(ब) अग्निशमन दलाला पुरविण्यात आलेल्या वाहनांची स्वच्छता आणि पॉलीश, वाहनांवरील आणि साठवणीतील साधने स्वच्छ करणे व पॉलीश करणे, होज खरखरुन घासणे व धुणे, स्थानकाच्या फरश्या, भिंती, दरवाजे, खिडक्या घासून स्वच्छ करणे, गॅरेज, कवायत मनोरे व बागेची सुव्यवस्था राखणे या कामांचा यात समावेश असेल. 10. चालक आणि यंत्रचालकांना साधनांची आणि वाहनांच्या गिअर्सच्या योग्य देखभालीकरिता सहाय्य करणे, तसेच रक्षणाची कर्तव्ये, कार्यशाळेची कामे, नियंत्रण कक्ष व पहारा कक्ष येथील कामे, ऑफीस ऑर्डर्लीची कामे व आगीच्या वेळी प्रथमोपचार व संदेशवहन ही कामे करणे. 11. अग्निशमन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची बारकाईने तपासणी करणे व प्रमुख अग्निशामकाला ही साधन सामुग्री तपासल्याबाबतचा अहवाल देणे. 12. स्थानकाचा प्रभारी त्याला योग्य वाटेल अशा इतर पध्दतीने किंवा पाळीने जेव्हा अग्निशामकाची रक्षक म्हणून नेमणूक करेल त्यावेळी तो पूर्ण गणवेश धारण करील व त्याची जागा घेण्याकरिता दुसरा रक्षक हजर झाल्याशिवाय आपली जागा सोडणार नाही अशा वेळी अग्निशामक खालील कर्तव्यासाठी जबाबदार असेल. अ) सदैव दक्ष आणि तत्पर राहणे. ब) स्थानक व परिसरातील सर्व मालमत्तेचे रक्षण करणे. क) अग्निशमन केंद्रात येणा-या सर्व व्यक्ती प्रभारी अधिका-याकडे जातील आणि काम झाल्यावर केंद्रातून बाहेर पडतील हे पाहणे. ड) आत येणा-या व बाहेर जाणा-या वाहनांचा अपघात टाळण्याकरिता नियत्रण ठेवणे. ई) स्थानक परिसरातील बाग व झाडांचे रक्षण करणे. वरील कर्तव्यास जोडून, अग्निशामक, गरजेप्रमाणे व वरिष्ठांकडुन आलेल्या आदेशाप्रमाणे अग्निशमन सेवेच्या अंतर्गत कोणतेही काम करील. |