विभागप्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई– मेल | |
| 022-28192828 Ext. 123 (निवडणुक विभाग) Ext.166 | electionmbmc@gmail.com |
प्रस्तावना
मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कामकाज लोकाभिमुख व गतिमान होण्याच्या दृष्टीकोनातून मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मा. उपायुक्त (मु.) यांच्याकडील जा.क्र.मनपा/सा.प्र./40/2015 दि.10/04/2015 अन्वये महानगरपालिका स्तरावर निवडणुक विषयक कामकाजा करीता निवडणुक कक्ष स्वतंत्रयरित्या स्थापन करण्यात आला आहे. सदर विभागातुन महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक/पोटनिवडणुका तसेच मतदार जनजागृती,मतदार नोंदणी, शासनाचे विविध कार्यक्रम यासाठी शासनाशी/राज्य निवडणुक आयोगाशी समन्वय साधुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामे पार पाडली जातात.
मा. आयुक्त (निवडणुक अधिकारी)
↓
मा. अति. आयुक्त (निवडणुक)
↓
मा उपायुक्त (उप.निवडणुक अधिकारी)
↓
सहा. आयुक्त (सहा. निवडणुक अधिकरी)
↓
लिपिक (निवडणुक)
↓
ठेका संगणकचालक (-//-)
↓
शिपाई (-//-)
↓
सफाई कामगार (-//-)
जॉबचार्ट
अ.क्र. | अधिकार पद (पदनाम) | जबाबदारी व कर्तव्ये |
१. | आयुक्त तथा निवडणुक अधिकारी | निवडणुकी संदर्भातील सर्व कामकाजावर पर्यवेक्षक करणे व निर्णय घेणे. |
२. | उपायुक्त (मु.) तथा उप.निवडणुक अधिकरी | निवडणुक विभागातील सर्व कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे. |
३. | सहा.निवडणुक अधिकारी | 1. निवडणुक विभागातील सर्व कामकाज पाहणे. 2. शासनाशी पत्रव्यवहार करणे. 3. राज्य निवडणुक आयोगाशी पत्रव्यवहार करणे. 4. निवडणुकी संदर्भातील माहीती तयार करून पुरविणे. 5. लिपीक/संगणक चालक व शिपाई यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. 6. लोकप्रतिनिधी/नागरीक/पत्रकार यांना माहीती देणे. 7. मतदार नोंदणी करीता कार्यक्रमांचे सुचने प्रमाणे नियोजन करणे. 8. मतदार जनजागृती करीता विविध उपाययोजना अंमलात आणणे. |
४. | लिपीक | 1. निवडणुक विभागातील सर्व पत्रव्यवहार सांभाळणे. 2. वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करणे. बैठकीस उपस्थित राहणे. 3. प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल /माहिती सादर करणे . 4. आवक – जावक पत्रव्यवहार स्विकारणे व पाठविणे.. 5. देयक सादर करणे. 6. प्रस्ताव सादर करणे. 7. निवडणुक साहित्याच्या नोंदी घेणे. 8. लेखा परिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. 9. माहिती अधिकारीतील अर्जावर कार्यवाही करणे. 10.शासनाचे पत्र, लोकप्रतिनिधी पत्र, नगरसेवकांची पत्र, पदाधिकारीयांचे पत्रावर मुदतीत कार्यवाही करणे |
5. | संगणकचालक (ठेका) | आपले सरकार, माहिती अधिकार नगरसेवकांची पत्र, पीजीपोर्टल वरील तक्रारी, दैनंदिन ई-मेल check करणे, प्रस्ताव, देयके सादर करुन संगणकात नोंद घेणे, दैनंदिन आवक जावक संगणकात नोंद घेणे, कार्यालयीन कामकाजाचे संगणकावर टाईपिंग करणे, वरिष्ठांनी दिलेले कामकाज करणे. |
6. | शिपाई मजूर | 1. टपाल वाटप करणे,पत्र वापरासाठी मंत्रालय/ठाणे/कोकण भवन/ईतर मनपा/शासकिय कार्यालये येथे जाणे. 2. नियमित कार्यालयीन कामे करणे. 3. वरिष्ठाच्या आदेशांचे पालन करणे |
शासन निर्णय
अ.क्र. | शासन निर्णया नुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व दिनांक | अभिप्राय (असल्यास) |
1 | निवडणुक कक्ष स्थापना | जा.क्र.मनपा/सा.प्र./40/2015 दिनांक 10/04/2015. | सार्वत्रिक निवडणुक/पोट निवडणुक संबधित कामकाज जबाबदारी निश्चिती. |
2 | निवडणुक विभागासाठी अधिकारी / कर्मचारी नेमणुक | शासन निर्णय क्र:-संकिर्ण-2016/प्र.क्र.215/ उदयोग-4 दि. 24/08/2017 | सार्वत्रिक निवडणुक/पोट निवडणुक संबधित निवडणुक विभागाचे कामकाज पाहणे करीता अधिकारी / कर्मचारी नेमणुक. |
3 | महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करणेबाबत. | जा.क्र. मनपा/नि.वि./156/2021-22, दि. 31/03/2022 | नागरीकां करीता वेबसाईडवर माहीती प्रसिध्द करणे. |
अंदाज पत्रक (सन 2022-2023)
अ.क्र. | अंदाज पत्रकिय शिर्षाचे वर्णन
| अनुदान
| नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)
| अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय
|
1 | सार्वत्रिक निवडणुक/ पोटनिवडणुक 2022-23 | रु.10 कोटी | निवडणुक विभागातील कामकाजासाठी खर्च (सार्वत्रिक निवडणुक -2022) | —– | महापालिकेची ऑगस्ट 2022 मध्ये मुदत संपत आहे |