Skip to main content
logo
logo

स्थानिक संस्था कर


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई-मेल
श्री. चंद्रकांत बोरसे (सहाय्यक आयुक्त ) 
022-28174080
lbt@mbmc.gov.in


प्रस्तावना :

  • दि. 01/04/2010 पासुन मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मा. शासन निर्णयानुसार स्थानिक संस्था कर लागू करण्यांत आला.
  • दि. ०१/०८/२०१५ रोजी पासून मा. शासन निर्णयानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कर (५० कोटी व त्यावरील खरेदी किंवा विक्रीची उलाढाल असणारे व्यापारी सोडून) इतर व्यापा-यांच्या बाबतीत स्थानिक संस्था कर बंद करण्यात आला.
  • माहे ऑगस्ट 2015 पासुन शासनाकडून सहाय्यक अनुदान या लेखाशिर्षाखाली मिरा भाईंदर महानगरपालिकेस सहाय्यक अनुदान सुरु झाले.
  • दि. 01/07/2017 पासून महाराष्ट्रात वस्तू व सेवा कर लागू केल्याने स्थानिक संस्था कर बंद करण्यात आला.
  • मा. शासनाकडून सहाय्यक अनुदान या लेखाशिर्षाखाली माहे जून-2017 पर्यत प्राप्त आहे.
  • मा. शासनाकडून वस्तू व सेवा कर या लेखाशिर्षाखाली माहे जुलै-2017 पासून ‘वस्तू व सेवा कर’ अनुदान सुरु झाले आहे.
  • जा.क्र.मनपा/आस्था/1557/2022-23 दि.16/11/2022 अन्वये स्थानिक संस्था कर नियमान्वये निर्धारणा व थकबाकी वसुली साठी विशेष कार्य अधिकारी (O.S.D.) या पदावर विक्रीकर विभागातील करारपध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात तीन सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त / अधिकारी यांची नियुक्ती करण्यांत आली आहे.


कर्तव्य :

                 स्था.सं.कर वसुली करणे, व्यापाऱ्यांना कर भरणेस प्रवृत्त करणे, त्यांच्या आस्थापनास भेटी देणे. नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करून व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. तसेच जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट साध्य करणे कामी प्रयत्न करणे. महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम 2010 नुसार व वेळोवेळी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेप्रमाणे जे व्यापारी नोंदणी करणेस पात्र आहेत त्यांची नोंदणी करणे. व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरणेस उद्युक्त करणे. जे व्यापारी कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करणे व स्थानिक संस्था कराचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे अशी कामे केली जात आहेत.

            मा. उपायुक्त (मु.) यांचेकडील मि.भा.मनपा, आदेश क्रमांक मनपा/आस्था/195/2023-24 दि.27/04/2023 रोजीचे आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कराचे निर्धारण करणेकामी विशेष कार्य अधिकारी (O.S.D.) या पदावर विक्रीकर विभागातील करारपध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात तीन सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त / अधिकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यांत आली आहे.


कामकाज :

          मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागातील कामकाज ज्या अधिनियम/नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949.
  • स्थानिक संस्था कर अधिनियम 2010.
  • मा. शासनाकडून वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय, अधिनियम व नियम .

 

          स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कराचे निर्धारणानंतरचे अतिरिक्त कामकाज करण्यासाठी 03 विशेष कार्य अधिकारी O.S.D. नेमणुक करण्यांत आली आहे. त्यांनी स्थानिक संस्था कर नियमान्वये व्यापा-यांचे निर्धारण पुर्ण करणे, निर्धारणानंतर अतिरिक्त वाढीव महसुलाची मागणी झाल्यास अश्या वसुलीसंबंधी योग्य त्या कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणे. तसेच निर्धारणा आदेशाविरोधात अपिल दाखल करण्यांत आले असल्यास अपीलाबाबत योग्य मी कार्यवाही करणे, काही उच्य न्यायालयीन प्रकरणांबाबत विधी अधिका-यांना प्रकरणाची योग्य ती माहिती देणे. तसेच वसुलीबाबत बँक खाती गोठविणे. नंतर मालमत्तेचा लिलाव करुन वसुलीबाबत कार्यवाही करणे. तसेच कलम 152L च्या तरतुदीनुसार कसुरदाराबाबत योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी स्वरुपाची कामे विशेष कार्य अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे. याबाबत स्थानिक संस्था कर विभागातील अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन करणे. तसेच एखाद्या प्रकरणात निर्धारणाद्वारे व्यापा-यांस परतावा देय असल्यास त्याबद्दलची कार्यवाही करणेबाबत स्थानिक संस्था कर विभागातील अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.


अधिकारी / कर्मचारी माहिती :



.क्र.
स्थानिक संस्था कर विभागातील अधिकारी / कर्मचारी
01विभाग प्रमुख तथा सहा. आयुक्त
02वरिष्ठ लिपीक 
03संगणक चालक 
04शिपाई
05विशेष कार्य अधिकारी (ठोक मानधन) 
06ऑडीट लिपीक (अस्थायी) 
07संगणक चालक (ठेका / कंत्राटी) 



मिरा-भाईंदर महानगरपालिका नागरिकांची सनद

स्थानिक संस्था कर विभाग सन 2023-24

कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचा संरचनेचा तक्ता

 

आयुक्त

अतिरिक्त आयुक्त (1)

उप-आयुक्त (स्था.सं.कर)

सहा.आयुक्त

विशेष कार्य अधिकारी

वरिष्ठ लिपीक

संगणक चालक

शिपाई


परिशिष्ट

महानगरपालिकेकडून पुरविण्यांत येणा-या नागरी सेवा


.क्र.

सेवांचा तपशिल

सेवा पुरवणारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवा पुरविण्याची

विहीत मुदत

सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ

अधिका-याचे नाव हुद्दा
01नागरिकांचा पत्र व्यवहार
वरिष्ठ लिपीक
7 दिवसात
सहा. आयुक्त
02माहिती अधिकार
वरिष्ठ लिपीक
विहीत मुदतीत
सहा. आयुक्त
03मा. लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार
वरिष्ठ लिपीक
त्वरीत
सहा. आयुक्त
04
शासन पत्रव्यवहार, पी.जी. पोर्टल, पी.एम. पोर्टल, झिरो पेन्डन्सी, तक्रार निवारण
वरिष्ठ लिपीक
विहीत मुदतीत
सहा. आयुक्त



सहा. आयुक्त

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर विभागाची रचना मनुष्यबळ आकृतीबंध


.क्र.

पद

कार्यालयीन दुरध्वनी / फॅक्स विस्तारीत क्रमांक

सहाय्यक

विस्तारीत क्रमांक मोबाईल क्रमांक
01
मा. आयुक्त सो.

स्विय सहाय्यक
-
02
मा. अतिरिक्त आयुक्त सो. (1)

स्विय सहाय्यक
-
03
मा. उप-आयुक्त सो. (स्था.सं.कर)

स्विय सहाय्यक
-
04
विभाग प्रमुख तथा सहा. आयुक्त
022-28174080
-
-
05
वरिष्ठ लिपीक

-
-
06
संगणक चालक

-
-
07
शिपाई

-
-
08
विशेष कार्य अधिकारी (ठोक मानधन)

-
-
09
ऑडीट लिपीक (अस्थायी)

-
-
10
संगणक चालक (ठेका / कंत्राटी)

-
-


अ.क्र.
पदनाम
कामाचे स्वरुप
01
मा. आयुक्त सो.
स्थानिक संस्था कर विभागीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे
02
मा. अतिरिक्त आयुक्त सो. (1)
स्थानिक संस्था कर विभागीय आवश्यक त्या कामकाजाबाबत सुचना देणे व नियंत्रण ठेवणे
03
मा. उप-आयुक्त सो. (स्था.सं.कर)
स्थानिक संस्था कर विभागीय आवश्यक त्या कामकाजाबाबत सुचना देणे व नियंत्रण ठेवणे
04
विभाग प्रमुख तथा सहा. आयुक्त
स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज पाहणे, माहिती अधिकार, पी.जी.पोर्टल, सी.एम.पोर्टलमा. लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार व इतर आवश्यक शासकीय पत्र व्यवहार पाहणे व मा.वरिष्ठांच्या आदेशानुसार दिलेल्या सुचनांचे पालन करणे व स्थानिक संस्था कर गटातील संबंधित कामकाजावर पहाणी व नियंत्रण ठेवणे
05
वरिष्ठ लिपीक
स्थानिक संस्था कराचे आवक-जावक पहाणे, बँक वसुली, शासकीय पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज पहाणे.
06
संगणक चालक 
मा. आमदार, मा. नगरसेवक (लोकप्रतिनिधी) यांचे पत्रव्यवहार, ऑनलाईन प्रणालीमार्फत अंदाजपत्रक, आपले सरकार, पी.एम. पोर्टल, माहिती अधिकार, -मेलद्वारे कार्यालयीन व शासकीय पत्रव्यवहार, स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांचे निर्धारणा आदेश तयार करणे, विविध प्रकारच्या नोटीसा व त्या अनुषंगीक पत्रव्यवहार तयार करणे, मिभामनपा प्रशानाकडुन होणा-या पत्रांना उत्तरे व इतर अनुषंगीक कामे व           मा. वरिष्ठ यांचे वेळोवेळी प्राप्त झालेल्या ओदशानुसार व मार्गदर्शनानुसार कामकाज  करणे.

अ.क्र.
पदनाम 
कामाचे स्वरुप
07
शिपाई 
स्थानिक संस्था कर विभागातील दैनंदिन पत्र व्यवहारांच्या फाईल करणे, नोंदणीकृत व्यापा-यांना नोटीसा बजाविणे. बँक स्टेटमेंट आणणे मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
08

विशेष कार्य अधिकारी

(ठोक मानधन)
नोंदणीकृत व्यापा-यांच्या प्राप्त लेख्यांची तपासणी करुन निर्धारणा आदेश पारीत करणे, निर्धारणा आदेशा विरुध्द दाखल केलेल्या अपिलाचा निपटारा करणे, मा. न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये योग्य ती मदत करणे, स्थानिक संस्था कर थकबाकी वसुलीसाठी उचित कार्यवाही करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
09
ऑडीट लिपीक (अस्थायी)
स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांचे निर्धारणा आदेश तयार करणे, नोटीसा तयार करणे, नोटीसा बजावणिे व         मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
10
संगणक चालक (ठेका)
स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांचे नोटीसा तयार करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.



बँकांचा तपशिल 


अ.क्र
बँकेचे नाव व खाते क्रमांक
संपर्क क्रमांक
1

भारतीय स्टेट बँक, भाईंदर (पश्चिम)

खाते क्रमांक  30479449334
022-28186448
2

सिंडीकेट बँक (मिरा रोड)

(कॅनरा बँक) खाते क्रमांक  54811010000621
022-28123296
3

इंडियन ओव्हरसीज बँक, भाईंदर (पश्चिम)

खाते क्रमांक 197302000001000
9892134747
4

एचडीएफसी बँक, शांती पार्क, मिरा रोड

खाते क्रमांक  50100015839023
022-61606161 / 9821969730


स्थानिक संस्था कर विभागातील नमुना अर्ज