विभागाचे नांव |
विभागप्रमुख/पद |
दुरध्वनी क्र. |
ई-मेल |
महिला व बालकल्याण विभाग |
श्रीम.चारुशिला खरपडे |
022-28192828 Ext no.-126 |
mahilabalkalyan@mbmc.gov.in |
प्रस्तावना :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 अन्वये महिला व बालकल्याण विशेष समितीचीस्थापना करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 (2) अन्वये महानगरपालिकेस तिच्या सभेत उपस्थित असलेल्या व मत देणाऱ्या पालिका सदस्यांपैकी कमीत कमी दोन तृतीयांश पालिका सदस्यांनी मत देवून पारित केलेला विशिष्ट् ठरावाद्वारे महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाचे क्षेत्र, अधिकार, व कर्तव्य निश्चित करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30(3) अन्वये महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची सभापती व उपसभापती म्हणून नेमणूक करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 (1)(अ) अन्वये महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यापैकी किमान 75 टक्के सदस्य हे महिला पालिका सदस्यांमधील असतील. महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समितीचे 15 सदस्य आहेत. महिला व बालकल्याण समितीची सभा प्रत्येक महिन्याला एक होणे अपेक्षित आहे |
समितीचे अधिकार व कर्तव्य :- महाराष्ट्र महापालिका अधिनियातील कलम 30(3) अन्वये कामकाज करणे या विशेष समितीचे वतीने होणारे सर्व कामकाज/निर्णयास त्या समितीच्या एकूण सदस्यापैकी निदान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठींबा अभिप्रेत आहे. महिला व बालकल्याण विभागाकरीता शासन निर्णयानुसार एकुण बजेटच्या निधिमधून 5 टक्के तरतुद राखीव ठेवणे आवश्यक आहे. |
महिला व बालकल्याण विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी तपशिल :-
|
महिला व बालकल्याण विभागाचे अधिकार व कर्तव्य :-
} शासन निर्णय क्रमांक संर्किर्ण 2005 प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 व शासन निर्णय क्रमांक एमयुएम-2021/प्र.क्र.385/नवि-17 दि.29 मार्च 2022 नुसार महिला व बालकल्याण विभागाने राबवावयाच्या योजनेबाबत नमुद करणेत आलेले आहे. उदा. विविध व्यावसायिक/तांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षण-Ms-Cit, ब्युटीपार्लर, हॉस्पीटिलिटी/पॅरामेडिकल इ. तसेच गरिब व गरजु महिला व बालकाकरिता विविध कल्याणकारी योजनाचा समावेश करणेत आलेला आहे. } अंदाजपत्रकातील एकुण उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसुलातील 5% तरतुदीतून महिला व बालकल्याण विभागासाठी प्रशिक्षण योजना/कार्यक्रम इ.कामे केली जातात. |
अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये व कामकाज :-
|
अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशिल (JOB CHART)
|
शासन निर्णय :- } शासन निर्णय क्रमांक संर्किर्ण 2005 प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 व शासन निर्णय क्रमांक – एमयुएम-2021 /प्र.क्र.385/794/नवि-17 मंत्रालय, मुबई-400 032 दि.29/03/2022 नुसार योजनाची अंमलबजावणी करण्यात येते. } महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमाच्या तरतुदीनुसार } महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या निविदा संबधीत आदेश व दराची दरसुची |
परिपत्रक :- >> शासन/ प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे. |
अंदाजपत्रक सन 2023-24
|
सन 2024-25 महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या / येणा-या योजनेचा तपशिल.:- एकल/निराधार घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य(माय-माऊली योजना) राबविण्यात येते वार्षिक मदत रु.5000/- प्रती लाभार्थी
Ø निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य रु.21000/- एकूण लाभार्थी संख्या-12 Ø निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक मदत देण्यात येते.
Ø मुली व महिला रुग्णाकरिता कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत रु.25000/-
u वय वर्षे 60 वर्षापर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस व विधवा महिलांच्या बाबतीत त्यांच्या वय वर्षे 1 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना(पुरुष) कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अशा महिलांना आर्थिक मदत देणेत येते रु.25000/-
u गरोदर व स्तनंदा माताना सकस आहार पुरवठा- महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, मिरारोड येथे रुग्णालयात प्रसुती करिता दाखल झालेल्या गरोदर मातांना मोफत सकस आहार पुरविण्यात येतो.
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण व उपक्रम खालीलप्रमाणे } महिला व बालकल्याण विभागामार्फत M/s. Hope
4 Best consultant Pvt.ltd.या निविदाधारकांस विहित कार्यवाही पूर्ण करुन 2 वर्ष कालावधीकरिता शहरातील गरीब व गरजू महिला व मुलींना आरोग्य व पॅरामेडिकल या क्षेत्रातील खालील प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार आहे.
} 08 मार्च 2025 जागतिक महिला दिन कार्यक्रम :- दि.11 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी सर्व महिलांना महिला सक्षमीकरणाबद्दल संबोधित केले. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेत मोलाची कामगिरी करणाऱ्या महिला/ उदयोजिका व दिव्यांग लाभार्थी महिलांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ महिला प्रवक्त्यांकडुन महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांना विविध क्षेत्रातील अधिकाराबाबत उदा.लैगिंक तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) यांचे कार्य व त्यासंबंधात महिलांचे असलेले अधिकार याबाबत माहिती सत्र व लघुउदयोग, आरोग्य समस्या व उपायायोजना, आर्थिक बचतीबाबत मार्गदर्शन, तसेच महिलांच्या मनोरंजनाकरिता विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमासह महिलांना आकर्षक भेटवस्तु व अल्पोपहार देण्यात येणार आहे. u मनपा शाळेतील इयत्ता 6वी ते 10वी मधील मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप :- महिला व बालकल्याण विभाग व सामाजिक दायित्व (CSR)अंतर्गंत मा.आयुक्त तथा प्रशासक यांचे उपस्थितीत महानगरपालिका शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वी मधील 1700 मुलीं व 300 गरजु मातांना विनामुल्य एकुण 2000 सॅनिटरी नॅपकीन्स (वर्षभराकरीता) वाटप करुन मुलींकरीता मासिक पाळी स्वच्छता जागरुकता कार्यक्रम राबविण्यात आला. u लैगिंक तक्रार निवारण समिती(विशाखा समिती)- शासकीय कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासुन संरक्षण(प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -2013 मधील तरतुदीनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका, आस्थापनेवरील शासकीय सेवेतील महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या लैगिंक छळवणूकीच्या तक्ररीचे निवारण करण्यासाठी लैगिंक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.
वरील समितीमार्फत महानगरपालिका सेवेतील महिलांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक छळावर प्रतिबंध घालणे, महिलांच्या समस्या व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे व लैगिंक अत्याचार विरोधी जागृती निर्माण करणे अशा प्रकारे कामे केली जातील, महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये महिलांच्या लैगिंक तक्रार निवारणाकरिता तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे. v हिरकणी कक्ष – (स्तनपान केंद्र) § मिरा भाईंदर महानगरपालिकेने खालील ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहे. 1) मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तळ मजल्यावर, भाईंदर(प.) 2) मनपा इंदिरा गांधी रुग्णालय, मिरारोड 3) कनकिया रोड, लक्ष्मी पार्क, उद्यान आरक्षण क्र.269 मिरारोड (पू.) 4) काशिमिरा, पोलीस स्टेशन जवळ, ओव्हर ब्रिज खालील उद्यान
} महिला व बालकल्याण विभागात मार्फत विविध नविन कौशल्यपर प्रशिक्षण राबविणेबाबतचे नियोजन
|
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या / येणा-या योजनेचा तपशिल.(2022-2023)
वरीलप्रमाणे विविध उपक्रम, योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविले जातात.
|
||
>> महारास्ट्र शासन निर्णय 2 | ||
>> महारास्ट्र शासन निर्णय | ||
>> अंदाज पत्रक वर्ष २०२२-२०२३ |
महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनेचे व प्रशिक्षणाचे अर्ज :-
>>वय वर्ष 60 वर्षा पर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस व विधवा महिल्यांच्या बाबतीत त्यांचे वय वर्ष 1 ते 18 पर्यंतच्या मुलांना कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अश्या महिलेना आर्थिक मदत >>महिला व मुलीसाठी कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत >>एकल / निराधार घटस्फोटीत महिलांसाठी आर्थिक मदत- माय-माउुली >>निराधार विधवा / घटस्फोटीत मुलीना विवाहासाठी आर्थिक मदत >>निराधार विधवा / घटस्फोटीत महिल्यांच्या मुलामुलींना शैक्षणिक मदत |