विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
स्वप्निल सावंत | 8422811401 | licence@mbmc.gov.in |
प्रस्तावना :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 376,383,386 अन्वये मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांनी आपले व्यवसाय करणेकारीता महानगरपालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करुन नोटीसा वाटप केल्या जातात. तदनंतर परवाना कामी प्रस्ताव सादर करुन व्यवसयायधारक वापर करीता असललेल्या जागेचा परवाना शुल्क आकारुन परवाना वितरीत केला जातो. नागरिकांना सुलभ, सहज व विहीत वेळेत आपली कामे पुर्ण होणेकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क 2015 अंतर्गत सेवा पुरविणेकामी तत्कालीन मा.आयुक्त सो., यांनी परवाना विभा मुख्य कार्यालय व प्रभाग अधिकारी तथ पदनिर्देशित अधिकारी यांना जा.क्र./मनपा/सा.प्र./786/2017 अन्वये दि.04/12/2017 प्रभागनिहाय परवाने वितरीत करण्याचे आदेश केले असुन, त्या अनुषंगाने सद्यस्थितीत प्रभाग समिती निहाय परवाने वितरीत केले जातात.तथापि स्टॉलधारकांचे परवाने, परवाना मुख्यालयातुन वितरीत केले जातात. परंतु स्टॉलधारकांचे नविन परवाना देणे धोरण निश्चिती झाले नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल परवाने देणे स्थगित केलेले आहे |
कर्मचाऱ्यांची माहिती :-
|
(जॉब चार्ट ) :-
|
परिपत्रक :- मिरा भाईंदर महानगरपालिका मा.आयुक्त सो., अतिरिक्त आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., यांनी वेळोवेळी कामकाजासंबंधी काढलेली परिपत्रके सोबत जोडत आहे. |
कार्यादेश :- मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करुन नोटीस वाटप करणे, व परवाना कामी प्रस्ताव सादर करणेकामी, मे. सेवादल नागरी सह.संस्था यांना, जा.क्र./मनपा/परवाना/01/2021-22, अन्वये दि. 01/04/2021 रोजी पुढील निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत वरील नमुद कामे करणेकरीता कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
शासन निर्णय :- |
प्रदान करण्यात आलेली देयके :-
|
विभागाने राबविलेले विविध कार्यक्रम यांची सविस्तर माहिती :- मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने, इ. आस्थापनांना परवाने घेणेकामी सर्वेक्षण, नोटीसा बजावण्यात आल्या, परंतु परवानाघेणेकामी व्यवसायधारक मनपा दप्तरी येणेकरीता अनाठाई करत होते. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसायनिहाय व्यापारी वर्गांचा त्यांना सोयीस्कर पडेल अशा जागी मेळावा (कँप) आयोजित करुन जागेवर परवाना वितरीत केला. त्यामुळे व्यापारी वर्गात प्रशासनाविषयीची प्रतिमा चांगली निर्माण होऊन परवाने घेणेकामी व्यापारी आस्थापनांने उस्फुर्त प्रतिसाद दिला |
नागरिकांची सनद : –
|
परवाना फी शुल्क व साठा परवाना :- ठराव क्र. – 06 मा.सभा दिनांक 02.05.2018 मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय / उद्योग धंदे चालू असून या आस्थापनांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनिमय १९४९ चे कलम ३१३,३७६,३८६ प्रमाणे महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना शुल्क वसुली कामी अभिकर्ता नेमण्यात आलेला असुन, महानगरपालिका परवाना मुख्यालय व अभिकर्त्यामार्फत वसुली करावी. परवाना शुल्काचे दर मा. महासभा ठराव क्र. 06 अन्वये अन्वये निश्चित करुन मंजूर केलेले आहेत. त्याकरीता मंजुर केलेल्या दरामध्ये खालीलप्रमाणे क्षेत्रफळानुसार दर निश्चित केलेले आहेत.
मा.महासभा ठराव क्र. 06 अन्वये दि.02/05/2018 रोजी दुकाने/कारखाने, साठा परवाने इत्यादी आस्थापना नविन परवाने/नुतनीकरण परवाने न घेणेकरीता मनपाने आकारणेत आलेले विलंब शुल्क.
|