Skip to main content
logo
logo

लेखापरिक्षण विभाग

विभागप्रमुख आणि पद
ई-मेल
दुरध्वनी क्र.
श्री. सुधीर कृष्णा नाकाडी (मुख्यलेखापरीक्षक )
audit@mbmc.gov.in
022-28192828 Ext-141

प्रस्तावना 

              मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक यांच्या विभागाचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-105 (1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनुसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे. तसेच मनपाच्या सर्व विभागाच्या खर्चाच्या बाबीचे पुर्वलेखापरीक्षण व जमा रक्कमेचे उत्तर (पश्चात) लेखापरीक्षणाचे कामकाज करण्यात येते. 

         लेखापरीक्षण विभागाने केलेल्या डॉक्युमेशन, रेकॉर्ड व हाऊसकिपिंग, ट्रेनिंग, तसेच फिडबॅक यानुसार प्रत्येक विभागातील प्रत्येक विषयाच्या विस्तृत व मुद्देसुद लिखाणासह प्रत्येक पदांच्या जबाबदा-या व अधिकार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार विभागाने केलेल्या पुर्ततेप्रमाणे लेखापरीक्षण विभागास आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र ISO 9001:2015 दि.14/12/2022 रोजी प्राप्त झाले आहे.

कार्यरत अधिकारी / कर्मचारी माहिती

अ.क्र
पदनिहाय अधिकारी
पदसंख्या
1
मुख्य लेखापरीक्षक
01
2
उप- मुख्यलेखापरीक्षक
01
3
लेखापरीक्षा अधिकारी
01
4
लेखा परीक्षक (सेवानिवृत्त)
04
5
लिपिक (लेखा परीक्षण)
01
6
संगणक चालक ( स्थायी )
01
7
संगणक चालक तथा लिपिक (कंत्राटी )
01
8
शिपाई
02
9
सफाई कामगार
01

अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये व कामकाज

अ.क्र.

पदनिहाय अधिकारी व कर्मचारी
दुरध्वनी क्र.
माहिती
1
( मुख्यलेखापरीक्षक )

022-28192828

विस्तारीत क्र. 141 

·       महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 105(1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे.

·       महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 47 अन्वये अन्य कर्तव्ये पार पाडणे.

·       महानगरपालिकेच्या लेख्याची तपासणी व लेखापरिक्षण अहवाल मा.स्थायी समितीस सादर करणे.

·       महानगरपालिकेच्या निधीतुन खर्च झालेल्या रकमांचे लेखापरिक्षण करणे.

·       महानगरपालिकेच्या लेखापरीक्षेसंबधी महानगर- पालिकेकडुन किंवा स्थायी समितीकडुन व परिवहन निधीच्या लेखापरिक्षेसंबंधी परिवहन समितीने निर्देशित केल्याप्रमाणे लेखापरीक्षण करणे.

·       प्रलंबित आक्षेपांचे पुर्तता अनुपालन तपासुन आक्षेप वगळुन अंतिम अहवाल मा. स्थायी समितीची मंजुरी घेणे.

·       विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाकाजवर नियंत्रण ठेवणे

·       विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पुनर्विलोकन करणे.
.       माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत प्रथम अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज करणे.
2
 (उपमुख्य लेखापरीक्षक)

022-28192828

विस्तारीत क्र. 161 

·          महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे.

·     विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वार्षिक लेखापरिक्षण प्रारुप अहवाल तयार करणे.

·          विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्यलेखापरिक्षक यांच्या आदेशानुसार कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

·        माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत जन माहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे.  

·     नेमुन दिलेल्या विभागांची देयके, प्रस्तावाची छाननी / तपासणी करून पुढील कार्यवाही साठी सादर करणे    

       मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.
3
(लेखापरीक्षा अधिकारी) 
Ext-158

·     महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे.

·     माहिती अधिकार – 2005 अंतर्गत माहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे.

·     विभागातील दैनंदिन प्राप्त पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे.

·     मा. मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.

·     लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालन करणेसाठी शिबिर आयोजित करणे.

·      वगळलेल्या आक्षेपांचे अंतिम अहवाल (F.R) तयार करणे.

·        उत्तर लेखापरीक्षण कामकाजाचे अंदाजित वेळापत्रक तयार करणे.

·     नेमुन दिलेल्या विभागांची देयके, प्रस्तावाची छाननी/ तपासणी करुन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे सादर करणे.

.     विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्य लेखापरीक्षक यांच्या आदेशानुसार मा. स्थायी समितीस केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करुन त्यासंबंधी पत्रव्यवहार करणे.
4

लेखापरीक्षा अधिकारी

(सेवाकरार)

(Post Audit)
-

·       महाराष्ट्र महानगरपालिका कलम 105 106 नुसार मुख्य लेखापरीक्षक यांचे नियंत्रणाखाली लेखापरीक्षण करणे.

·       मनपाच्या विविध विभागातील प्रत्येक वित्तीय वर्षाचे उत्तर लेखापरीक्षण करणे व नियम बाह्यता बाबत आक्षेप नोंदवुन मुख्यलेखापरीक्षकांना प्रारुप आक्षेप सादर करुन मंजुर करुन घेणे तसेच थकीत वसुली व थकीत येणेबाबत रक्कमांचे विवरणपत्रानुसार तेरीजपत्रकाची वार्षिक अहवालाशी पडताळणी करुन फरकाबाबत आक्षेप नोंदविणे.

·       लेखापरीक्षण आक्षेप अनुपालन पुर्तता शिबिर कार्यक्रम तयार करुन त्याप्रमाणे लेखापरीक्षण आक्षेपांची पुर्तता अनुपालन तपासुन पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करणे.

·       वगळलेल्या आक्षेपांचे अंतिम अहवाल तयार करणे.

·       वार्षिक लेखापरीक्षणाचे अंदाजित वेळापत्रक तयार करणे.  

वरिष्ठ लिपीक

(लेखा परीक्षण) 
-

·       देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·       विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·       माहिती अधिकार अधिनियम – 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे.

·       वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

·       विभागातील दैनंदिन प्राप्त पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे.
6लिपीक टंकलेखक

022-28192828

Ext-133

·      देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·      विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·      सहा. माहिती अधिकारी म्हणुन काम पहाणे.

·      माहिती अधिकार अर्ज, अपिल अर्ज व निकाल मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.

·      वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

    (शिपाई)

  (सफाई कामगार)
-

·       प्रस्तावांचे वाटप करणे व दैनंदिन कामे करणे.

·       वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.
संगणक चालक
(
स्थायी व अस्थायी)
-

·       संगणकाद्वारे विभागातील सर्व कामकाज पार पाडणे.

·       लेखापरीक्षा अधिकारी (सेवानिवृत्त) यांनी लेखापरीक्षण करुन प्रस्तावित केलेले आक्षेप टंकलिखित करणे.

·       वार्षिक लेखापरीक्षण अहवाल टंकलिखीत करणे.

·       अर्धसमास टंकलेखित करणे

·       विवरण पत्र / तेरीज पत्रक टंकलेखित करणे.

·       वगळलेल्या आक्षेपांची नोद घेवुन नोंद अद्यावत ठेवणे

·       Post Audit बाबतची सर्व संगणकीय कामे पार पाडणे.

·       मुख्यलेखापरीक्षक, स्थानिक निधी यांचे कार्यालयाकडील मंजुर वार्षिक अहवाल मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व अद्यावत ठेवणे.

अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशिल  (JOB CHART)

अ.क्र.
अधिकाऱ्यांचे नांव व पदनाम

आकृतीबंध 2019 नुसार मंजूर पदसंख्या

कार्यरत पदसंख्या
कर्तव्य व जबाबदारी

1

मुख्यलेखापरीक्षक

प्रतिनियुक्ती (1)

प्रतिनियुक्ती

(1)

·      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 105(1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे.

·      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 47 अन्वये अन्य कर्तव्ये पार पाडणे.

·      महानगरपालिकेच्या लेख्याची तपासणी व लेखापरिक्षण अहवाल मा.स्थायी समितीस सादर करणे.

·      महानगरपालिकेच्या निधीतुन खर्च झालेल्या रकमांचे लेखापरिक्षण करणे.

·      महानगरपालिकेच्या लेखापरिक्षेसंबधी महानगरपालिकेकडुन किंवा स्थायी समितीकडुन व परिवहन निधीच्या लेखापरिक्षेसंबंधी परिवहन समितीने निर्देशित केल्याप्रमाणे लेखापरीक्षण करणे.

·      विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाकाजवर नियंत्रण ठेवणे

·      विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पुनर्विलोकन करणे.

.      माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ अंतर्गत प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे .
2

उप.मुख्य लेखापरिक्षक

1
1

·       महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे.

·     विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वार्षिक लेखापरिक्षण प्रारुप अहवाल तयार करणे.

·       विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्यलेखापरिक्षक यांच्या आदेशानुसार कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

·       माहितीचा अधिकार – 2005 अंतर्गत जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे.

·       मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.

3

लेखापरीक्षा अधिकारी
2
1

·     महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे.

·     माहिती अधिकार – 2005 अंतर्गत माहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे.

·     विभागातील दैनंदिन प्राप्त पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे.

·     मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.

·     लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालन करणेसाठी शिबिर आयोजित करणे.

·     वगळलेल्या आक्षेपांचे अंतिम अहवाल(F.R) तयार करणे.

·      नेमुन दिलेल्या  विभागांची देयके, प्रस्तावाची छाननी/ तपासणी करुन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे सादर करणे.
4

लेखापरीक्षा अधिकारी (सेवानिवृत्त)

(Post Audit)
-4

·       महाराष्ट्र महानगरपालिका कलम 105 106 नुसार मुख्य लेखापरीक्षक यांचे नियंत्रणाखाली लेखापरीक्षण करणे.

·       मनपाच्या विविध विभागातील प्रत्येक वित्तीय वर्षाचे उत्तर लेखापरीक्षण करणे व नियम बाह्यता बाबत आक्षेप नोंदवुन मुख्यलेखापरीक्षकांना प्रारुप आक्षेप सादर करुन मंजुर करुन घेणे तसेच थकीत वसुली व थकीत येणेबाबत रक्कमांचे विवरणपत्रानुसार तेरीजपत्रकाची वार्षिक अहवालाशी पडताळणी करुन फरकाबाबत आक्षेप नोंदविणे.

·       विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्य लेखापरीक्षक यांच्या आदेशानुसार मा. स्थायी समितीस केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करुन त्यासंबंधी पत्रव्यवहार करणे.

·      लेखापरीक्षण आक्षेप अनुपालन पुर्तता शिबिर कार्यक्रम तयार करुन त्याप्रमाणे लेखापरीक्षण आक्षेपांची पुर्तता अनुपालन तपासुन पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करणे.

·      वगळलेल्या आक्षेपांचे अंतिम अहवाल तयार करणे.

·     वार्षिक लेखापरीक्षणाचे अंदाजित वेळापत्रक तयार करणे.

.     उत्तर लेखापरीक्षण कामकाजाचे अंदाजित वेळापत्रक तयार करणे. 
5
लेखापरीक्षक
2
-

·       महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे महसुलाच्या लेख्यांची तपासणी करुन वार्षिक अहवाल करणेकामी वरिष्ठांना सहाय्यक करणे.

·       लेखापरीक्षण कार्यालयामार्फत केलेल्या अहवालाबाबत शिबीर आयोजित करणे. तसेच संबंधीत विभागाकडून अनुपालन करुन घेणेची कार्यवाही करणे.

·     मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे. 
6
वरिष्ठ लिपीक (लेखा परीक्षण)
1
-

·         देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·         विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·         माहिती अधिकार अधिनियम – 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे.

·         वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

·       विभागातील दैनंदिन प्राप्त पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे.
7

लिपीक

1
1

·       देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·       विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·       वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.
8
संगणक चालक तथा लिपिक 
-
2

·       संगणकाद्वारे विभागातील सर्व कामकाज पार पाडणे.

·       लेखापरीक्षा अधिकारी (सेवानिवृत्त) यांनी लेखापरीक्षण करुन प्रस्तावित केलेले आक्षेप टंकलिखित करणे.

·       वार्षिक लेखापरीक्षण अहवाल टंकलिखीत करणे.

·       अर्धसमास टंकलेखित करणे

·       विवरण पत्र / तेरीज पत्रक टंकलेखित करणे.

·       वगळलेल्या आक्षेपांची नोद घेवुन नोंद अद्यावत ठेवणे

·       Post Audit बाबतची सर्व संगणकीय कामे पार पाडणे.

·       मुख्यलेखापरीक्षक, स्थानिक निधी यांचे कार्यालयाकडील मंजुर वार्षिक अहवाल मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व अद्यावत ठेवणे.

शासन निर्णय:

  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
  • महाराष्ट्र नगरपरिषद लेखासंहिता, 2013
  • कर्मचारी मार्गदर्शक
  • महाराष्ट्र नागरी सेवा (रजा,वेतन,निलंबन व बडतर्फ, शिस्तभंग, इ.) नियम, 1981
  • सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिका
  • महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या दराची दरसुची
  • महापालिकेच्या विविध विभागाकडील नियम, विनियम, उपविधी, स्थायी आदेश, इ.
  • मा. मुख्यलेखापरिक्षक तसेच विभागातील इतर अधिकारी यांनी वेळोवेळी काढलेले कार्यालयीन आदेश

परिपत्रक

·         स्थानिक निधी , महालेखापाल व लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित परिच्छेदांचे जलद गतीने अनुपालन सादर करण्यासंदर्भात प्रत्येक महिन्यामध्ये शिबिर आयोजित करण्यात येते.

·         माहे मार्च २०२४  पर्यंत एकूण ८६  शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत.

लेखापरीक्षण अहवाल

       सन 2017-18 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

        सन 2018-19, 2019-20, 2020-21 2021-22  या वर्षाचे लेखापरीक्षणाचे काम पुर्ण झाले असून मान्यतेसाठी मा.प्रशासक तथा आयुक्त यांचे विषय पटलावर ठेवण्यात आला आहे.

उल्लेखनीय कामगिरी 

सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात दि.१४/१२/२०२२ रोजी विभागास आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र ISO 9001:2015 चे मानांकन प्राप्त झालेले आहे. 

स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल

·         स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2016-17 ते 17-18   

·          स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2015-16

·          स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2014_15

·          स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2013_14

·         स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2012_13

·          स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2011-12