|
---|
प्रस्तावना : - मिरा भाईंदर शहराचे भौगोलिक क्षेत्र 79.40 चौ. किमी इतके विस्तृत आहे. मिरा भाईंदर नगरपरिषद काळात शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन 13 फेब्रुवारी 1993 रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या नगरभवन इमारतीमध्ये ग्रंथालय या नावाने सुसज्ज वाचनालय सुरु करण्यात आले. भाईंदर शहरात वाचनालयाकरिता मिळालेला उत्तम प्रतिसाद व इतर भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मिरा रोड (पुर्व) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय दि. 01 नोव्हेंबर 2010 रोजी स्थापना करण्यात आले. तदृनंतर भाईंदर (पुर्व) येथे प्रभाग समिती कार्यालय व राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय मिरा रोड (पुर्व) या इमारतीमध्ये ग्रंथालय सुरु करण्यात आले. अशाप्रकारे संपुर्ण मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना ग्रंथालयाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. ग्रंथालयाचा स्थापनेनंतर शहरातील विदयार्थ्यांच्या सोयीकरीता ग्रंथालयासोबत अभ्यासिकाही सुरु करण्यात आल्या आहेत. विदयार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अन्य 10 ठिकाणी अभ्यासिका सुरु आहेत. तसेच एकुण 4 ठिकाणी नागरिकांकरीता मोफत वृत्तपत्र वाचनाची सोय करण्यात आली आहे ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात विपुल ग्रंथसंपदेमुळे नागरिक खुश आहेत. ग्रंथालय कडुन ग्रंथालय सभासद नोंदणी व विदयार्थ्यांकरिता अभ्यासिका नोंदणीबाबतच्या सेवेबाबतही नागरिक संतुष्ट आहेत. यामुळेच वरील दोन्ही करीता नागरिक व विदयार्थ्याचा प्रतिसाद दिवसांगणिक वाढत आहे. यापुढेही ग्रंथालय व अभ्यासिकेची संख्या वाढविण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे |
ग्रंथालय कर्मचारी माहिती व मोबाईल क्रमांक
नगरवाचनालय, भाईंदर (प.)
राष्ट्रापिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पुर्व)
विभागीय वाचनालय, प्र.स.का.क्र. 3, तलाव रोड, भाईंदर (पुर्व)
गणेश देवल आनंद नगर अभ्यासिका भाईंदर (पुर्व)
|
अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये :-
|
वाचनाची आवड असणाया नागरिकांसाठी महानगरपालिकेतर्फे खालील प्रमाणे ग्रंथालय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.:-
// भाईंदर (प..) // १. नगरवाचनालय व अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), दुसरा मजला, मांडली तलाव समोर, भाईंदर (प.) नगरवाचनालयाची स्थापना १३ फेब्रुवारी १९९४ रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील ग्रंथालय मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील २७,२०२ ग्रंथांचा समावेश आहे. तसेच नियतकांलिका देखिल उपलबध करण्यात आली आहे. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता १५० ते २०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. ग्रंथालय यात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत.त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ ग्रंथालय यात उपलब्ध आहेत. ग्रंथालय यात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना ग्रंथालय यात दररोज ३४ वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे. // मिरा रोड (पू.) // १ .राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, इंदिरा गांधी रुग्णालय, पुनमसागर कॉम्प्लेक्स मिरारोड (पू.) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील १५०५१ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच नियतकांलिका देखिल उपलबध करण्यात आली आहे. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता १५० ते २०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण ३० मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. // भाईंदर (पू.) // १. प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ ग्रंथालय व अभ्यासिका, तलाव रोड, भाईंदर (पू.) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पु.) येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय व पहिल्या / तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ ग्रंथालय यात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील ९६०९ ग्रंथ आहेत. तसेच नियतकांलिका देखिल उपलबध करण्यात आली आहे वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता ७३ ते १०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज १३ वृत्तपत्रांची मोफत ग्रंथालय सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. |
ग्रंथालयीन सेवा : -
|
विभागाने राबविलेले विविध कार्यक्रम यांची सविस्तर माहिती :-
|
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यरत अभ्यासिकांची माहिती : - अभ्यासिकांची वेळ :- सकाळी 7.00 ते रात्री 11.00
मिरा–भाईंदर महानगरपालिकेच्या सदया स्थितीत कार्यरत वाचनालयांचा तपशील : -
|
वाचनालय विभाग कार्यालयातील कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल :- कार्यालयाचे नांव :- ग्रंथालय विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका पत्ता :- नगर वाचनालय, दुसरा मजला, नगर भवन, भाईंदर (प.) जि.ठाणे 401
101
कार्यालय प्रमुख :- ग्रंथपाल, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे. शासकीय विभागाचे नांव :- ग्रंथालय विभाग कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग मंत्रालय, मुबंई कार्यक्षेत्र :- मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- 79 चौ.कि.मी. कार्यानुरूप :- मिरा-भाईंदर महानगरपालिका विशिष्ट कार्ये :- 1) मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाचन साहित्य पुरविणे 2) मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देणे. 3) मोफत वृतपत्र वाचनाची सोय 4) भाईंदर (प.), भाईंदर (पुर्व) ,मिरारोड येथे वाचना कार्यरत आहेत. विभागाचे ध्येय / धोरण :- शासनाचे आदेश व परिपत्रकाची अंमलबजावणी करणे आणि मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे कार्यवाही करणे. धोरण :- वरिलप्रमाणे सर्व संबंधित कर्मचारी :- वर्ग ३ व ४ संवर्गातील कार्य :- ग्रंथालय विभागातील सेवा विषयक सर्व बाबी पहाणे. कामाचे विस्तृत स्वरुप :- 1) शासकिय / निमशासकीय /खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवक इ. पत्र व्यवहार. 2) महापालिका क्षेत्रात नवीन वाचनालय/अभ्यासिका स्थापन करणे. 3) सर्व वाचनालयाकरीता नवीन ग्रंथ, नियतकालिके यांची खरेदी करुन वाचकांना उपलब्ध करुन देणे.
उपलब्ध सेवा : ग्रंथ देवाण घेवाण, अभ्यासिका सेवा, संदर्भ सेवा इत्यादी उपलब्ध करुन देणे. प्राधिकरणाऱ्या संरचनेचा तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- 28044959 वेळ :- सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 वा
रविवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत साप्ताहिक सुट्टी :- शनिवार व शासकिय सुट्टया |
नमुना ख मागील व वर्षासाठी (सन 2023-2024) (आकडे लाखात)
नमुना ख मागील व वर्षासाठी (सन 2022-2023) (आकडे लाखात)
|
नागरिकांची सनद विवरण पत्र “अ” सन 2024-25
|
>> अंदाजपत्रक |
>> प्रदान करण्यात आलेली देयके |
इतर माहिती :- |
>> मिरा भाईदर महानगरपालिकेच्या नगरभवन, भाईदर (प.) येथिल वाचनालयाकरीता UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा व इतर पुस्तके खरेदी करणेबाबत |