Skip to main content
logo
logo
प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन चौक येथील उद्यानात प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची स्थळ पाहणी केली. प्रसंगी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. यापूर्वी पाहणी दरम्यान उद्यानात असलेले काँक्रिटचे बांधकाम, ग्रिल बांधणीचे काम, डेब्रिज उचलणे, मातीचा ढिगारा हलविणे, स्मारकालगत असलेली जमीन समांतर करणे, तसेच लोकार्पण होण्याआधी रंगरंगोटीचे काम योग्यरीत्या पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त यांनी बांधकाम विभागास दिले होते.

निर्देशानुसार गवत छाटणी, जमीन समांतर करणे, डेब्रिज उचलणे, रंगरंगोटीची कामे ८०% प्रमाणात पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच उद्यानात नियमितरित्या गवत छाटणी करणे, झाडांना व गवतात नियमित पाणी देणे, अतिरिक्त वाढ झालेल्या झाडांची फांदी छाटणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार समुद्रकिनारा जवळ असल्या कारणाने नागरिकांना समुद्राचा देखावा दिसावा तसेच चिमाजी अप्पा यांचे स्मारक नागरिकांना लांबून योग्यरीत्या दिसावे यासाठी स्मारकापेक्षा कमी उंचीचे असलेली झाडे त्याठिकाणी लावण्यात आलेली आहेत. निर्देशानुसार ८०% प्रमाणात कामे पूर्ण केल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी समाधान व्यक्त करून उर्वरित कामांना गती देऊन लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश बांधकाम व उद्यान विभागास दिले.