत्र व सुधारित बांधकाम परवाना सन २३-२४ * भोगवटा दाखला व भाग भोगवटा दाखला सन २३-२४ * RTI

टिप्पणी

नगररचना विभागामध्ये 38 कर्मचारी असुन तांत्रिकपदे 14 व अतांत्रिक पदे 24 आहेत. सध्या कार्यरत

पद संख्या 
सहाय्यक संचालक, नगररचना
00
नगररचनाकार 
01
सहायक नगररचनाकार
02
शाखा अभियंता
04
कनिष्ठ अभियंता
01
ठेका कनिष्ठ अभियंता
03
मुख्य सर्व्हेअर, सर्व्हेअर व अनुरेखक प्रत्येकी
01
लिपीक
09
अस्थायी संगणक चालक तथा लिपीक
03
ठेका संगणक चालक तथा लिपीक
03
शिपाई 
04
सफाई कामगार
03

व मोकळया जागा कर आकारणी – अस्थायी संगणक चालक तथा लिपीक, लिपीक व ठोक मानधन कर्मचारी प्रत्येकी 01 आहेत.


नगररचना विभागाकडील कामाचे स्वरुप :-

विकास योजना अंमलबजावणी, आरक्षणाखालील जागेचे भुसंपादन करणे, बांधकाम परवानगी प्रकरणी छाननी करणे तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार इतर अनुषंगीक कामे करणे, अनधिकृत बांधकामा संदर्भात आवश्यक माहिती सह तांत्रिक सहकार्य / मार्गदर्शन करणे तसेच विभागाकडील न्याप्रविष्ठ प्रकरणात कार्यवाही करणे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये प्रकरणात कार्यवाही करणे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भागसोडून) ही दि.14/05/1997 रोजी मंजूर झालेली असून, ती दि.15/07/1997 पासून अंमलात आलेली आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना ही दि.25/08/2000 रोजी मंजूर झालेली असून ती दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. तसेच प्रारुप सुधारीत विकास योजना – 2022-37 ही हरकती / सूचना मागविण्या संदर्भात प्रारुप सुधारीत विकास योजना क्र. मिभावि/प्रासुवियो मिरा-भाईंदर/कलम-26 प्रसिद्धी/2587 दि.27/10/2022, अन्वये दि.28/10/2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शहरची विकास योजना :-

मिरा भाईंदर शहराचे क्षेत्र 79.40 चौ.कि.मी.असुन 19 महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहरासाठीची विकास योजना वगळलेला भाग सोडुन दि.14/5/97 अन्वये मंजुर होवून दि.15/07/97 पासुन अंमलात आलेली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना दि.25/08/2000 रोजी मंजूर होवून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. तसेच मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत. तद्नंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करणेस दि.02/12/2020 अन्वये मंजूरी दिलेली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील महसूली गावासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून M.M.R.D.A. यांची शासनाने नेमणूक केलेली असून सदर भागासाठी M.M.R.D.A. यांचेमार्फत स्वतंत्र विकास योजना पत्र क्र. IPB-4312/323/CR-23/2013/UD-11 दि. 13/05/2013 अन्वये व पत्र क्र. टिपीबी 4316/ प्र.क्र.257/2016/ नवि-11 दि.16/03/2017 तयार केलेली आहे. तसेच सदर गावासाठी पत्र क्र. IPB-4312/323/CR-23/2013/UD-11 दि. 13/05/2013 अन्वये विकास नियंत्रण नियमावली लागू केलेली आहे.

नगर विकास विभागाकडील क्र. टिपीबी-4316/प्र.क्र.257/2016/नवि-11, दि.16/03/2017 रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे उपरल्लोखित अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून केलेली MMRDA ची केलेली नियुक्ती रद्द करुन सदर क्षेत्र अधिसूचित क्षेत्रामधून वगळून संबंधित मनपा हद्दीत अंतर्भूत करण्यात आलेले आहे व शासनाने दि.13/05/2013 व दि.03/06/2016 रोजी मंजूर केलेल्या विकास योजनेची अंमलबजावणी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये संबंधित मनपाने करावयाची आहे

भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजना :-

मिरा भाईंदर शहरासाठी भाडे तत्त्वावरील गृहनिर्माण योजना तरतुदी शासनाने लागु झालेल्या असुन याप्रमाणे M.M.R.D.Aकडुन 13 प्रकरणात Location Clearance प्राप्त असून त्या प्रकरणांना बांधकाम मंजूरी देण्यात आलेली आहेसदर प्रकल्पामधुन 4562 सदनिका हस्तांतरित झालेल्या असून 5177 सदनिका M.M.R.D.A.यांचेकडे हस्तांतरित होणार आहेत.

म्हाडा :-

म्हाडाच्या मालकीच्या क्षेत्रासाठी 2.50 चटई क्षेत्र निर्देशांकानुसार गृहबांधणी योजना तरतुद लागु आहे. यानुसार म्हाडाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली असुन सदर प्रस्तावाचे काम सुरु आहे. या प्रकल्पामधुन म्हाडास 2279 सदनिका प्राप्त झाल्या आहेत

नागरी सुविधा क्षेत्र :-

महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास प्रस्तावांच्या भुखंडामधुन प्राप्त होणा-या सुविधा क्षेत्राच्या एकूण 26 भुखंडापैकी  08 ठिकाणांची कामे पूर्ण झालेले असून 06 कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित 12 जागेवर बांधकामे प्रस्तावित करावयाची आहेत.

परवडणा-यां घरांची योजना (Affordable Housing Scheme) :-

शासन निर्णयाप्रमाणे परवडणा­या घरांची योजना (Affordable Housing Scheme) या योजनेअंतर्गत 4 जागांसाठी रेखांकन मंजुरीसह इरादापत्र (Location Clearance) देण्यात आलेले असून यापैकी 02 प्रस्तावास बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. सदर प्रस्तावांमधून Affordable Housing Unit मधील हस्तांतरीत होणा-या सदनिकांची संख्या 417 इतकी आहे.

फेरबदल प्रस्ताव :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राच्या विकास योजनेत महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) अन्वये प्रस्तावासाठी फेरबदलाची कार्यवाही करणेत येते.

सि. आर. झेड :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी सेस (CESS) या संस्थेने तयार केलेले सी.आर.झेड. च्या वर्गीकरणाचे नकाशे दि.30/06/2005 रोजी महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहेत.

केंद्र शासनाच्या कोस्टल रेग्युलेशन झोन अधिनियम 2011 नुसार महानगरपालिका क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करुन कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (CESS) या संस्थेने तयार केलेले असून त्याबाबतचे सुधारीत नकाशे शासनाच्या M.C.Z.M.A. या प्राधिकरणामार्फत त्यांचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत.

बांधकाम परवानगी साठीचे प्रस्ताव :-

दि.01/06/12 पासून बांधकाम परवानगीची नविन प्रकरणे Auto-DCR या प्रणाली द्वारे Online कार्यवाही करणेत येत आहे. सदरची कार्यवाही JNNURM Reforms मुळे करण्यात येत असून आजमितिस ऑनलाईन पध्दतीने एकूण 287 बांधकाम परवानगी / सुधारीत बांधकाम परवानगी प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली आहे.सद्यस्थितीत दि.02/12/2020 रोजीच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही येत आहे.

विकास आकार वसूली :-

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर विकास योजनेतील विकास प्रस्तावांना दिलेल्या मंजूरीप्रमाणे जमा झालेला सन 2016-17 पासून तुलनात्मक वर्षनिहाय विकास आकाराचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

सन

तरतुद (कोटी)

वसुली (कोटी)

2016-17

143

60.13

2017-18

104

28.27

2018-19

050

108.87

2019-20

050

81.81

2020-21

040

40.93

2021-22

125

336.34

2022-23

250

303.69

(२०३.४१  मनपा +१००.२८ शासन )

सदरचा विकास आकार शासनाकडील दि.01/03/2011 रोजीच्या निर्णयाप्रमाणे वसूल करणेत येत आहे.

सन 2016-17 साली मिरा भार्इंदर महानगरपालिकेमार्फत इमारत प्रस्तावासंबंधी दिलेल्या परवानग्यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

सन

प्राथमिक परवानगी

बांधकाम परवानगी

सुधारीत बांधकाम परवानगी

जोत्याचा दाखला

भोगवटा दाखला

एकुण

2016-17

—-

11

51

27

48

137

2017-18

2

13

35

34

57

141

2018-19

1

48

97

44

81

271

2019-20

1

35

68

28

47

179

2020-21

1

30

23

32

42

128

2021-22

—-

43

87

15

41

186

2022-23

—-

62

99

20

74

255

विकास हक्क प्रमाणपत्र (TDR) –

मिरा भाईंदर शहराच्या मंजुर विकास योजनेतील आरक्षणाखालील जागा विकास हक्क प्रमाणपत्राद्वारे संपादीत केल्या आहेत.

संपादनातील एकुण क्षेत्र 1187727.04 चौ.मी.असुन विकास येाजना रस्त्याखालील क्षेत्र 274201.15 चौ.मी.व आरक्षणातील क्षेत्र 913525.89 चौ.मी. आहे.

वरीलप्रमाणे मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोकळया जागेचे सरासरी शीघ्रशीघ गणक दर रुपये 25,0000 प्रति चौ.मी. असून त्यानुसार वरीलप्रमाणे संपादित आरक्षणाखालील / विकास योजना रस्त्याखालील जमिनीचे आजमितीस मुल्यांकन सुमारे 3 हजार कोटी याप्रमाणे आहे. सदरच्या जमिनी मिरा भार्इंदर महानगरपालिकेस विनामुल्य हस्तांतरीत झालेल्या आहेत.

सुधारित विकास योजना –

मिरा भार्इंदर शहरासाठीच्या मंजूर विकास योजनेची मुदत 2017 मध्ये संपुष्टात येत असल्यामुळे सदर विकास योजना सुधारित करणेबाबत मा. महासभेने इरादा जाहिर केलेला आहे. त्याप्रमाणे विद्यमान भूवापर (E.L.U.) दर्शविणारा नकाशा बनविण्याचे काम शासनाच्या निर्देशामाणे मा. सहा. संचालक, नगररचना ठाणे शाखा यांच्यामार्फत सुरु आहे.

नाट्यगृह -

मौजे महाजनवाडी स.क्र.(जुना) 92 पैकी (नविन) 13/1 या जागेमधील नागरी सुविधा क्षेत्रासाठीच्या भुखंडाचे (Amenity Open Space) एकूण 5255 चौ.मी. क्षेत्रामध्ये तळ अ 3 मजले स्वरुपाचे नाट्यगृह प्रस्तावित असून सदरच्या नाट्यगृहाचे बांधकाम क्षेत्र 3674.93 चौ.मी. असून चौथ्या मजल्यावरील कला दालनाचे (Amenity Open Space) क्षेत्र 785.19 चौ.मी. आहे. याप्रमाणे एकूण बांधकाम क्षेत्र 4460.12 चौ.मी. आहे. सदरच्या जागेवर भूमीपुजन दि.30/08/2015 रोजी मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते व मा.ना.श्री. विनोदजी तावडे (शिक्षण व सांस्कृतिक मंत्री) यांचे अध्यक्षतेखाली झालेले आहे.

आ.क्र. 221 (बगीचा) हे आरक्षण विकसीत करुन मा.श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे.

प्रस्तावित प्रशासकीय इमारत –

मौजे भार्इंदर, स.क्र. 487/पै.,पै., 478/पै.,पै.,पै. (जुना), 114/1,2, 113/1,2,4  (नविन) या जागेमध्ये जवळपास 1.5 लाख चौ.फुटाची महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत विकासकाकडून विनामुल्य हस्तांतरीत होणार असून सदर इमारतीचे भूमिपुजन राज्याचे मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते व मा.ना.श्री. गिरीशजी महाजन, जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.24/10/2015 रोजी पार पडलेले आहे. सदर जागेत सद्य:स्थितीत जागेच्या मालकीचा वाद असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्या निर्देशानुसार सद्य:स्थितीत जागेतील बांधकाम परवानगीस मिरा भार्इंदर महानगरपालिकेने स्थगिती दिलेली आहे.

घोडबंदर किल्ला –

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रीतील घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे काम सुरु करणेसाठी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे पाठपुरावा करुन शासकीय मालकीची 1000 चौ.मी. जागा हस्तांतरीत करुन घेतलेली असून उर्वरीत जागा हस्तांतरीत होणेसाठी पाठपुरावा सुरु आहे. सदरची जागा हस्तांतरीत होताच किल्याच्या सुशोभिकरणाचे काम करणेत येणार आहे.

Scanning -

नगररचना विभागाच्या अभिलेख कक्षातील अभिलेख अद्यावत होणेसाठी व अभिलेखाचे जतन होण्याच्या दृष्टीकोनातून त्याचे Scanning करुन व जनतेला गृहप्रकल्पाची माहिती सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून सदरचे अभिलेख महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशीत करणेची कार्यवाही सुरु केलेली आहे. तसेच बांधकाम परवानगी बरोबर जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, भाग नकाशा व झोन दाखला हे देखील Online पध्दतीने देण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही सुरु केलेली आहे.

माहितीचा अधिकार –

केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे नगररचना विभागासाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नगररचनाकार व जनहमाहिती अधिकारी म्हणून सहाय्यक नगररचनाकार यांची नेमणूक करणेत आलेली असून या विभागाकडे प्रतिमहिना सरासरी 200 माहिती अधिकारान्वये अर्ज व जवळपास 30 प्रथम अपिल अर्ज दाखल होतात.

   सदर अपिलाबाबत व माहिती अधिकारान्वयेच्या अर्जाबाबत विहीत मुदतीमध्ये कार्यवाही करणेत येते.

नगरभूमापन –

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्राचे नगरभूमापन खाजगी संस्थेद्वारे करुन घेणेबाबत शासनाने दि.30/01/2007 अन्वये मंजूरी दिलेली असून त्याप्रमाणे विहीत कार्यपध्दतीनुसार निविदा प्रक्रिया पुर्ण करुन तीन (मे. राणे मॅनेजमेंट कन्सलटंट प्रा.लि., भार्इंदर, मे. मोनार्च सव्र्हेअर अॅन्ड कन्सलटंट प्रा.लि., पुणे व मे. पी.एन.शिदोरे अॅन्ड कंपनी, कल्याण) संस्थेची नियुक्ती करुन दि.25/01/2007 रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहेत.

सदर संस्थांनी 14 महसूली गावांचे सव्र्हेक्षणाचे काम पुर्ण करुन त्याबाबतचा अहवाल तालुका निरीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचे कार्यालयात सादर केलेला असून महानगरपालिका क्षेत्रातील मौजे उत्तन, डोंगरी, पाली, तारोडी, चौक या पांच महसूली गावांमधील स्थानिक जनतेच्या विरोधामुळे सव्र्हेक्षणाचे काम झालेले नाही.

सर्व्हेक्ष्ण झालेल्या भागासाठी मा, जमाबंदीआयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेमार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे.

जमिनीच्या रुपांतरीत कर दाखल्याबाबत –

महानगरपालिका हद्दीमधील जमिनीची विकास योजना झोन निहाय रुपांतरीत कर दाखला मिळणेबाबत मे. तहसीलदार, ठाणे यांचेमार्फत दाखला दिला जातो. व तद्नंतरच महानगरपालिकेमार्फत बांधकाम परवानगी दिली जाते.

प्रस्तावासाठीची कालमर्यादा –

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 प्रमाणे नगररचना विभागामधील खालीलप्रमाणेच्या पाच सेवासाठी त्यासमोर दर्शविल्याप्रमाणे कालमर्यादा निश्चित करणेत आलेली आहे.

.क्र.

लोकसेवांचे वर्णन

नियत कालमर्यादा

1

बांधकाम परवानगी / सुधारीत बांधकाम परवानगी

60 दिवस

2

जोत्याचा दाखला

07 दिवस

3

भोगवटा दाखला

21 दिवस

4

झोन दाखला

07 दिवस

5

भाग नकाशा

03 दिवस

अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप

 

अ.क्र.पदनामनेमून दिलेले क्षेत्रकामाचे स्वरुप
1.सहाय्यक संचालक नगररचनामिरा भाईंदर महानगरपालिका संपूर्ण क्षेत्रविकास योजना अंमलबजावणी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये विकास योजना फेरबदल, महाराष्ट्र प्रादेक व नगररचना अधिनियमाद्वारे खरेदी सुचना, विकास योजना आरक्षणाचे भुसंपादन, विकासहक्क प्रमाणपत्राद्वारे, भूसंपादन, विकास योजना अंमलबजावणी करिता अर्थसंकल्प तयार करणे, बांधकाम परवानगी, जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, शासकीय पत्रव्यवहार, इ. मान्यतेसाठी मा. सहा. संचालक, नगररचना यांना अहवाल सादर करणे,
2.नगररचनाकार विकास योजना अंमलबजावणी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये विकास योजना फेरबदल, महाराष्ट्र प्रादेक व नगररचना अधिनियमाद्वारे खरेदी सुचना, विकास योजना आरक्षणाचे भुसंपादन, विकासहक्क प्रमाणपत्राद्वारे, भूसंपादन, विकास योजना अंमलबजावणी करिता अर्थसंकल्प तयार करणे, बांधकाम परवानगी, जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, शासकीय पत्रव्यवहार, इ. मान्यतेसाठी मा. सहा. संचालक, नगररचना यांना अहवाल सादर करणे, जनमाहिती अधिकारी म्हणून पत्रांना उत्तरे देणे. प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून माहिती अधिकारात प्राप्त अपिलांचा विहित मुदतीत निपटारा करणे.
3.सहायक नगररचनाकार

भाईंदर, गोडदेव, काशी, खारी, तारोडी, राई, मुर्धे, मोर्वा, चौक, पेणकरपाडा, महाजनवाडी व चेणे

1.   नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांना त्यांचे सर्व कामकाजात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणे.

2.   जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे

3.   शासकीय पत्रव्यवहाराबाबत सविस्तर अहवाल नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे. तसेच मा. न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेचे वतीने लेखी कथन, हमीपत्र दाखल करणेसह साक्षी पुराव्यासाठी हजर रहाणे

4.   पर्यावरणाच्या नाहरकत दाखल्यासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावाबाबत उचित कार्यवाही करुन अहवाल बैठकीत सादर करणेसह प्राप्त प्रस्तावाची एक प्रत संबंधित सदस्यांना देणे व सभेचे इतिवृत्तांतासहसादर करणे.

5.   मंजूरी व्यतिरिक्तच्या वाढीव बांधकामाबाबत उचित कार्यवाही करणेसह त्याबाबत नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांच्या मंजूरीने संबंधित प्रभाग अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

6.   झोन दाखला व भाग नकाशा निर्गमीत करणे. विभागामार्फत सत्यप्रती स्वाक्षांकित करुन देणे.

7.   प्रभाग समिती व मालमत्ता कराच्या शास्ती विषयक बैठकीस हजर रहाणे व नगररचना विभागाशी संबंधित अभिप्राय / माहिती देणे.

8.   विज कनेक्शन, पाणी कनेक्शन व मालमत्ता कराच्या प्रकरणांबाबत अभिप्राय देणे.

9.   विकास योजनेने बाधीत जागेच्या भूसंपादनाबाबत व शासकीय जागा हस्तांतरीत करुन घेणेबाबत प्रस्ताव तयार करुन नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे.

10.  संबंधीत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेकडून छाननी होवून प्राप्त सर्व विकास प्रस्ताव जोता प्रमाणपत्र, इमारत पुर्णत्वाचा दाखला व भोगवटा दाखला प्रमाणपत्र तसेच सर्व विकास हक्क प्रमाणपत्राबाबतचे प्रस्तावाबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेमार्फत सादर करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

4.सहायक नगररचनाकारनवघर, घोडबंदर, मिरा, वरसावे, डोंगरी, उत्तन व पाली

1.   नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांना त्यांचे सर्व कामकाजात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणे.

2.   जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे

3.   शासकीय पत्रव्यवहाराबाबत सविस्तर अहवाल नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे. तसेच मा. न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेचे वतीने लेखी कथन, हमीपत्र दाखल करणेसह साक्षी पुराव्यासाठी हजर रहाणे

4.   पर्यावरणाच्या नाहरकत दाखल्यासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावाबाबत उचित कार्यवाही करुन अहवाल बैठकीत सादर करणेसह प्राप्त प्रस्तावाची एक प्रत संबंधित सदस्यांना देणे व सभेचे इतिवृत्तांतासहसादर करणे.

5.   मंजूरी व्यतिरिक्तच्या वाढीव बांधकामाबाबत उचित कार्यवाही करणेसह त्याबाबत नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांच्या मंजूरीने संबंधित प्रभाग अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

6.   झोन दाखला व भाग नकाशा निर्गमीत करणे. विभागामार्फत सत्यप्रती स्वाक्षांकित करुन देणे.

7.   प्रभाग समिती व मालमत्ता कराच्या शास्ती विषयक बैठकीस हजर रहाणे व नगररचना विभागाशी संबंधित अभिप्राय / माहिती देणे.

8.   विज कनेक्शन, पाणी कनेक्शन व मालमत्ता कराच्या प्रकरणांबाबत अभिप्राय देणे.

9.   विकास योजनेने बाधीत जागेच्या भूसंपादनाबाबत व शासकीय जागा हस्तांतरीत करुन घेणेबाबत प्रस्ताव तयार करुन नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे.

10.  संबंधीत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेकडून छाननी होवून प्राप्त सर्व विकास प्रस्ताव जोता प्रमाणपत्र, इमारत पुर्णत्वाचा दाखला व भोगवटा दाखला प्रमाणपत्र तसेच सर्व विकास हक्क प्रमाणपत्राबाबतचे प्रस्तावाबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेमार्फत सादर करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

5शाखा अभियंतानवघर, मिरा, व वरसावे

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.

6शाखा अभियंताभाईंदर, डोंगरी, उत्तन व पाली
7कनिष्ठ अभियंताघोडबंदर, पेणकरपाडा, महाजनवाडी व चेणे
8शाखा अभियंतागोडदेव, काशी, खारी,तारोडी, राई, मुर्धा, मोर्वा व चौक
9 शाखा अभियंता
10मुख्य सर्व्हेअरगोडदेव, भार्इंदर, खारी, घोडबंदर, डोंगरी, चेणे, वरसावे, मोरवा

1.  प्राप्त नवीन बांधकाम प्रस्ताव व जोत्याचा दाखला व विकास हक्क प्रमाणपत्रासाठी विषयांकित जागेची पाहणी करुन विकास योजनेप्रमाणेच्या अहवालासह जागेची सद्यस्थिती नमुद करुन स्वयंस्पष्ट अहवालासह प्रकरण संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडे वर्ग करणे.

2.  झोन दाखले, दुरुस्ती परवानगी व ईतर नाहरकत दाखले देणेबाबत पाहणी व मोजणी करुन    स्वयंस्पष्ट शिफारसीसह सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  विकास योजनेशी संलग्न कामकाज सहाय्यक नगररचनाकार यांचे मार्गदर्शनाखाली करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पाहणे.

5.  विकास योजना रस्ते, आरक्षणे यांच्या विद्यमानस्थितीप्रमाणेच्या आखण्या अंतिम करुन मंजूरीसाठी सहा. नगररचनाकार यांचे मार्फत सादर करणे.

6.  भुसंपादनासाठीच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करणे.

7. शासकीय जागा हस्तांतरणाबाबत प्रस्ताव तयार करुन सादर करणे व पाठपुरावा करणे.

11मुख्य सर्व्हेअरनवघर, काशी, मिरा, पेणकरपाडा, महाजनवाडी, राई, मुर्धे, तारोडी, उत्तन, पाली, चौक

अ.क्र. 1 ते 7 प्रमाणे

8. मोबाईल मनो-यासाठी परवानगी, मुदतवाढ देणेसाठीचा प्रस्ताव सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे व याबाबतची माहिती अद्यावत करुन ठेवणे.

12अनुरेखकइलेक्ट्रीक कनेक्शनसाठी, दुरुस्ती परवानगीसाठी, इतर नाहरकत दाखल्यासाठी पाहणी करुन अहवाल सादर करणे

1. भाग नकाशे तयार करणे.

2. नकाशाच्या सत्यप्रती तयार करणे.

3. नकाशांच्या झेरॉक्स प्रती काढुन आणणे.

4. नकाशा एनलार्ज करणे.

5. रंगकाम, ट्रेसिंग करणे.

6. नागरीकांच्या व माहितीच्या अधिकारा अन्वयेच्या मुदतीत उत्तरे देणे (आवश्यक असेल तेथे संबंधित कनिष्ठ अभियंता यांची मदत घेवुन)

7. शासकीय जागा हस्तांतरण व भुसंपादन प्रस्तावाबाबत पत्रव्यवहार.

13

लिपीकअभिलेख कक्ष

1.  अभिलेख कक्ष सांभाळणे,

2.  नमुना 45 नोंदी घेवून नस्ती सांभाळणे,

3.  विकास आकार नोंदी लेखा विभागाकडून घेवून मासिक अहवाल तयार करणे

4.  लोकसेवा हक्क आदेश मासिक अहवाल पाठविणे

5.  वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूनदिलेले कामकाज करणे.

14लिपीकमोकळया कर आकारणी विभाग संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीना मोकळया जागा कर आकारणीची वसूल करणे.

1. मोकळया जागा कर आकारणी देयक बनावणे.

2. मोकळया जागा कर आकारणी वसूल करणे.

ठोक मानधन
15लिपीकआवक-जावक सांभाळणे

1. आवक जावक नोंदी घेणे, ऑनलाईन प्रस्ताव स्विकारणे, झोन दाखला, वेदरशेड, कम्पाऊंड वॉल, जमिन मोजणी, विद्युत जोडणी, परवानग्या व नामंजूर फाईल नोंदी घेवून नस्ती सुस्थितीत ठेवणे

2. लोक सेवा हक्क अध्यादेश 2015 नुसार मासिक अहवाल तयार करणे

3. शासन पत्रव्यवहार नोंदी घेऊन संचिकेत दाखल करणे.

4. आवक जावक पत्राचा मासिक गोषवारा तयार करणे

5. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे

16लिपीकआवक-जावक सांभाळणे

1. आवक जावक नोंद, नोंदी घेवून रजिस्टर अद्यावत करणे.

2. शासन पत्रव्यवहार नोंदी घेऊन संचिकेत दाखल करणे.

3. सांख्यिकी मासिक माहिती तयार करणे, नमुना 45 नोंदी पुर्ण करुन घेणेस मदत करणे.

4. शासनास सादर केलेल्या फेरबदलाच्या प्रस्तावाचे अभिलेख अद्यावत ठेवणे.

5. आवक जावक पत्राचा मासिक गोषवारा तयार करणे

6. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

7. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 नुसारच्या कार्यवाहीचे अभिलेख तयार करुन अद्यावत ठेवणे.

17लिपीकमाहिती अधिकार

1. माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्राच्या नोंदी घेवून त्याच दिवशी जन माहिती अधिकारी यांचेकडे देणे, प्राप्त पत्राबाबत माहिती अधिका-यांकडून तयार पत्राची नोंद घेऊन विहिती मुदतीत माहिती पुरविणे.

2. पत्र पोष्टाद्वारे पोंच करणे, अपिल अर्जावर नोंदी घेवून सुनावणी लावणे

3. पारित निर्णय पोंच करणे, माहिती देणे, मासिक गोषवारा तयार करुन सामान्य प्रशासन विभागात पाठविणे

4. माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त होणा­या संचिकेमधुन अर्जदारास आवश्यक लागणा­या कागदपत्रांच्या छायाप्रती उपलब्ध करुन देणे.

5. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

18वरिष्ठ लिपिक
मंजूर विकास योजना अंमलबजावणी तपशील

·        

मिरा भार्इंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.14/05/1997 रोजी मंजूर झालेली असून दि.15/07/1997 पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.25/08/2000 रोजी मंजूर झालेली असून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत. तद्नंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करणेस दि.02/12/2020 अन्वये मंजूरी दिलेली आहे.

·        

मौजे-उत्तन,डोंगरी,चौक,पाली,तारोडी या 5 महसुली गावांसाठी शासनाने दि.01/12/2007 रोजीच्या आदेशान्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची (MMRDA) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्ती केलेली आहे.

·        

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्र 79.40 चौ.कि.मी. असुन 19 महसुली गावांचा समावेश आहे.

·        

विकास योजनेतील एकुण आरक्षणाची संख्या

386

·        

विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त गावांतील आरक्षणाची संख्या

52

·        

महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित आरक्षणांची संख्या

334

·        

मौजे-उत्तन,डोंगरी,चौक,पाली,तारोडी व मोरवा या  महसुली गावांसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या विकास योजने नुसार आरक्षणे

39

·        

एकूण आरक्षणे

373

·        

विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त 5 गावांतील आरक्षणे वगळून एकूण आरक्षणे

331

·        

सि.आर.झेडने बाधीत आरक्षणाची संख्या

123

·        

विकसीत; भागश: विकसित व प्रगतीपथावर (56अ25अ15)

96

·        

मिरा भार्इंदर महानगरपालिकेकडे विकासकाने विकास हक्क प्रमाणपत्राव्दारे भागश:  हस्तांतरीत केलेली आरक्षणे

98

·        

शासकीय जागेवरील आरक्षणांची संख्या

14

विभागाकडून करण्यात येणारे कामे

नवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी

2)  भोगवटा दाखला छाननी

3)  विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.

4)  विकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.

5)  महानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.

6)  जागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.

7)  निवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.

8)  शासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.

9)  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.

10) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.

11) महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशिल देणे व मार्गदर्शन करणे.

12) न्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.

13) मा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.

14) माहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.

15) महानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.

16) मा. आयुक्त सो., यांनी निर्देशित केलेले इतर कामे.

प्राथमिक परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे

1) मंजूर विकास नियंत्रण नियमावली बाब क्र. 5 नुसार परिशिष्ठ सहा मधील विहीत तक्त्यातील अर्ज.

2) 7/12 उतारा मुळप्रत चालू महिन्याचे व फेरफार

3) प्रस्तावाखालील जागेचा गटस्केच व मोजणी नकाशा/सि.टी.एस. नकाशा मुळप्रत.

4) फिजीकल सव्र्हे प्लान.

5) प्रॉपर्टी कार्डचा उतारा

6) अधिकार पत्र / भाडे पत्र / खरेदी पत्र (नोंदणीकृत)

7) प्रस्तावाखालील जागा शासकीय/स्थानिक संस्था व इतर संस्थाने लिजवर दिलेली असल्यास संस्थाचे नाहरकत प्रमाणपत्र

8) प्रस्तावाखालील जागेत विद्यमान इमारत असल्यास इमारतीचा तपशील दर्शविणारे विस्तृत बांधकाम नकाशे.

9) यु.एल.सी. विभागाकडील आदेशाची प्रत/नागरी जमिन कमाल धारणा अन्वयेची कार्यवाही झालेली नसलेबाबतचे रु.300/- च्या स्टँम्प पेपरवरिल शपथपत्र.

10)   पाणीपुरवठा संदर्भीत हमीपत्र

11)   वास्तुविशारद व विकासक यांचे संयुक्त हमीपत्र

12)   जमिन ताबा पावती

13)   रस्ता रुंदीकरणातून बाधीत होणारे क्षेत्र हस्तांतर करण्याचा करारनामा

14)   Declaration of Structural Engineer (स्टँम्प पेपरवरिल)

15)   वास्तुविशारद नियुक्ती पत्र.

16)   दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांचेकडील नाहरकत दाखला

17)   अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखला

18)   पर्यवेक्षक अभियंता यांचे नियुक्ती पत्र.

19)   विषयांकित जागेबाबत कराची बाकी नसलेबाबतचे कर विभागाकडील प्रमाणपत्र

बांधकाम परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे

1) मंजूर विकास नियंत्रण नियमावली बाब क्र. 5 नुसार परिशिष्ठ सहा मधील विहीत तक्त्यातील अर्ज.

2) प्राथमिक नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

3) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगी किंवा जमिनीच्या विनिश्चितीबाबतच्या आदेशाची सत्यप्रत

4) अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखला.

सुधारीत बांधकाम परवानगी परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे

1)  वास्तुविशारद यांचा विहीत नमुन्यातील अर्ज.

2)  बांधकाम नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

3)  गाव नमुना मुळ प्रत (परिशिष्ठ 2)

4)  मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती.

जोत्याच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) Appendix XII, Reg 6(4) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2) इमारत जोत्याचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे पूर्ण झाल्याबाबतचा दाखला.

3) जोत्याचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्यतेबाबतचा दाखला.

4) बांधकाम नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

5) मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती.

भोगवटा दाखला मिळणेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

1)  मंजूर विकास नियंत्रण नियमावली AppendixXVIII Appendix XIX, Reg 6(8) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2)  वास्तुविशारद यांचा भोगवटा दाखला मिळणेकरिता अर्ज.

3)  नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत असल्यास नागरी संकुलन ठाणे यांचेकडील नाहरकत दाखला

4)  मे. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषीक मंजूरीचे आदेशाची सत्यप्रत.

5)  मिरा भार्इंदर महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या जोत्याचा दाखल्याची

6)  मंजूर नकाशे व बांधकाम प्रारंभपत्राची सत्यप्रत.

7)  वास्तुविशारदाकडील इमारत महानगरपालिकेने मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे पूर्ण झाल्याचा दाखला.

8)  स्ट्रक्चरल इंजिनिअरकडील इमारतीचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य झालेबाबतचा दाखला. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

9)  इमारतीचे प्लंबींगचे काम पूर्ण झाल्याचा दाखला.

10) अग्निशमन विभागाकडील अंतिम नाहरकत दाखला.

11) उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडील नाहरकत दाखला.

12) सोलार वॉटर सिस्टीम कार्यान्वीत केल्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील प्रमाणपत्र.

13) रेन वॉटर हार्वेस्टींग कार्यान्वीत केल्याबाबतचा पाणीपुरवठा विभागाकडील प्रमाणपत्र.

14) मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती. (सुरु असलेल्या आर्थिक वर्षाची)

15) पर्यवेक्षक अभियंत्याचे बांधकाम योग्य झालेबाबतचे प्रमाणपत्र. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

16) जागेच्या मालकीहक्क व मा. न्यायालयात वाद नसल्याबाबत विकासकाचे हमीपत्र. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

17) जागेत गटार/Storm water/सांडपाणी यांची व्यवस्था केल्याबाबत विकासकाचे हमीपत्र (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

18) जागेत अद्यावत 7/12 उतारे व फेरफार.

19) जागा विकास योजना रस्त्याने/आरक्षणाने/नागरी सुविधा क्षेत्राने बाधीत होत असल्यास सदर जागा नोंदणीकृत करारनाम्याद्वारे महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन त्यांची नोंद महसूल अभिलेखी 7/12 उता-यावर आणून त्याप्रमाणेचे अद्यावत 7/12 उतारे.

विकास हक्क प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी लागणारी कागदपत्रे

1)   Appendix XIV, Reg 6(7) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2)   गटबुक, मोजणी नकाशा, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील नकाशा (मुळ प्रत)

3)   7/12 उतारा व फेरफार (मुळ प्रत)

(अ) जमीनमालकाचे नावाचा

(ब) महानगरपालिकेचे नावाचा

4)   कुलमुखत्यारपत्र (नोंदणीकृत)

5)   यु.एल.सी. च्या आदेशाची प्रत

6)   टायटल रिपोर्ट

7)   सर्च रिपोर्ट

8)   करारनामा (नोंदणीकृत)

9)   ताबा पावती

10)  प्रतिज्ञापत्र

11)  Indemenity Bond

12)  शपथपत्र

13)  Appendix – IV of D.C. Requirement

14) Compliance Report of the Owner

15)  दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि.

16)  वास्तुविशारद नियुक्ती पत्र

17)  कॉऊसिल ऑफ आर्किटेक्टकडील प्रमाणपत्र.

18)  सर्व्हे नकाशा

प्राप्त प्रकरणांवर कार्यवाहीचा तपशील

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास प्रस्तावास परवानगी देतांना प्रस्तावाची खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत येते.

1) महानगरपालिका क्षेत्रातील विकास प्रस्ताव / पूर्नःबांधणी बांधकाम प्रस्ताव.

2) महानगरपालिका क्षेत्रातील विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र घेवून ताब्यात घेणे.

मुख्य सर्व्हेअर/सर्व्हेअर

|
शाखा  अभियंता/कनिष्ठ अभियंता

|
सहाय्यक नगररचनाकार

|
नगररचनाकार

|
सहा. संचालक नगररचना

|

मा. आयुक्त

 

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवर्स बाबत
  1. तत्कालीन वेळोवेळी अस्तित्वातील धोरणानुसार परवानगी घेतलेल्या परंतु मुदतवाढ न घेतल्याने व्यपगत झालेल्या मोबाईल टॉवर्सची संख्या – 109
  2. सदर 109 मोबाईल टॉवर्सना अस्तित्वातील धोरणानुसार मुदतवाढ घेतलेली नसल्याने सदर अनाधिकृत ठरत असलेल्या मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्यासाठी यादीसह माहिती वेळोवेळी अतिक्रमण तथा अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व प्रभाग कार्यालय यांना कळविलेले आहे.
  3. केंद्र शासनाच्या दुरसंचार खात्याने (DOT) दि.01/08/2013 रोजी राज्य शासनास मार्गदर्शक सुचना (Advisory Guideline) दिलेल्या होत्या.
  4. राज्य शासनाने शासन निर्णय क्र.टिपीएस-1810/1975/प्र.क्र.नविन.65/12/वियो/नवि-13, दि.04/03/2014 अन्वये सर्व समावेशक विनियम / धोरण अंतिम केलेले आहे.
  5. दि.03/10/2013 अन्वयेच्या धोरणात अंशतः बदल करुन धोरण अंतिम करण्यात आले आहे.
  6. मोबाईल टॉवर्सला परवानगी देण्याचा अधिकार नियोजन प्राधिकरणास आहे.
  7. विद्यमान मोबाईल टॉवरधारकांस व प्रस्तावित मोबाईल टॉवरधारकांस परवानगी प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे.
  8. प्रशासकीय फी रु.30,000/-
  9. प्रचलित नियमावलीनुसार विकास आकार भरणा करावा लागेल.
  10. विनापरवानगी उभारणेत आलेल्या मोबाईल टॉवरधारकांस 180 दिवसाच्या आत परवानगी घेणे बंधनकारक आहे.
  11. वरिल धोरणाप्रमाणे मोबाईल कंपन्यांनी परवानगी घेतलेली नसून शासनाच्या दि.04/03/2014 च्या धोरणाविरुध्द मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन क्र. 2043/2014 व 2047/2014 दाखल केलेले आहे.मा. उच्च न्यायालयाने दि.12/09/2014 रोजी DOT कडील दि.01/08/2013 च्या मार्गदर्र्शक सुचनेप्रमाणे खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
  12. “State Govt. and / or all authorities and / or the concerned Municipal and / or Local Corporation are restrained from taking any coercive steps and also to accept the application as per the quidelines issued by D.O.T. for erection of towers”
  13. प्राप्त परिस्थितीत महानगरपालिकेने मोबाईल टॉवर्सवर परवानगी व आकारण्यात आलेल्या शुल्काबाबत कार्यालयीन परिपत्रक क्र. मिभा/मनपा/नर/3291/2015-16, दि.19/11/2015 जारी केलेले आहे. त्यानुसार शुल्क भरुन मे. रिलायन्स जिओ इंफोकॉम लि. यांनी एकूण 55 मोबाईल टॉवर्सना परवानगी घेतलेली आहे. रक्कम रु.62,24,800/- चा भरणा करुन घेतलेला आहे.
  14. दरम्यान राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे दि.17/02/2018 रोजीच्या निर्णयान्वये राज्यातले दूरसंचार पायाभूत धोरण निश्चित केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय शुल्काची रक्कम रु.10,000/- प्रति मोबाईल टॉवर व मोबाईल टॉवर परवानगीची वैधता ही 5 वर्षे एवढी निश्चित केलेली आहे.
  15. सदर धोरणात कागदपत्रे व कार्यपद्धतीबाबत त्यांच्या अधिनस्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक त्या मार्गदर्शक सुचना निर्गमीत करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. तथापि नगरविकास विभागाचे सविस्तर निर्देश अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्गमित नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेकडील मोबाईल टॉवर्स परवानगी/नुतनीकरण व त्यापासून महानगरपालिकेस मिळणारे उत्पन्न यावर परिणाम झालेला असल्याने मा. आयुक्त सो., यांचे आदेश क्रमांक मिभा/मनपा/नर/मोबाईल टॉवर/5388/2018-19 दि.14/12/2018 अन्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विना परवानगी उभारणेस आलेल्या मोबाईल टॉवर नियमितीकरणासाठी प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु असुन सद्य:स्थितीत एकूण 203 मोबाईल टॉवर्स करीता परवानगी/नुतनीकरण देण्यात आलेली असून रक्कम रु.27,41,523/- (सन 2021-22) व रक्कम रु.11,69,458/- (सन 2022-23 – माहे जुलै 2022 पर्यंत) व रक्कम रु.39,10,981/- चा भरणा करुन घेतलेला आहे.
मान्यताप्राप्त बांधकाम

सन (२०२१-२२) १ एप्रिल २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ बांधकाम परवानगीचा तपशील

दि.01 एप्रिल 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत – मंजूर परवानगी यादी (1)

सन 2021-22 – बांधकाम परवानगी तपशील

मिरा भाईंदर शहराच्या मंजूर विकास योजनामध्ये फेरबदल करणेबाबत
नगररचना विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत. 2021
Z(1)-Permission (Final-2021)
Z(2)-D.R.C.(Final-2021) – हस्तांतरणीय विकासहक्काद्वारे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती
नागरी सुविधा केंद्र – विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम 37 अन्वये सादर फेरबदल प्रस्ताव (Land) – जानेवारी 2021 पर्यंत
Z (2)-D.R.C.(Final) हस्तांतरण विकासहक्काद्वा
Z (1)-प्राथमिक परवानगी (Final) – जानेवारी 2021 पर्यंत रे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती – जानेवारी 2021 पर्यंत
Z (3)-D.R.C. Reservation – 2021 पर्यंत ताब्यात आलेली आरक्षणाची आ यादी
बांधकाम परवानगीचा तपशील – 1 जानेवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत
सन 2003-04 ते सन 2020-21 (31 जानेवारी, 2021) पर्यंत परवानगींची माहिती
MBMC Town Planning – D.R C. (Final) Till January 2021
MBMC Town Planning – 2003 TO Dec 2020
1099.2020 – सिस्टीम मॅनेजर
MBMC-T.P. – 2003 TO Sept. 2020 – DRC
MBMC-T.P. – 2003 TO Sept. 2020 – Santion
MBMC-T.P. – 2003 TO MAY 2019
MBMC-T.P. – 2003 TO DECEMBER 2019
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आरक्षणे
मिरा भाईंदर शहर च्या मंजुर विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत