Skip to main content
logo
logo

ग्रंथालय विभाग

मिरा भाईंदर परिसरातील वाचनाची व अभ्यासाची आवड असणा-या नागरिकांसाठी व विदयार्थ्यांसाठी महानगरपालिकेतर्फे खालील प्रमाणे वाचनालय व अभ्यासिकेची सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नगरवाचनालय, नगरभवन, दुसरा मजला, मांडली तलाव समोर,भाईंदर (प)

नगरवाचनालयाची स्थापना 13 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 21,565 ग्रंथांचा समावेश आहे. नगरवाचनालयात एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. नगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परिक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. नगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना वाचनालयात दररोज 34 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.

प्र.स.का.क्र.3 वाचनालय, तलाव रोड, भाईंदर (पू).

प्र.स.का.क्र.3 भाईंदर (पु.) येथील ईमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्र.स.का.क्र. 3 वाचनालयात मराठी भाषेतील 6451 ग्रंथ आहेत. तसेच प्र.स.का.क्र.3, तलाव रोड येथे एकूण 37 नियतकालिके (20 मासिके, 7 पाक्षिके, 10 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 73 ते 100 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज 13 वृत्तपत्रांची मोफत वाचनांची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पू).

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे तळमजल्यावर वाचनालय व दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी व इंग्रजी भाषेतील 20,000 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू).

हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू.) येथे तळमजल्यावर वाचनालय व पहील्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी भाषेतील 5,200 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच वरील ठिकाणी 06 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

आरक्षण क्र.100, फ्लायओव्हर जवळ, भाईंदर (प)

आरक्षण क्र.100, फ्लायओव्हर जवळ, भाईंदर (प.) येथील ईमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जरीमरी तलाव अभ्यासिका, साई कॉम्पलेक्स जवळ, काशिमिरा, मिरा रोड (पु.)

जरीमरी तलाव अभ्यासिका, साई कॉम्पलेक्स जवळ, काशिमिरा, मिरा रोड (पु.) येथे तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कै. विलासराव देशमुख भवन अभ्यासिका,जांगीड ॲमिनीटी हॉल, कनकीया, मिरा रोड (पु.)

जांगीड ॲमिनीटी हॉल, कनकीया, मिरा रोड (पु.) येथील ईमारतीमधील अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आ. क्र. 318, सिल्व्हर सरीता अभ्यासिका, काशिगाव, मिरा रोड (पु.)

आ.क्र.318, सिल्व्हर सरीता, काशिगाव, मिरा रोड (पु .) येथील ईमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा व नाममात्र फी आकारुन इंटरनेव्दारे शैक्षणिक संकेतस्थळे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.)

सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) ईमारतीमधील तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)

ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) ईमारतीमधील पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे ग्रंथालये