Skip to main content
logo
logo

सार्वजनिक बांधकाम / विद्युत विभाग


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई- मेल
नितिन मुकणे   
Extn. 277
pwd@mbmc.gov.in

प्रस्तावना कर्तव्य :-

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्र 79.40 चौ. कि.मी. एवढे असून शहर दहिसर चेकनाका ते वर्सोवा उत्तन ते चेणा पर्यत पसरलेले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्र मुंबई महानगरपालिकेलगत असल्याने मुंबईत कामानिमित्त येणारे नागरीक या शहरात वास्तव्य करीत असल्याने शहराचे वेगाने नागरीकरण होऊन लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. 

मिरा-भाईंदर महानगरपालिका तत्कालिन नगरपरिषदेची स्थापना होण्यापूर्वी या भागात एकूण नऊ (9) ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. 12 जून 1985 रोजी नऊ ग्रामपंचायती मिळून वर्ग नगरपरिषदेची स्थापना झाली. तद्नंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे

बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणारी कामे :-

  • 1)      विविध स्थापत्य विषयक विकासाची कामे पार पाडणे.

    2)      विविध विद्युत विषयक कामे पार पाडणे.

    3)      रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्था करणे.

    4)      महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता अद्यावत ठेवणे.

    5)      विविध सार्वजनिक प्रयोजनाकरीता यंत्रणांना रस्ते खोदाई परवानगी देणे, रस्ते दुरुस्तीचा खर्च वसूल करणे.

    शहरातील नागरी सुविधा पुरविणे कामी महानगरपालिका दर वर्षी अर्थसंकल्पात विविध लेखाशिर्षाखाली तरतूद करून कामे करीत असते. यामध्ये रस्ते, नाले, गटारे, सिमेंट काँक्रीट रस्ते, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, शाळा, समाज मंदिर, वाचनालय, विरंगुळा केंद्र, सबवे, सार्वजनिक इमारती, कम्युनिटी सेंटर, मार्केट . चा समावेश आहे. रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्था, विद्युत विषयक कामे देखील या विभागामार्फत पार पाडली जातात. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता यांची देखभाल दुरूस्ती करण्यात येत असते. या शिवाय शासनामार्फत मंजूर झालेल्या योजनांची कामेसुद्धा करण्यात येत आहेत

बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली प्रमुख कामे व योजना :-

·        घोडबंदर किल्ला संवर्धन, नुतनीकरण करणे


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातुन विविध रस्त्यांची कामे करणे.


भाईंदर (पश्चिम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगत असलेल्या विद्यमान अग्निशमन केंद्र इमारतीच्या जागेत कम्युनिटी हॉल बांधणे.


भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 122 या जागेत हिंदू हद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन उभारणे.


मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 300 येथे स्व. प्रमोद महाजन यांचे कलादालन उभारणे.


घोडबंदर प्रवेशद्वारा समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभोवतालच्या वाहतूक चौक परिसराचे सुशोभीकरण करणे.


गृहयोजने अंतर्गत सदनिका बांधणे.


भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र. 108, विकास योजनेतील मार्केट विकसित करणे


भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र. 241 कम्युनिटी सेंटर बांधणे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) मेट्रो - 9 अंतर्गत दहिसर ते मिरा भाईंदर या 9 कि.मी. मार्गावर मेट्रो रेल्वे बांधण्याचे काम सुरु आहे. सदर मेट्रोच्या मार्गात एकूण आठ स्टेशन आहेत.


भाईंदर (.) सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन गाव (टप्पा-2) रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरण करणे.


मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (.) येथील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय इमारतीत वाढीव पाचवा मजला बांधणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील श्री. गोवलकर गुरुजी चौक ते स्व. प्रफुल्ल पाटील चौक पर्यंतचा रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे.

भाईंदर (पुर्व) नवघर शाळा क्र. 13 येथे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम करणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) साईस्नेहा बिल्डींग ते राज इनक्लेव्ह बिल्डींग पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे.

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर बस डेपो पासुन 18 मीटर रुंदीचा रस्ता 60 मीटर रुंदीच्या रस्त्यापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे.

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) काशी गांव कला सिल्क पासुन मौजे घोडबंदर 124 पर्यंत गटार बांधणे डी.पी. रस्ता तयार करणे.

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर येथे मल्टीपरपज (अग्निशमन केंद्र) इमारत बांधणे.

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र.233 येथे जिम्नॅस्टिक सुविधा तयार करणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पुनम गार्डन ते सालासर पर्यंत रस्ता सी.सी. रस्ते बनविणे.

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर सर्व्हे क्र.233 या ठिकाणी सांस्कृतिक भवन, विपश्यना केंद्र, बहुउद्देशिय केंद्र बांधणे.

मिरारोड (पुर्व) उमाकांत मिश्रा चौक ते मिरारोड स्टेशन क्रॉस रस्त्यापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे.

मिरारोड (पुर्व) शांतीनगर परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शांतीनगर सेक्टर नं.06 इमारत क्र.बी/7 ते सेक्टर नं.3 ते पुनमसागर रस्त्यापर्यंत तसेच दि हेल्थवेल मेडिकल स्टोअर ते सेक्टर नं.8 इमारत क्र.सी/24 जवळील जाफरी खाडी पर्यंत आर.सी.सी. नाला बांधणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पूर्व) शिवपुजा इमारत (विजय पार्क) ते प्लेझंट पार्क रोड वरील सिल्वर क्राऊन इमारती पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अमर पॅलेस ते कोंबडी गल्ली पर्यंत रस्ता सी.सी. करणे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर प्रवेशव्दार येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रॉन्झचा अश्वारुढ पुतळा उभारणेसाठी शिल्पकार नेमणे. (30 फुट)

बांधकाम विभागामार्फत पूर्ण केलेली प्रमुख कामे:-

 

Ø  भाईंदर पूर्व पश्चिम यांना जोडणारा जेसलपार्क येथे सबवे बांधणे

Ø  घोडबंदर येथे बस डेपो बांधणे.

Ø  चौक, उत्तन, पाली, मोर्वा, मुर्धा, भाईंदर सेकंडरी, बंदरवाडी, नवघर, गोडदेव, खारीगांव, मिरारोड,   

Ø  मिरागांव, काशीगांव, माशाचापाडा, पेणकरपाडा, घोडबंदर, काजूपाडा येथे शाळागृह इमारती बांधणे.

Ø  मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 178 कम्युनिटी सेंटर बांधणे.

Ø  मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 241 कम्युनिटी सेंटर बांधणे.

Ø   भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 218 प्रमोद महाजन कम्युनिटी सेंटर बांधणे.

Ø   भाईंदर (पश्चिम) टेंबा हॉस्पीटल बांधणे.

Ø   मिरारोड (पुर्व) इंदिरा गांधी हॉस्पीटल बांधणे

Ø   भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 231 मार्केट बांधणे.

Ø  भाईंदर (पश्चिम), सिल्वर पार्क येथे अग्निशमन केंद्र तसेच अग्निशमन स्थानके बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, नगरभवन इमारत, प्रभाग कार्यालये बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत समाजमंदिरे, बालवाडी, शौचालये, स्मशानभूमी, दफनभूमी, दशक्रिया विधीशेड . विकसित करण्यात आले.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मोर्वा तलाव, सूर्य तलाव, राई तलाव, मुर्धा तलाव, मांडली तलाव, राव तलाव, गोडदेव तलाव, खारी तलाव, नवघर तलाव, शिवार तलाव, सातकरी तलाव, सुकाळ तलाव, जरीमरी तलाव, ., विकसित करण्यात आले.

Ø  आरक्षण क्र. 100, 109, 117, 122 सी, 167, 170, 216, 221, 235, 242, 255, 261, 269, 273, 299, 305, 368, . उद्यान मैदाने विकसित करण्यात आले.

Ø  मिरारोड स्टेशन सुशोभीकरण करणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भाईंदर (.) नगरभवन, भाईंदर (.) उड्डाणपूल शेजारी आरक्षण क्र. 100, भाईंदर (पूर्व) खारीगांव शाळा, मिरारोड (पूर्व) इंदिरा गांधी हॉस्पीटल या ठिकाणी वातानुकूलित अभ्यासिका सुरु करण्यात आल्या.

Ø  भाईंदर (.) विनायक नगर येथे समाजमंदिर बांधणे.

Ø  एकात्मिक योजने अंतर्गत नाले बांधणे.

Ø  भाईंदर (.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता (60 फूट रोड), भाईंदर (.) वालचंद प्लाझा ते अरिहंत दर्शन ( 90 फूट रोड), भाईंदर (पूर्व) गोल्डन नेस्ट रोडवरील गोल्डन नेस्ट पोलिस चौकी ते हनुमान मंदिर रस्ता, मिरारोड (पूर्व) दिपक हॉस्पीटल रस्ता, मिरारोड (पूर्व) हैदरी चौक ते नरेंद्र पार्क सर्कल रस्ता, मिरारोड (पूर्व) उमाकांत मिश्रा चौक ते सृष्टी जूना ब्रिज पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) अयप्पा मंदिर ते देना बँक पर्यंत रस्ता, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क येथील ओसवाल ऑर्नेट ते ओसवाल ऑनेक्स रस्ता, काशिमिरा हॉटेल ते सनराईज नाईट मिटिंग पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) शांती पार्क बालाजी हॉटेल ते देनाबँक रस्ता, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क कपूर टॉवर ते रेल्वे समांतर रस्ता, मिरारोड (पूर्व) पय्याडे हॉटेल ते लोढा पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) सिल्वर पार्क ते सृष्टी पर्यंत रस्ता, भाईंदर (पूर्व) गोल्डन नेस्ट रोडवरील स्पोर्टस् कॉम्ल्पेक्स ते सेवन इलेव्हन हॉस्पिटल पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) शांतीनगर सर्कल ते कुणाल शॉपिंग सेंटर पर्यंतचा रस्ता, भाईंदर (पूर्व) प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरी रस्ता, घोडबंदर रस्ता, भाईंदर (पुर्व) जैन उपासना भवन ते अक्षिता बिल्डींग पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले.

Ø  भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र.119 येथे स्पोर्टस् कॉम्ल्पेक्स बांधणे.

Ø  मिरारोड भाईंदर स्टेशन दरम्यान रेल्वेखालील कल्वर्ट बांधणे.

Ø  मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 262 टाऊनपार्क बीओटी तत्वावर विकसित करण्यात आले.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक मालमत्ता रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली.

Ø  महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्यावर सिग्नल व्यवस्था करण्यात आली.

Ø  मिरारोड (पूर्व) येथे मेजर कौस्तुभ राणे यांचे स्मारक बांधणे.

Ø  भाईंदर (पश्चिम) फाटक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे, तसेच महापालिका प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारणे.

Ø  चौक येथे चिमाजी आप्पा यांचा अश्वारुढ पुतळा, भाईंदर (पूर्व) फाटक येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क येथे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम यांचा अर्धाकृती पुतळा बसविणे.

Ø  भाईंदर (पूर्व) येथे नवघर स्वातंत्र सैनिक स्मारक बांधणे

Ø  महिला बालविकास भवन बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मेडीटेशन सेंटर बांधणे

Ø  भाईंदर (पुर्व) नवघर शाळा क्र.13 येथे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम करणे.

Ø  भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र.121 वाचनालय बांधणे.

Ø  मिरारोड (पुर्व) इंदिरा गांधी हॉस्पीटल येथे वाढीव मजला बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील UTWT अंतर्गत रस्ते विकसित करणे.

Ø  लोढा ॲमिनिटी येथे तरण तलाव बांधणे.

Ø  अमृत अभियान अंर्तगत पर्जन्य जलवाहीन्या बांधण्याची कामे करणे.

Ø  भाईंदर (पुर्व) स्टेशन लगतच्या परिसराचे सुशोभिकरण करणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका रा..क्र. 8 वरील काशिमिरा उड्डाणपुलाखालील जागेमध्ये उद्यान विकसीत करणे.

Ø  भाईंदर (श्चिम) स्टेशन लगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे.

Ø  काशिमिरा पोलिस स्टेशन लगतच्या जागेत पशुवैद्यकीय दवाखाना बांधणे.

Ø  भाईंदर (पूर्व) नवघर लोकमान्य टिळक सभागृह पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे.

Ø  मिरागांव आरक्षण क्र.356 उर्दू शाळा इमारत बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्र.06 चे कार्यालय डेल्टा गार्डनच्या बाजुला असलेल्या जागेत बांधणे.

Ø  रा..क्र.08 रस्ता खालून पावसाळी सांडपाण्याचा निचरा करणेसाठी 2000 मी.मी व्यासाची आर.सी.सी. पाईप जॅाकिंग ॲण्ड पुशिंग पध्दतीने वर्सोवा साई पॅलेस हॅाटेल येथे टाकणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रा..क्र.08 काशी जनता नगर येथील मांडवी पाड्याकडे जाणाऱ्या विकास रस्त्यालगत नविन गटार बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रा..क्र.08 स्व. आनंद दिघे चौक ते माशाचा पाडा शाळेपर्यंत अस्तित्वातील पायवाट रस्ता काँक्रीटीकरण करणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील रा..क्र.8 काशी जनता नगर येथील मांडवी पाडयाकडे जाणारा 15 मी. रुंद विकास रस्ता (UTWT) पध्दतीने काँक्रीटीकरण करणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर गावाकडुन किल्लाकडे जाणा­या रस्त्यावर भव्य प्रवेशव्दार बनविणे.

Ø  भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र.10 गोल्डन नेस्ट फेस 7,8,9,10 येथील सोनम आकांशा येथील बिल्डींग समोर जेष्ठ नागरीकासाठी विरंगुळा केंद्र बनविणे.

Ø  राई आरक्षण क्र.56 सी कम्युनिटी हॉल बांधणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 15 येथिल सातकरी तलाव सुशोभिकरण करणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) शांतीपार्क येथे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र तयार करणे.

Ø  राष्ट्रीय महामार्ग क्र.08 महाजनवाडी महाविष्णु मंदीर मागील तलावाची सुशोभिकरण करणे. (भाग-2)

Ø  घोडबंदर गावातील पद्मावती तलावाचे सुशोभिकरण करणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील दाचकुल पाडा नविन शाळा बांधणे.

Ø  मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन लगतच्या परीसराचे सुशोभिकरण करणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र.269 या उदयान आरक्षणात शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारक बांधणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात राई आरक्षण क्र.56 सी बहुउद्देशीय इमारतीत पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे.

Ø  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (.) विदयुत शवदाहिनी बसविणे.


कार्यालयीन दुरध्वनी क्र. 28193028, 28181353, 28192828

.क्र
अधिकारी / कर्मचारी नांव
हुद्दा
विस्तार क्रमांक
1
श्री. दिपक खांबित
शहर अभियंता
155
2
श्री. नितिन मुकणे
कार्यकारी अभियंता
277
3
श्री. यतिन जाधव
प्र. उप अभियंता
268
4
श्री. सतिश तांडेल
प्र. उप अभियंता
242
5
श्री. राजेंद्र पांगळ
प्र. उप अभियंता
372
6
श्री. चेतन म्हात्रे
शाखा अभियंता
371
7
श्री. प्रविण दळवी
कनिष्ठ अभियंता
182
8
श्री. संदिप साळवे
कनिष्ठ अभियंता
185
9
श्री. प्रफुल्ल वानखेडे
कनिष्ठ अभियंता
186
10
श्री. प्रशांत जानकर
कनिष्ठ अभियंता (विदयुत)
214
12
श्री. जितेश मोरे (आवक जावक)
लिपीक
216
13
संगणक कक्ष
संगणक चालक
215

बांधकाम विभागात खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. : -
अ.क्र
पदनाम
संख्या
1शहर अभियंता01
2
कार्यकारी अभियंता
01
3
उपअभियंता
-
4
शाखा अभियंता
04
5
कनिष्ठ अभियंता
04
6
कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)
25
7
वरिष्ठ लिपीक
03
8
लिपीक
11
9
गवंडी
01
10
शिपाई / सफाई कामगार / रखवालदार /जुर
37
11
संगणक चालक (अस्थायी / कंत्राटी)
09

एकूण
92

बांधकाम विदयुत विभातील अधिकारी / कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप :-

.क्र.अधिकारी / कर्मचाऱ्याचे पदकामाचे स्वरुप

1

शहर अभियंताबांधकाम / विद्युत विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.

2

कार्यकारी अभियंता
बांधकाम / विद्युत विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.

3

उप-अभियंता
शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली नेमुन दिलेली विविध विकास कामावर देखरेख, नियंत्रण ठेवणे, तपासणी करणे, विहित पध्दतीत कार्यवाही करणे, .

4

कनिष्ठ / शाखा अभियंता
प्रभागामधील विविध विकास कामांची पाहणी करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे वरीष्ठांच्या सुचना मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे. विकास कामांचे तसेच सार्वजनिक रस्त्यांचे दाखले तयार करणे, .

5

कनिष्ठ अभियंता (विद्युत)
मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध विद्युतविषयक कामे करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे वरीष्ठांच्या सुचना मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे, .
6
वरिष्ठ लिपीक
प्रस्ताव रजिस्टर/तांत्रिक मंजुरी रजिस्टर, विकास कामांचे अनुभव दाखले, गोपनीय दाखले, हिस्ट्री रजिस्टर, शासनाची निधीची माहिती, मालमत्ता रजिस्टर, बांधकाम रजिस्टर अदयावत ठेवणे, आवश्यक कार्यवाही करणे, अंदाजपत्रक तयार करणे. प्रभागमधील विकास कामांची देयके तयार करणे, अग्रेसीत करणे, विकास कामांबाबत माहिती अदयावत ठेवणे, देयक रजिस्टर अदयावत ठेवणे, प्रभागातील देयके वेळोवेळी लेखा विभागातुन Certify करणे, तसेच अभिलेख कक्ष कनिष्ठ अभियंता यांच्या देखरेखेखाली अदयावत ठेवणे. वरीष्ठांच्या सुचनेनुसार काम करणे.
7
लिपीक
टेंडर क्लार्क म्हणून निविदा बाबत टेंडर फॉर्म तयार करणे, विक्री करण, निविदा उघडणेबाबत कार्यवाही करणे, तुलनात्मक तक्ते, ठरावाचे नमुने, कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही, करारनामे, सुरक्षा अनामत इसारा रक्कमेबाबत विहित कार्यवाही करणे, जिल्हा मजूर सोसायटींना पत्रव्यवहार करणे, बी-1 फॉर्म अद्ययावत ठेवणे, कामांचे कार्यादेश दिल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडे संचिका वर्ग करणे, निविदा सुचना देयके तयार करणे, निविदा सुचना प्रसिध्दी रजिस्टर अद्ययावत ठेवणे धोकादायक इमारतीबाबत रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे कामे करणे, पत्रव्यवहार अद्ययावत ठेवणे, शासकिय विमा कपात संबंधित विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करणे, रजा नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवणे. आवक जावक नोंदवही अद्यावत ठेवणे. रिलायन्स एनर्जी, एम.टी.एन.एल रस्ता खोदाई परवानगी तयार करणे. वरीष्ठांच्या सुचनेनुसार काम करणे.
8

गवंडी

प्रभाग मधील विकास कामावर देखरेख ठेवणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे.
9

शिपाई

बांधकाम / विद्युत विभागात विभागवार नेमण्यात आलेल्या विभागप्रमुखांनी सांगितलेली कामे करणे.
10

सफाई कामगार

प्रभागातील स्ट्रीट लाईट पाहणी, रस्ते खोदाई पहाणी, आणि प्रभागातील कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे.

अभियांत्रिकी विभागातील अभियंत्याची कर्तव्ये व जबाबदारी :-

.क्र

अधिकारी

अधिनियम व तरतुद

शहर अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी

1

शहर अभियंता

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual

1) शहराचे नियोजन व शहर विकास संबधीत विभाग प्रमुख म्हणून काम पहाणे.

2) महानगरपालिकेतील अभियांत्रिकी/बांधकाम, विदयुत, पाणीपूरवठा, मलनिस्सारण व वाहतूक, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे धोरणात्मक निर्णयाविषयी कार्यवाही करणे.

3) प्रशासकीय विभाग प्रमुखाच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदाऱ्या, कार्यालय व विभागीय कार्यालयांचे नियंत्रण अधिकारी व नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पहाणे. विभागातील कामाबाबत संबधिताना कार्यवाहीचे आदेश देणे, जबाबदाऱ्या निश्चित करुन देणे.

4) महानगरपालिकेच्या मालमत्तांचे परिक्षण करणे, नागरिकांच्या व शहराच्या विकास आवश्यक ते अंदाजपत्रकीय तरतुदीसाठी कार्यवाही करणे. अभियांत्रिकी विभागाचा अर्थसंकल्प बनविणे व महानगरपालिकेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनूसार कार्यवाही करणे. अतिरिक्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंते, उप अभियंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

5) अभियांत्रिकी विभागाशी संबधीत शासन व इतर अशासकीय संस्थांशी समन्वय ठेवून कामाचा पाठपूरावा करणे.

6) मूळ व सुधारीत अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे (रु.25.00 लक्षावरील सर्व कामे)

7) रु. 25.00 लक्षावरील सर्व कामांच्या निविदांच्या अटी शर्ती व इतर अत्यावश्यक तांत्रिक बाबी निविदेपूर्वी मंजूर करणे.

8) सार्वजनिक बांधकाम विभागाची दरसूची/महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दरसूची व्यतिरीक्त असलेल्या कामांच्या बाबींना (Rate Analysis) ला मंजूरी देणे.

9) रु. 5.00 कोटी रकमेच्या कामांना आवश्यकतेनूसार मुदतवाढी देणे.

10) मंजूर प्रशासकीय रकमेच्या अधिन राहून कंत्राटदाराना कार्यादेश देण्यास मान्यता देणे, वाढीव कामानां मान्यता देणे.

11) विविध शासकीय व इतर बैठकांना हजर राहणे.

12) मा.उच्च न्यायालयात Affidevit सादर करणे व इतर संबधित प्रकिया पार पाडणे.

13) कार्यकारी अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदीत करुन मा.आयुक्ताकडे पुर्नविलोकित करण्यासाठी सादर करणे.

14) मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पॅनलवर बांधकाम अभियंता यांच्या नियुक्त्या करणे, मुदतवाढ देणे.

15) निविदा समिती मध्ये सदस्य म्हणून काम करणे.

16) कंत्राटदार यांच्या कामाबाबतचे अनुभव दाखले, गोपनीय अहवाल पाठविणे.

17 )कंत्राटदारांना कामाबाबत नोटीसा देणे, आढावा व इतर बैठका घेणे, सुनावणी घेऊन कामे रद्द करणे, इसारा रक्कम, सुरक्षा अनामत रक्कम जप्त करणे.

अभियांत्रिकी विभागातील अभियंत्याची कर्तव्ये व जबाबदारी : -

.क्र.

अधिकारी

अधिनियम व तरतुद

कार्यकारी अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी

1

कार्यकारी अभियंता (स्थापत्य/ विद्युत)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual

1.   महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, तलाव, मैदान, स्मशानभूमी, दफनभुमी, अग्निशमन केंद्र, रुग्णालये, वाचनालय, अभ्यासिका, भुयारी मार्ग, बस डेपो, रंगमंच, उड्डाणपूल, कम्युनिटी सेंटर, शाळा, शौचालये, मार्केट, आरोग्य केंद्र, समाजमंदिर, स्पोर्टस् कॉम्पलेक्स, विधी घाट, विरंगुळा केंद्र, वाहनतळे व इतर मालमत्ता विकसीत करणे व देखभाल व परिरक्षण करणे, सुस्थितीत ठेवणे. विविध योजना तयार करणे.

2.   महानगरपालिका क्षेत्रातंर्गत प्रस्तावित करावयाच्या मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदान, स्मशानभूमि, वाहनतळे व इतर मालमत्ता विकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे व त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणे.

3.   कामाचे निविदा, कामाचे आदेश, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता याबाबत कार्यवाही करणे.

4.   कामावर पर्यवेक्षण करणे, उप अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

5.   कामांच्या प्रशासकीय तसेच तांत्रिक नोंदी ठेवणे.

6.   विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाच्या योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे.

7.   पूर्ण झालेल्या मालमत्तांचे संबधीत विभागास हस्तांतरण करणे.

8.   रु.25.00 लक्षापर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देणे.

9.   सर्व रु.25.00 लक्षापर्यंतच्या कामांची निविदा तयार करून प्रसिद्ध करणे व रु.25.00 लक्षावरील कामांच्या निविदा शहर अभियंता यांच्या मंजूरीने प्रसिद्ध करणे, सर्व कामांच्या निविदा उघडणे, शहर अभियंता यांच्या मान्यतेने कार्यादेश देणे.

10. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व उप अभियंता यांनी तयार केलेल्या कामांचे 5% मोजमाप तपासणे.

11. कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे.

12. अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे.

13. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

14. कंत्राटांच्या संबंधित बाबी विषयी पत्र व्यवहार करणे.

15. लेखा परिक्षण विषयक कामे करणे.

16. अभिलेख जतन करणे.

17. कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण करणे.

18. रु.25.00 लक्ष वरील कामे तपासून शहर अभियंताकडे तांत्रिक मान्यतेकरीता अग्रेषीत करणे.

19. रु.2.00 लक्ष पर्यंतची कामे करण्यासाठी खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजूरी देणे व कोटेशन्स मागविणे व त्यास मंजूरी देणे. कोटेशन नोटीस काढणे, कोटेशन उघडणे.

20. प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर (Completion Certificate)  देणे, ठेकेदाराचे अनुभव दाखले, गोपनीय अहवाल देणे.

21. मा. स्थायी समिती सभेच्या मान्यतेने मे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई मर्या., कडे स्ट्रीट लाईट प्रस्ताव पाठविणे.

22. विविध समित्यांच्या बैठकांना हजर रहाणे.

23. सर्व कामांची रनिंग/अंतिम देयके शहर अभियंता, मुख्यलेखाधिकारी मुख्य लेखापरिक्षक मार्फत सादर करणे.

24. सार्वजनिक बांधकाम, नियम पुस्तिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम लेखामधील तरतूदीनूसार सर्व कामांच्या विहीत नमुन्यात नोंदी ठेवणे.

25. बांधकाम विभागातील कर्मचारी/अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमित बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. वर्ग-4, वर्ग-3 कर्मचारी, कनिष्ठ अभियंता यांचे केलेले गोपनीय अहवाल पुर्नविलोकीत करणे, उपअभियंता यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित करुन पुर्नविलोकीत करण्याकरीता आयुक्त यांच्याकडे पाठविणे,

26. रिलायन्स एनर्जी लि. एम.टी.एन.एल. व इतर सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सीना सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता दुरुस्ती चार्जेस वसूल करुन रस्ता खोदाई परवानग्या देणे, चार्जेस वसूल करणे.

27. विविध न्यायालयातील बांधकाम विभागा संदर्भात प्रकरणे हाताळणे, पाठपुरावा करणे, पत्रव्यवहार करणे, वकालतनामा सहया करणे.

28. विविध विकास कामांबाबत अडथळा निर्माण झाल्यास संबधित खात्याशी पत्रव्यवहार करणे, पोलिस स्टेशनशी पत्रव्यवहार करणे, बंदोबस्त घेणे, पाठपुरावा करणे.

29. सार्वजनिक/वहिवाटीचे व विकास आराखडयातील रस्त्याबाबत मागणीनुसार खात्रीकरुन महानगरपालिकेने ठरविलेली फी घेऊन दाखले देणे.

30. सुलभ शौचालये बांधणे कामी आवश्यकतेनुसार पाहणी करुन आलेल्या प्रस्तावाची / अर्जाची छाननी करणे, शहर अभियंता व मा.आयुक्त यांच्या मान्यतेने कार्यादेश देणे, करारनामे करणे.

31. शहरात विविध चौकात वाहतुक बेट/ट्राफिक आयलंड बांधणे कामी आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन शहर अभियंता, मा. आयुक्त यांच्या मान्यतेने कार्यादेश देणे, करारनामे करणे.

32. सोलर हिटींग सिस्टीम बसविण्याबाबत, नाहरकत दाखला नगररचना विभागाकडे देणे, मुदतवाढी देणे.

33. शहर अभियंता यांच्या मान्यतेने विकासकास स्वखर्चाने गटारे/नाले कल्वर्ट बांधण्यास लांबी, रुंदी, खोली, उतार सह नकाशे देणे, परवानग्या देणे.

34. शहर अभियंता यांच्या मान्यतेने खाजगी शाळा इमारतींमध्ये वर्ग खोल्या हवेशीर व प्रकाशमय असणे, संरक्षक भिंत, खेळाची मैदाने व आवश्यक सुविधा, अग्निशमन दलाची गाडी फिरण्यास रस्ता आहे किंवा कसे याबाबत पहाणी करुन प्रमाणपत्र देणे.

35. शहर अभियंता यांच्या मान्यतेने मौजे डोंगरी, उत्तन, पाली, तारोडी, चौक परिसरात एम.एम.आर.डी.. विकास प्राधिकरण असल्याने सदर भागातील इमारत प्रस्तावाबाबत विद्यूत पुरवठा Storm Water Drain रस्त्याबाबत पहाणी करुन नाहरकरत दाखला देणे.

36. मनपाच्या स्थावर मालमत्तांना विद्युत पुरवठा करणे कामी अर्ज करणे, रस्ता तुटफुट देयके तयार करुन देयकाची मागणी करणे, पाठपुरावा इ. कार्यवाही करणे.

37. मनपा मालमत्तांना नविन विद्युत जोडणी करीता आवश्यक देयक प्रदान करणे, संरचनात्मक तपासणी करून दुरूस्ती परवानगी देणे.

38. शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (बी.एस.यु.पी योजना) कामी पात्र लाभार्थ्यांसोबत करारनामा नोंदणीकृत करणे.

39. इसारा रक्कम, सुरक्षा अनामत, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमा परत करण्यासाठी लेखा विभागाकडे पत्राद्वारे कळविणे.

40. मनपाच्या पाणपोई खाजगी संस्थाना ठराविक मुदतीसाठी चालविण्यास भाडयाने देण्याकरीता शहर अभियंता मा.आयुक्त यांच्या मान्यतेने करारनामा करणे, परवानगी पत्र व ताबा देणे.

41. नामकरण धोरणानुसार खाजगी संस्थाना नामफलक बसविणेस मान्यता देणे, मनपामार्फत नामफलक बसविणेस मान्यता देणे.

42.विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System विकसीत करणे.

अभियांत्रिकी विभागातील अभियंत्याची कर्तव्ये व जबाबदारी

.क्र.

अधिकारी

अधिनियम व तरतुद

उप अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी

1

उप अभियंता (स्थापत्य / विद्युत)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual

1.   महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदान, स्मशानभूमी,  वाहनतळ व विविध विकासकामे विकसीत करणे व देखभाल व परिरक्षण करणे, सुस्थितीत ठेवणेची कार्यवाही करणे.

2.   महानगरपालिका क्षेत्रातंर्गत प्रस्तावित करावयाच्या मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्यान, मैदान, वाहनतळ व विविध विकासकामे विकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे व त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणेसाठी सादर करणे.

3.   कामाचे निविदा, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता याबाबत कार्यवाही करणे.

4.   कामावर पर्यवेक्षण करणे, कनिष्ठ / शाखा अभियंता यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

5.   कामांच्या प्रशासकीय तसेच तांत्रिक नोंदी ठेवणे.

6.   विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाचा योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे.

7.   पूर्ण झालेल्या मालमत्तांचे संबधीत विभागास हस्तांतरण करणे.

8.   कनिष्ठ / शाखा अभियंता यांनी तयार केलेल्या कामांचे 100% मोजमाप तपासणे.

9.   कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे.

10. जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.

11. सर्व अभिलेख/दफ्तर सुस्थितीत ठेवणे, तांत्रिक मान्यता, निविदेसंबंधीत कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व अभिलेखांचे जतन करणे.

12. प्रभाग निधी व नगरसेवक निधीची अंदाजपत्रके तयार करून निविदा विषयक सर्व कामे पार पाडणे.

13. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

14. कंत्राटांच्या संबंधित बाबी विषयी पत्र व्यवहार करणे.

15. विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System द्वारे आपले सरकार, पी.जी. पोर्टल, My MBMC App, -मेलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण करणे व Mobile tracking system अद्यावत ठेवणे.

16. कार्यादेशाची व अंदाजपत्रकाची प्रत  संकेतस्थळावर प्रसिध्द करणे तसेच पी.एफ. संबंधी कार्यवाही करणेसाठी पी.एफ. संकेत स्थळावर ठेकेदाराची नोंदणी करणे.

17,बांधकाम विभाग नियमपुस्तिका, राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शासन निर्णय, परिपत्रकानुसार तसेच Specification नुसार कामे पार पाडणे. वरिष्ठांनी नेमुन दिलेली सर्व कामे व दिलेल्या सुचनाचे पालन करणे.

अभियांत्रिकी विभागातील अभियंत्याची कर्तव्ये व जबाबदारी

.क्र

अधिकारी

अधिनियम व तरतुद

शाखा / कनिष्ठ अभियंता यांची कर्तव्ये / जबाबदारी

1

शाखा अभियंता

/

 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual

1.   अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांची अंदाजपत्रके बनविणे.

2.   प्रभाग निधी व नगरसेवक निधी अंतर्गत व अर्थसंकल्पातील इतर लेखाशिर्षांतर्गत सुचविलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे व ती कामे करून घेणे.

3.   प्रभाग समिती, नगरसेवक निधीच्या कामांच्या व इतर कामाच्या निविदा काढणेसाठी आवश्यक प्रारुप निविदा बनविणे.

4.   भांडवली व महसूली अशा सर्व कामांवर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.

5.   कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांच्या अधिपत्याखाली कामे पार पाडणे.

6.   कामांची 100% मोजमापे घेऊन मोजमाप पुस्तिकेत नोंद घेणे व कामाचे देयक तयार करणे.

7.   बांधकाम विभागाशी संबधित आवश्यक सर्व रेकॉर्ड तयार करणे व जतन करणे.

8.   वरिष्ठ अधिकारी यांनी नेमून दिलेली इतर कामे करणे.

9.   नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

10. सुरू असलेल्या कामांचे अभिलेख जतन करणे, विविध नोंदवह्यात नोंदी घेणे.

11. विद्यूत विषयक स्ट्रीट लाईट कामांचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे.

12. वरीष्ठांनी अग्रेषीत  केलेल्या सर्व पत्रबाबत स्थळ निरीक्षण करून अहवाल पुढील आदेशासाठी सादर करणे.

13,विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System द्वारे आपले सरकार, पी.जी. पोर्टल, My MBMC App, -मेलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण करणे व Mobile tracking system अद्यावत ठेवणे. वरिष्ठांनी नेमुन दिलेली सर्व कामे व दिलेल्या सुचनाचे पालन करणे.

अधिकारी / कर्मचारी माहिती

.क्र.

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव

पदनाम

कामाचा तपशिल
1
श्री. दिपक भास्कर खांबित
शहर अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे
2श्री. नितिन रघुनाथ मुकणे
कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.
3श्री. सतिश जयवंत तांडेल
उप-अभियंता
प्रभाग समिती क्र.1, 2 मधील विकास कामे करणे. वरीष्ठांनी नेमून दिलेली कामे करणे.
4श्री. राजेंद्र पांगळ
उप-अभियंता
प्रभाग समिती