Skip to main content
logo
logo

प्रभाग समिती क्रं. ५

विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकपत्ताई-मेल
प्रियंका भोसले
 7972539718मिरा-भाईंदर महानगरपालिका, रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणेward05@mbmc.gov.in
प्रस्तावना

मिराभाईंदर महानगरपालिका निवडणुक-2017 च्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग कार्यालय क्र.05 मिरा रोड (पूर्व)अंतर्गत निवडणुक प्रभाग क्र. 20, 21 व 22 चे कार्यक्षेत्राचा परिसर समाविष्ट असुन सदर कार्यक्षेत्रा अंतर्गत स्व. इंदिरा गांधी उड्डाण पुलवरून‍ मिरारोड स्टेशन कडे येताना लोधा रोड उजवी बाजु ते नरेंद्र पार्क ते हैदरी चौकची उजवी बाजु ते सिंगापुर प्लाझा ते मिरारोड स्टेशन अंतर्गत सर्व नया नगर परिसर व शांतीनगर सेक्टर 01 ते 11, मिरारोड स्टेशन ते पुनम सागर परिसर ते सृष्टी सेक्टर-3 परिसर ते पुनम नगर फेस-3 पर्यंत इत्यादी परिसर समाविष्ट करण्यांत आला आहे.सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, आरोग्य विभाग,मालमत्ता कर, दुकाने आस्थापना परवाना, विवाहनोंदणी, मंडपपरवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.05 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रभाग अधिकारी स्तरावर तक्रारीचे निवारण करण्याचे कामकाज पाहिले जात आहे.

कर्तव्य व कामकाज

.क्र.

पद

कर्तव्य  कामकाज

1.

सहा. आयुक्त

तथा पदनिर्देशित अधिकारी

1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 254, 260, 267, 231 नुसार सर्व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. प्रभाग समिती क्र. 05 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियत्रंण ठेवणे व कायदेशीर कारवाई करणे.

2) महाराष्ट्र विवाह मंडळाचे नियम विवाह नोंदणी अधिनियम 1980 विवाह नोंदणी करणे व दाखला देणे

3) मनपा महासभा ठराव दि.23/03/2016 ठराव क्र. 80 नुसार मैदाने समाज मंदिरर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसुल करणे.

4) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील कलम 129 नुसार मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण  करून नियमानुसार हस्तांतरण करून फी वसुली करणे, किरकोळ नावात दुरूस्ती करणे.

5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1449 मधील कलम 19 नुसार प्रभाग समिती सभा आयोजित करणे व इतिवृत्तांची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो यांच्या कर्यालयात पाठवणे

6) महाराष्ट्र महानगररपालिका अधिनियम कलम 231 नुसार अनधिकृत बसणाऱ्या फेरीवाल्या विरूध्द कारवाई करणे व कच्ची पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे.

7) महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 (3) नुसार अनधिकृत लावण्यांत आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखले करणे.

8) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 260 नुसार नियमांच्या किंवा उपविधीच्या विरूध्द सुरू केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत कारावयाची कार्यवाही.

9) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 नुसार मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ काढुन टाकणे.

 

 

10)     महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 267नुसार बेकायदेशीररित्या काम करवुन घेणाऱ्या व्यक्तीस काढुन टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार

11)     महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 268 नुसार विवक्षीत परिस्थिती मध्ये कोणतीही इमारत सोडावयास लावण्याचा आयुक्त अधिकार

12)     महाराष्ट्र महानगरपिालका अधिनियम कलम-478 पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम किवा गोष्ट अनधिकृत मानणे.

2.

कनिष्ठ अभियंता तथा उप क्षेत्र नियंत्रक

प्रभाग समिती क्र. 05 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करून अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग क्षेत्रात नव्याने आढळुन आलेल्या अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासित करणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन महापालिकेच्या पॅनलवरील बांधकाम अभियंत्यामार्फत इमारतीची संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करुन महापालिकेने ठरवून दिलेल्या जागी जमा करणे.

3.

कर निरिक्षक

 

मुख्य कार्यालय प्रभाग कार्यालयाकडुन आलेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करून कर आकारणी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविणे मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे. माहिती अधिकारी अंतर्गत माहिती संकलित करणे व आपल्या पत्रांना उत्तर देणे, मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करणेकामी कार्यवाही करणे, मालमत्ता कर व किरकोळ पावती पुस्तकासह पोटर्किर्द तपासणे, साठा रजिस्टर तपासणे, नविन कर आकारणी नोंद रजिस्टर तपासणे, संगणक विभागाकडुन प्राप्त झालेली बिले / नोटीसा वर्गवारी करून खातेदारांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.

4.

लिपिक

प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करून तसा अहवाल / माहिती सादर करणे, कर आकारणी न झालेल्या मलामत्तेचे सर्वेक्षण करणे, कर आकारणी प्रस्ताव तयार करणे, मालमत्ता कर वसुली करणे, कर भरणा पावत्या, किरकोळ पावत्या फाडणे, पोटर्किद तयार करून चलन तयार करणे, माहिती अधिकाराची उत्तरे तयार करणे, प्राप्त झालेली कराची बिले / नोटीसा शिपायांमार्फत बजावणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कर वुसली करणे, अनधिकृत बांधकामाचे बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.

5.

शिपाई

मालमत्ता कराची बिले, नोटीसा, अंतिम नोटीस, अधिपत्र वारंट वाटप करणे, वारस हक्काच्या नोटीस चिटकविणे, मालमत्ता कराचा भरणा, चलन मुख्य कार्यालयात जमा करणे, कार्यालयीन पत्र वाटप करणे, मालमत्ता कर वसुलीसाठी लिपिक / निरिक्षकांना मदत करणे.

6.

मजुर

ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करणे, पत्रव्यवहार वाटप करणे

कर्मचारी माहिती व भ्रमणध्वनी
.क्र.पदमोबाईल क्र.कामकाजाचे स्वरूप
1.सहा. आयुक्तप्रभाग समिती क्र.05 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, आर.टी.एस ,पीजी पोर्टल ,इ-गवरर्नस मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, /परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
2.प्र. कर निरिक्षकमालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, आर.टी.आय नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे.
3.लिपिक

झोन क्र. इ/02 व इ/03 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.

मालमत्ता हस्तांतरण किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे

4.प्र. लिपिकझोन क्र. इ/04 व इ/05 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
5.लिपिकझोन क्र. इ/06 व इ/07 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
6.लिपिकझोन क्र. इ/12 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
7.

लिपिक

(अतिरिक्त परवाना)

झोन क्र. इ/13 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.

परवाना पत्राची नोंद घेणे, नविन परवाना व नुतणकरणे परवाना, किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे

8.लिपिकझोन क्र. इ/14 मधील  मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
9.शिपाईझोन क्र. इ/02 व इ/03 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
10.शिपाईझोन क्र. इ/04 व इ/05 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
11.शिपाईझोन क्र. इ/06 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
12.शिपाईझोन क्र. इ/07 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
13.शिपाईझोन क्र. इ/12 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
14.शिपाईझोन क्र. इ/12 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
15.शिपाईझोन क्र. इ/13 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
16.शिपाईझोन क्र. इ/14 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
17.शिपाईझोन क्र. इ/15 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
18.शिपाईकर विभागातील आवक / जावक रजिस्टर अद्यवायात ठेवणे.
19.शिपाईप्रभाग अधिकारी दालनातील कामकाज पाहणे
20.शिपाई
21.शिपाईजाहिरात बोर्ड / बॅनर काढणेबाबत.
22.शिपाईजाहिरात बोर्ड / बॅनर काढणेबाबत
23.शिपाई
संगणक चालक
>
.क्र.विभागकामकाज
1.प्रभाग अधिकारी दालनप्रभाग अधिकारी कक्ष व इतर कार्यालयीन पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, अतिक्रमण विभागाचे कामकाज करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल चे परवानगी तयार करणे.
2.सभापती दालनप्रभाग समिती सभापती कक्ष पत्रव्यवहार तयार करणे, इतिवृत्तांत तयार करणे व कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे.
3.कर विभाग (नागरी सुविधा केंद्र)कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे, चलन तयार करणे
4.कर विभाग (नागरी सुविधा केंद्र)कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे, चलन तयार करणे
5.कर विभाग (नागरी सुविधा केंद्र)कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे, चलन तयार करणे
6.पाणी विभाग (नागरी सुविधा केंद्र)पाणी विभागाची वसुली कॅश/चेक घेणे, चलन तयार करणे
अतिक्रमण विभाग
अ.क्र.पदभारमोबाईल क्रमांककामाचेस्वरुप
15कनिष्ठ अभियंता (ठेका)प्रभाग समिती क्र.5 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामेव अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
16लिपिकअनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे. ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे
17फेरीवाला पथक प्रमुखप्रभाग समिती क्र.05 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.
18सफाई कामगारअतिक्रमण विभागा मधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज, ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवालेवर कारवाई करणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करणे.
19मजुर
20मजुर
21मजुर
22मजुर
कामकाजाचे स्वरूप
अ.क्र.पदमोबाईल क्रकामकाजाचे स्वरूप
1

लिपिक

आवक / जावक

(अतिक्रमण)

विवाह नोंदणी (अतिरिक्त)

सभापती दालनातील कामकाज पाहणे

1)  अतिक्रमण आवक / जावक रजिस्टरच्या नोंदी अद्यावयात ठेवणे.

2)  विवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे.

3)  मंडप / स्टेज / समाज मंदिर हॉल / परवानगी अर्जाची छाननी करून परवानगी देणे, किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे.

2.शिपाईसभापती दालनातील सर्व कामकाज पाहणे.
अ.क्र.पदपदनिहाय संख्या
1.सहा. आयुक्त01
2.वरिष्ठ लिपिक01
3.कनिष्ठ अभियंता (ठेका)01
4.लिपिक08
5.शिपाई16
6.मजुर05
7.संगणक चालक05
माहिती अधिकार माहिती
प्रभाग समिती क्र.05 मालमत्ता कर विभाग
अ.क्रसनअर्जनिकालीशिल्लक
12020-202122220
प्रभाग समिती क्र.05 विवाह नोंदणी
अ.क्रसनअर्जनिकालीशिल्लक
12020-2021000
प्रभाग समिती क्र.05 अतिक्रमण विभाग
अ.क्रसनअर्जनिकालीशिल्लक
12020-202177770
नागरिकांची सनद

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम

अ.क्र.

कामाचा तपशिल

कालावधी

संपर्क अधिकारी

1

तक्रार अर्ज/टपाल स्विकारणे व संबंधितास पोच देणे

त्याच दिवशी

सहा. आयुक्त

आवक-जावक लिपीक

2

पदपथावरील/रस्त्यावरील (तक्रारीनंतर) अतिक्रमणे दूर करणे

3 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

3

अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर क्षेत्रिय  अधिका-यामार्फत निरिक्षण करणे व अहवाल सादर करणे.

7 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

4

अनधिकृत/अधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता लागल्यास नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविणे.

3 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

 

5

अनधिकृत बांधकाम करणा-यावर कायदेशीर नोटीस बजाविणे.

3 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

 

6.

कायदेशीर नोटीस बजावून नोटीसीची मुदत संपल्यानंतर अनधिकृत बांधकाम दूर करणे

(पोलिस बंदोबस्त उपलब्ध्‍तेनुसार)

30 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

7.

रस्त्यावरील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यावर कारवाई करणे

नियमित

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

फेरीवाला पथक प्रमुख

8.

अनधिकृत व मुदतबाहय बोर्ड/बॅनरवर कारवाई करणे

24 तासात

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

पथक प्रमुख

9.

बोर्ड/बॅनर/मंडप/स्टेज यांना परवानगी देणे

(समाज मंदिर/शाळा/मैदान भाडयाने देणे)

7 दिवस

 

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

लिपीक

10.

पावसाळयात तात्पुरती ताडपत्री शेड/पत्राशेड टाकणेस परवानगी

7 दिवस

सहा. आयुक्त

कनिष्ठ अभियंता

लिपीक

 

 

 

 

 

 

कर विभाग प्रभाग क्र.05

अ.क्र.

कामाचा तपशिल

कालावधी

संपर्क अधिकारी

1

लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे

7 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

2

नविन कर आकारणी करणे

15 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

3

पुन: कर आकारणी करणे

(15 दिवस)

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

4

सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती

3 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

5

मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे

3 दिवस

प्रभाग अधिकारी

कर निरीक्षक

लिपीक

6

मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे

15 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

7

वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे

20 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

 

8

दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे

15 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

9

कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार

30 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

10

मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल

 

 

1 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

11

मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल

3 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

12

कराची मागणी पत्रे तयार करणे

3 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

 

13

मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला

3 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

14

कर आकारणी नावात दुरुस्ती

7 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

15

थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला

3 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

16

कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे

21 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

17

स्वयंमुल्य कर निर्धारण करणे

(Self Assessment)

15 दिवस

सहा. आयुक्त

कर निरीक्षक

लिपीक

                     

परवाना विभाग प्रभाग क्र.5

अ.क्र.

कामाचा तपशिल

कालावधी

संपर्क अधिकारी

1

नवीन परवाना देणे

15 दिवस

सहा. आयुक्त

लिपीक

2

परवाना नुतनीकरण करणे/हस्तांतरण/ परवाना दुय्यम प्रत देणे/व्यवसायाचे नांव बदलणे/व्यवसाय बदलणे/परवाना रद्द करणे/कालबाहय परवानासाठी नुतनीकरण सुचना देणे.

15 दिवस

सहा. आयुक्त

लिपीक

 

विवाह नोंदणी प्रभाग क्र.5

अ.क्र.

कामाचा तपशिल

कालावधी

संपर्क अधिकारी

1

विवाह नोंदणी

3 दिवस

प्रभाग अधिकारी

लिपीक

 

 

 

 

 

// C.F.C सेंटर यादी  सेवा //

 

.क्र.

C.F.C

सेवा

पत्ता

1.

मालमत्ता कर

नागरी सुविधा केंद्र

मालमत्ता कराचे रोख रक्कम व धनादेशाची देयके स्विकारली जात आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी हॉस्पीटल इमारत,

मौलाना अब्दुल कलाम आझाद, प्रभाग कार्यालय क्र. 05

पुनम सागर कॉम्पलेक्स, मिरारोड पुर्व

2.

पाणी पुरवठा कर

नागरी सुविधा केंद्र

पाणीपट्टी कराचे रोख रक्कम व धनादेशाची देयके स्विकारली जात आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी हॉस्पीटल इमारत,

मौलाना अब्दुल कलाम आझाद, प्रभाग कार्यालय क्र. 05

पुनम सागर कॉम्पलेक्स, मिरारोड पुर्व

अनधिकृत बांधकाम बाबतची माहिती 

बेवारस व पडीक वाहनान बाबत 


धोकादायक इमारती 


         धोकादायक इमारतीची यादी Ward No-5


   अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत
   माहिती अधिकार अधिनियम 2005 (17 मुद्दे)